Naresh Mhaske (@nareshmhaske) header
Naresh Mhaske (@nareshmhaske) profile picture

• खासदार - ठाणे लोकसभा मतदारसंघ • महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, प्रवक्ता शिवसेना • शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख • माजी महापौर, ठाणे #ShivSena

Thane
Joined May 2014
Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या संकल्पनेतून गावदेवी मैदान येथे तीन दिवसीय संविधान महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून संविधानाविषयी जनजागृती करण्यासोबतच विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे १०० बाय १०० फुटांची भव्य रांगोळी. या रांगोळीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. भारताची विविध भाषा, संस्कृती, धर्म आणि परंपरा यांना एका समान धाग्यात बांधून ठेवण्याचं काम आपलं भारतीय संविधान करतं. देशातील सर्व कायदे, सरकार आणि विविध संस्थांना संविधानाच्या चौकटीत राहूनच कार्य करावं लागतं. कोणताही कायदा हा संविधानाच्या विरोधात असू शकत नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध संरक्षण तसेच आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार दिला आहे. हे अधिकार आणि संविधानाचं महत्त्व केवळ आजच्या पिढीलाच नव्हे, तर येणाऱ्या नव्या पिढीलाही समजलं पाहिजे. समाजातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घटनात्मक हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव झाली पाहिजे, असे उद्गार मी संविधान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. संविधान हा केवळ एका पुस्तकातील मजकूर नसून तो आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आणि प्रत्येक भारतीयाच्या अधिकारांचं संरक्षण करणारा मार्गदर्शक आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये आपल्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजेत. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या संकल्पनेचं तसेच ठाणे महानगरपालिकेने या महोत्सवाच्या आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराचं मी मनापासून कौतुक केलं. यावेळी माझ्यासह प्रभाग समितीचे अध्यक्ष, नगरसेवक संजय वाघुले, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्यासह विविध मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. #NareshMhaske #SamvidhanMahotsav #IndianConstitution #DrBabasahebAmbedkar
1
85
मानवतेचा, प्रेमाचा, बंधुभावाचा आणि समानतेचा संदेश संपूर्ण जगाला देणारे शीख धर्माचे संस्थापक, थोर संत गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त घोडबंदर येथील गुरुद्वाराला भेट देऊन गुरुनानक देवजींचं दर्शन घेतलं आणि त्यांना विनम्र अभिवादन केलं. गुरुनानक देवजींनी दिलेली 'एक ओंकार, सर्व मानव एकसमान' ही शिकवण आजही समाजाला एकतेचा, सेवाभावाचा आणि माणुसकीचा मार्ग दाखवते. यावेळी गुरुद्वारा समितीच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला यासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आणि सर्व शीख बांधवांना गुरुपर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासमवेत श्री. प्रवीणजी नागरे आणि सर्व शीख बांधव उपस्थित होते. #NareshMhaske #GuruNanakJayanti #Gurpurab #GuruNanakDevJi #UnityAndEquality
2
105
खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथील सचिन तेंडुलकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाठीकाठी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला आणि सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लाठीकाठी हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि शिवकालीन परंपरेचा वारसा जपणारा पारंपरिक युद्धकला प्रकार आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तरुणाईला आपल्या पारंपरिक खेळांची ओळख व्हावी आणि अशा खेळांना योग्य व्यासपीठ मिळावं, या उद्देशाने खासदार क्रीडा संग्राममध्ये लाठीकाठी स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. विशेषतः आजच्या काळात मुलींना आणि महिलांना लाठीकाठीसारख्या पारंपरिक स्वसंरक्षण कलांचं प्रशिक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर आत्मविश्वास, धैर्य आणि संकटाच्या वेळी स्वतःचं संरक्षण करण्याची क्षमता या प्रशिक्षणातून विकसित होतं. महिलांवरील छेडछाड आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वसंरक्षणाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. त्यामुळे अशा प्रशिक्षणाचा लाभ अधिकाधिक मुली आणि महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी विभागा-विभागांमध्ये लाठीकाठी प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करण्यात यावं, अशी सूचना यावेळी केली. आपली पारंपरिक युद्धकला केवळ स्पर्धांपुरती मर्यादित न राहता प्रत्येक विभागात शिकवली जावी आणि नव्या पिढीने या कलेचा वारसा पुढे न्यावा, हीच अपेक्षा यावेळी माझ्यासह अभिनेते अरुण कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के ,अनिल भोर , कांचन चिंदरकर, यज्ञा भोईर, राकेश शिंदे, वर्षा शेलार, शीतल ढमाले, निता घोगरे ,सरिता ठाकूर,राजा जाधवर , रामचंद्र गुरव, यज्ञेश भोईर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. #NareshMhaske #KhasdarKridaSangram #LathiKathi #TraditionalMartialArts #WomenSelfDefence
2
82
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी... लोकसत्ता… लोकमान्य, लोकशक्ती! #NareshMhaske #Kirtan #Loksatta #LoksattaLitFest #LiteraryFestival
75
खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत ठाणे शहरात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून टीप टॉप येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेला तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित कॅरम स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो एकाग्रता, संयम, चिकाटी आणि खिलाडूवृत्ती विकसित करणारा महत्त्वाचा माध्यम आहे. बुद्धिबळासारखा बुद्धिमत्तेचा खेळ असो किंवा कॅरमसारखा कौशल्य आणि अचूकतेची कसोटी पाहणारा खेळ असो, प्रत्येक खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावं, हीच अपेक्षा आहे. या स्पर्धांचं उत्कृष्ट नियोजन करून त्या यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व आयोजकांचं विशेष कौतुक केलं. बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी होण्याकरता नगरसेविका नम्रता भोसले, शिवसेना लोकसभा सचिव बाळा गवस यांनी तर कॅरम स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रभाग समिती अध्यक्ष मीनल संख्ये तसेच नगरसेवक राजेंद्र फाटक, तानाजी पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते हणमंत जगदाळे, पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, शाखाप्रमुख तानाजी पाटील यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. #NareshMhaske #KhasdarKridaSangram #ChessCompetition #CarromCompetition
1
2
9
435
ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक तसेच आमचे मित्र श्री. मनोज शिंदे यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं आहे. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच जनसेवेचं हे कार्य असेच अविरत सुरू राहो, त्यांच्या हातून समाजहिताची अनेक विधायक कामं घडोत आणि त्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी मनोज शिंदे यांचे वडिल आणि श्रीनगर वसाहतीचे संस्थापक श्री. तुकाराम शिंदे यांची सुद्धा भेट झाली. त्यांच्याशी सुद्धा मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. @shindemanojt #NareshMhaske #ManojShinde #BirthdayWishes #Thane #SocialService
4
188
खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील खारकर आळी येथे आयोजित करण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या समवेत सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांनी पुढाकार घेतला असून, स्थानिक खेळाडूंना आपलं क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यावेळी स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं, तसेच मैदानावर आपला खेळ आणि जिद्द दाखवणाऱ्या सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, यावेळी आम्ही देखील काही वेळ मैदानात उतरून बॉक्स क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आणि खेळाडूंसोबत खेळातील उत्साह अनुभवला. यावेळी शिवसेनेचे गटनेते पवन कदम, आमदार रवींद्र फाटक, नगरसेवक योगेश जानकर, विकास रेपाळे, शहरप्रमुख हेमंत पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. @DrSEShinde @Shivsenaofc #nareshmhaske #ShrikantShinde #KhasdarKridaSangram #shivsena
5
186
खासदार क्रीडासंग्राम सीझन २ @drshrikantshinde @shivsenaofc #nareshmhaske #ShrikantShinde #KhasdarKridaSangram #shivsena #thane
1
1
2
148
मानवतावाद व समतेचा संदेश देणारे, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या चरणी सादर प्रणाम! समस्त शीख बांधवांना गुरु नानक जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! #NareshMhaske #GuruNanakJayanti #Gurpurab #GuruNanakDevJi #EqualityAndHumanity
69
त्रिपुरारी पौर्णिमा व देव दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा! #NareshMhaske #TripurariPurnima #DevDiwali #KartikPurnima #FestivalOfLights
5
160
खासदार क्रीडा संग्रामच्या माध्यमातून कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मेंटल हॉस्पिटल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यावेळी मैदानावर उतरलेल्या सर्व खेळाडूंशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला आणि स्पर्धेतील पुढील सामन्यांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना आपले क्रीडागुण दाखवण्याची, खिलाडूवृत्ती जोपासण्याची आणि एकत्र येऊन खेळाचा आनंद घेण्याची उत्तम संधी उपलब्ध होत आहे. नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचं नियोजन, खेळाडूंचा उत्साह आणि आयोजकांनी घेतलेली मेहनत पाहून त्यांचं विशेष कौतुक केलं. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीदेखील स्पर्धास्थळी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. @DrSEShinde #nareshmhaske #KhasdarKridaSangram #BoxCricketTournament #ShrikantShinde #ThaneSports #YouthSportsDevelopment
1
2
156
हिरानंदानी इस्टेट येथे ‘इलायका’ या ब्रायडल आणि एथनिक वेअर फॅशन स्टुडिओच्या नवीन शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलं. शीतल निकम आणि योगिता जगताप यांनी आपल्या कल्पकतेला, मेहनतीला आणि फॅशनविषयक आवडीला व्यावसायिक रूप देत या सुंदर फॅशन स्टुडिओची निर्मिती केली आहे. ठाण्यातील या दुसऱ्या शाखेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करत फॅशन विश्वात एक नवी पायरी गाठली आहे. ब्रायडल आणि एथनिक वेअरच्या माध्यमातून महिलांच्या सौंदर्याला, त्यांच्या आवडीला आणि खास क्षणांना अधिक सुंदर बनवण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. मराठी महिला आज केवळ स्वप्न पाहत नाहीत, तर स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर ती स्वप्नं प्रत्यक्षात उतरवत व्यवसाय, उद्योजकता आणि विविध क्षेत्रांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. शीतल निकम आणि योगिता जगताप यांच्या या नव्या वाटचालीला शुभेच्छा देत त्यांच्या व्यवसायाने उत्तरोत्तर प्रगती करावी, अधिकाधिक ग्राहकांचा विश्वास संपादन करावा आणि यशाची नवनवी शिखरे गाठावीत, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी माझ्यासह स्थानिक नगरसेविका सौ. अर्चना मणेरा ,विनोद निकम देखील उपस्थित होते . #nareshmhaske #IlayakaFashionStudio #WomenEntrepreneurship #MarathiWomenEntrepreneurs #BridalAndEthnicWear #ThaneBusiness
1
2
5
214