महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रीशिक्षण, बहुजनांचे प्रबोधन आणि सामाजिक समतेसाठी संघर्ष करताना प्रस्थापित रूढींना आव्हान दिले. शिक्षण हे माणसाला केवळ ज्ञान देणारे साधन नसून त्याला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देणारे माध्यम आहे, हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर ठेवला. त्यांनी पेटवलेली परिवर्तनाची ज्योत आजही समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी मार्गदर्शक आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री माननीय शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने मा. बालाजी तुकाराम कदम पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांचा आणि संघटनात्मक कार्याचा वारसा पुढे नेत, राज्यभरात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्याच्या नेतृत्वाचा निश्चितच मोठा हातभार लागेल, असा विश्वास आहे.
नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. बालाजी तुकाराम कदम पाटील यांना पुढील वाटचालीस आणि नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातील २६/११ शहीद स्मारकाला भेट देऊन, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूरवीर पोलीस अधिकारी, जवान आणि सुरक्षा रक्षकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं. देशाच्या आणि मुंबईकरांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेलं सर्वोच्च बलिदान आपण कधीच विसरू शकणार नाही.
या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली..!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
लाईव्ह | 📍 मुंबई | पत्रकारांशी संवाद 26-11-2026 xitter.gq/i/broadcasts/2AMjBvjOO…
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या MHT- CET परिक्षेतील गैरप्रकरांबाबत घोटाळेबाज कंपन्या कशा पद्धतीने पैसे घेऊन प्रवेश मॅनेज करत आहेत याचे स्टिंग ऑपरेशन, डेटा लिक प्रकरण तसेच २०२७ च्या परीक्षेतसुद्धा आतापासून होत असलेला घोळ याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत सर्व पुरावे सादर करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याचा थेट फटका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे.
सोबत जोडलेल्या QR मध्ये सर्व व्हिडिओ आणि ऑडिओ आहेत, ते सर्वानी नक्की ऐकावेत. एवढे पुरावे सादर करूनही सरकार साधी FIR देखील नोंद करत नाही, याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असे घोळ होत असतील, तर हे नक्कीच शोभणारे नाही. या गोष्टी थांबणार नसतील, तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि एकंदरीतच राज्याचे नेतृत्वच निष्क्रिय आहे, असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. असो, या उच्च तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भोंदू खरातसमोर पार वाकून नमस्कार करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून अपेक्षा तरी कशी करायची?
“आगामी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष दुष्काळी उपाययोजनांचे मुद्दे विधानसभेत प्रामुख्याने मांडेल”; मुंबईतील प्रदेश कार्यालयातील बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे ह्यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे:
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या पोलीस, जवान आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, सुनील भुसारा, मिलिंद कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा माननीय डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने, तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मा.संगीता वाझे यांची राज्य मुंबई महिला अध्यक्ष (NMC) पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत, मुंबईतील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच मोठा हातभार लागेल, असा विश्वास आहे.
नवनिर्वाचित राज्य मुंबई महिला अध्यक्ष (NMC) मा. संगीत वाझे यांना पुढील वाटचालीस आणि नव्या जबाबदारीसाठी खूप खूप शुभेच्छा!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा माननीय डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने, तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष (NMC) पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच मोठा हातभार लागेल, असा विश्वास आहे.
नवनिर्वाचित महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष (NMC) मा. ॲड. अंजली साळवे-विठणकर यांना पुढील वाटचालीस आणि नव्या जबाबदारीसाठी खूप खूप शुभेच्छा!
आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या वतीने मुंबईतील ‘प्रदेश कार्यालया’त सर्व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यातील दुष्काळाची सद्यस्थिती, आगामी काळातील आव्हाने, सरकारी उपाययोजना आणि मदत यांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात येत आहे.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
We are admitting Baba to Breach Candy Hospital. It appears to be dehydration.
He needs to slow down and travel less, but Baba just doesn't listen. He loves his work far too much.
Thank you all for your concern and good wishes.🙏🏻
डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते.
बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार. 🙏🏻
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
आदरणीय पवार साहेब यांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुप्रियाताई सध्या प्रत्यक्ष साहेबांना भेटून पुन्हा बैठकीसाठी येत आहेत. सध्या साहेबांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू राहतील. त्यामुळं साहेबांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये!
धन्यवाद ..!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
मुंबई येथील पोलीस स्मारक तसेच शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या स्मारकास भेट देऊन २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सामना करताना शहीद झालेल्या वीरांना विनम्र अभिवादन केले. या वीरांनी दाखवलेले अतुलनीय शौर्य, धैर्य आणि देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान सदैव स्मरणात राहील.
वैयक्तिक टीका करणं हे माझं राजकारण नाही.त्यामुळे व्यक्तींवर वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा मी प्रशासन आणि यंत्रणेवर बोलेन.








































