Aniruddha P (@Anyaped) header
Aniruddha P (@Anyaped) profile picture

Actor|Director| sometimes writing ✍ Drama teacher for Schools. 👏दैवत- छ. शिवाजी महाराज. कोकण, रत्नागिरी = प्रेम❤ Only #मनसे

Mumbai, Ratnagiri
Joined June 2010
Photo by Aniruddha P (@Anyaped)Photo by Aniruddha P (@Anyaped)Photo by Aniruddha P (@Anyaped)Photo by Aniruddha P (@Anyaped)Photo by Aniruddha P (@Anyaped)Photo by Aniruddha P (@Anyaped)Photo by Aniruddha P (@Anyaped)Photo by Aniruddha P (@Anyaped)Photo by Aniruddha P (@Anyaped)Photo by Aniruddha P (@Anyaped)
Aniruddha P retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! राज ठाकरे ।
735
1,063
181
5,512
520,506
गुड मार्निंग #कोकण! 🌼🙌 #कुडाळ
3
4
47
699
Aniruddha P retweeted
KL Rahul has to be one of the most comfortable Indian batters on difficult overseas pitches. The technique, the composure and the calmness he brings to the crease are simply outstanding. A pleasure to watch him bat. @klrahul
63
517
12
9,445
211,643
Aniruddha P retweeted
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं ! सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील. भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे ! राज ठाकरे ।
281
1,781
41
8,541
231,789
Aniruddha P retweeted
24 घंटे हो गए मोदी जी। मैंने आपको चैलेंज दिया है। आप कहते हो कि opposition देशद्रोही है। किसी भी स्टेज पे आप जगह चुनिए, डिबेट कीजिए मेरे साथ। देशद्रोही कौन है? विदेशी फोर्सेस का कनेक्शन किसका है? और किस प्रकार का कनेक्शन है? जल्दी से जल्दी कीजिए, डरिए मत। दोनों मिलेंगे, मीडिया होगी, देश के युवा होंगे, टेबल होगी, एक साइड आप बैठोगे, एक साइड मैं बैठूंगा। जिसको आप जज बनाना चाहते हो, बना दो। मोहन भागवत जी को बिठा दो, चलो। और फिर डिबेट करते हैं। सवाल उठेंगे फाइनेंशियल सिस्टम पर, फाइनेंशियल स्ट्रक्चर पर, US डील कैसे हुई, क्यों हुई, इतनी जल्दी क्यों हुई, सिर्फ आपने क्यों की, कैबिनेट को क्यों नहीं बताया, अडानी का केस बंद क्यों हुआ, Epstein - ऐसी बहुत सारी चीजें हैं जिसपे खुलकर डिस्कशन होगा। आ जाइए, डरिए मत। दूध का दूध, पानी का पानी कीजिए। आप एलिगेशन लगाते हैं ना मेरे ऊपर, आ जाइए, सब साफ हो जाएगा। बाकी चीजों पे आपने defamation केस लगा रखा है, शायद 45 defamation केस मेरे ऊपर हैं। मगर इस डिबेट मामले पे, foreign कनेक्शन पे आप defamation नहीं लगा रहे हो। लगाइए ना, वहाँ भी डिस्कस करेंगे, खुल के। ये सब डिस्कस करते हैं, आइए। हैप्पी दिवाली, मोदी जी। It’s been 24 hours since I challenged you, Modi ji. You say the Opposition is anti-national. Choose any stage, any venue, and debate me on this - Who is anti-national? Who has connections with foreign forces? And what is the nature of those connections? Let’s do this as soon as possible. Daro mat! We’ll both be there. The media will be there. The youth of this country will be there. There will be a table. You’ll sit on one side, I’ll sit on the other. You can appoint whoever you want as the judge. You can even make Mohan Bhagwat ji the judge. There will be questions about the financial system, the financial structure, how the US deal happened, why it happened and why so quickly, why you made the deal alone and didn’t inform the Cabinet, why the Adani case was closed, Epstein - and many other issues. We’ll discuss all of them openly. Let the truth come out. Let everything be crystal clear. You make allegations against me, don’t you? Come forward. Everything will become clear. You’ve filed defamation cases against me over other matters. I think there are around 45 defamation cases against me. But on this issue of the debate, on the question of foreign connections, you haven’t filed a defamation case. Go ahead, file one. We’ll discuss that openly too. Happy Diwali, Modi ji.
13,849
29,164
3,331
107,865
8,033,759
Aniruddha P retweeted
टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्जत येथे सभेला संबोधित केलं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे म्हणल्यावर कर्जत येथे इंटरनेट बंद केलंय म्हणे. इंटरनेट बंद केलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो का? नुसतं कर्जतमध्ये बंद केलंय, पण बाकी अख्खं जग बघतंय. अर्थ्या तासात सगळं भाषण युट्युबवर पडेल मग सगळं जग बघेल. हे लोकं कोणत्या जगात जगतात तेच कळत नाही. मनात काळं असेल तर अशा गोष्टी करायच्या सुचतात. * आज सकाळी जंगलात जी झाडे तोडली आहेत ती बघायला गेलो होतो, तिथं लाकडं रचून ठेवली होती. तोडलेल्या झाडांची रचलेली लाकडं पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं. * हे राज्यात बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. कोणता प्रकल्प करायचा, कसा करायचा हे सगळं दिल्लीत ठरतं. * मी पूर्वीपासून सांगत होतो, हा महाराष्ट्र जर या दोघांच्या हातात गेला तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हातात राहणार नाही. * आज तुम्ही रडत बसता आणि निवडणुकीच्या तोंडावर जातीच्या, धर्माच्या नावावर यांना मतदान करता. परत पुढचे पाच वर्ष रडत बसता. किती काळ हे चालू राहणार. * आमच्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतायत. हे १५०० रुपये देऊन तुमची तोंडं बंद केली जात आहेत. * त्यादिवशी मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकत होतो. मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले, केंद्राने आणि एका खाजगी कंपनीने ठरवून आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला. हे सगळं केंद्रात ठरतं हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं. * सत्तेची भिती, पदाची भिती या भितीमधून या गोष्टी घडतात. हा असा गप्प, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा हा महाराष्ट्र? गुजरातमधली २ माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार? * आज मी जंगलात भेट दिली तेव्हा मला महिला भेटल्या. हात जोडून विनंती करत होत्या, आमचं जंगल वाचवा. तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? तुमचे कोयते काय करतात अशावेळी ? * आज भीमाशंकरचा प्रकल्प आलाय. त्याचं टेंडर वगैरे काही नाही असाच देऊन टाकलाय. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अशाच प्रकारचे एकूण २३ प्रकल्प येत आहेत. * यापुढे महाराष्ट्रात जे खाजगी प्रकल्प येत आहेत. त्यांना जे पाणी आणि वीज लागणार आहे त्याची तरतूद व्हावी यासाठीची पूर्वतयारी म्हणून हे प्रकल्प सुरू केले जात आहेत * या सगळ्यातून तुमचे मतदारसंघ फोडले जात आहेत असे प्रकल्प आले की तुम्ही आहात त्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होणार. आणि तिथे दुसरे लोकं स्थायिक होणार. हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. * सर्बियामध्ये तरुणांनी, तिथल्या जेनझीने सत्तापालट करून दाखवला. मी आधीही माझ्या भाषणांत सांगितलंय जेनझी या महाराष्ट्राच्या खेडापाड्यातसुद्धा आहे. तुम्ही कधी जागे होणार आहात? * तुम्ही जर शांत बसणार असाल तर मला तुमचं नेतृत्व नाही करायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणायचं आणि पेटून उठायचं नाही याला काय अर्थ आहे? * गडचिरोलीत शेतीची सुपीक जमीन आणि जंगलातली झाडे कापून ती जमीन एका खाणीसाठी दिली. * जंगलातली झाडं जेव्हा तोडली तेव्हा त्या झाडावर राहणारे पक्षी वर हवेत घिरट्या घालत होते. ही घिरट्या घालायची वेळ पुढच्या काळात तुमच्यावरसुद्धा येणार आहे. * हे सगळे प्रकार, त्यासाठी केलेली आंदोलनं, मोर्चे हे तुम्ही निवडणुकीच्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर उपयोग काय या सगळ्या आंदोलनांचा? * ज्या सह्याद्रीत शिवछत्रपती खेळले, बागडले तो सह्याद्री आज महाराष्ट्राचेच लोक संपवत आहेत. आणि महाराष्ट्रातला नागरिक हताश होऊन बघत बसला आहे. याबद्दल शिवछत्रपतींना काय वाटत असेल, याचा एकदा विचार करा. * या सगळ्या अन्यायाविरोधात जर आपल्याला लढता येत नसेल तर परमेश्वरच वाचवू शकेल या महाराष्ट्राला. * शिवरायांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय कोणतंही झाड कापले जाऊ नये. निदान त्या शिवछत्रपतींचं तरी ऐकणार आहोत की नाही आपण? * महावितरणचा IPO डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार लाँच करणार आहे. म्हणजे यापुढे तुमच्या घरात येणाऱ्या वीजेचा दर हे सरकार नाही तर एक खाजगी कंपनी ठरवणार आहे. * जिथे जिथे महाराष्ट्रावर संकट येईल तिथे महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. हा महाराष्ट्र वेगवेगळा ठेऊन चालणार नाही नाहीतर यांना जे साध्य करायचंय ते साध्य होईल. * उद्या टोरंटचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याचं वितरण कसं होणार आहे? कुठे होणार आहे? कुणामार्फत होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने जरूर दिली पाहिजेत. * तुम्हाला मी आत्ता सांगतो, आज या गोष्टी तुम्ही हसण्यावारी नेत आहात. भविष्यात तुमची पोरं म्हणतील, माझा बाप नालायक निघाला. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा लक्ष दिलं नाही. * जर तुम्ही जागे असाल आणि पेटून उठलात तर त्या एकाच गोष्टीला जगातलं कोणतंही सरकार घाबरतं.हे जर नको असेल तर लोण्यासारखे थंड बसा. * जर आपली जंगलं वाचवायची असतील तर शिवछत्रपतींचे आज्ञापत्र वाचा. महाराष्ट्रातला माणूस पेटून उठला या गोष्टीचा शिवछत्रपतींनाही आनंद वाटेल. * मी उद्योगधंद्यांविरोधातला माणूस नाही, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हे माझंही मत आहे. पण महाराष्ट्राला काय हवं आहे हे महाराष्ट्रातल्या माणसांनी ठरवलं पाहिजे. दुसरं कोणी ठरवून चालणार नाही. * मला फक्त एवढंच सांगायचंय जिवंत रहा. जी लढाई करायचीय त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचंय. मी तुमच्या बरोबर आहे पण नेतृत्व तुम्हालाच करायचंय. मलाही बघायचं आहे, महाराष्ट्र जिवंत आहे की नाही. * शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर सुद्धा १२५ वर्षे या संपूर्ण हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं. तो मराठी माणूस आज शांत कसा बसलाय? * मला पोलिसांनाही सांगायचंय त्यांना साथ देऊ नका. तुम्हीही या महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत. उद्या तुमच्याही घरावर टकटक होणार. राज ठाकरे ।
139
1,042
23
5,165
98,888
सह्याद्री जागा हो..! #भीमाशंकर #Bhimashankar #Karjat
13
114
4
528
7,638
Aniruddha P retweeted
आज २८ ऑक्टोबर कर्जत येथे टोरेंट कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी जी बेसुमार जंगलतोड सुरु केली आहे त्या जागेला भेट दिली. गुजरातमधल्या एका कंपनीला काम मिळावं म्हणून हा सारा खटाटोप सुरु आहे . बाकी आज संध्याकाळच्या कर्जत येथील पोलीस ग्राउंडवरच्या सभेत सविस्तर बोलेनच.
174
1,538
21
7,279
135,973
Aniruddha P retweeted
“वृक्ष लागवड” “झाडं लावणं” असं काही असतं? की आपण ‘रोपं’ लावतो? रोपांचे वृक्ष होणं ही फार जिकिरीची आणि प्रचंड वेळ घेणारी प्रक्रिया असते. ‘अमुक इतकी झाडं पाडणं = अमुक इतकी रोपं लावणं’ असं असू शकतं? #GlobalPhenomenon
255
5
1,235
15,110
Aniruddha P retweeted
आज पुण्यातील एम.पी.एस.सी. आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
95
661
13
4,497
89,786
एखाद्याच्या आयुष्यात सामील होणं सुंदर आहे.. . . पण एखाद्याच्या आयुष्यात सामील होताना स्वतःच्या आयुष्यातूनच बाहेर पडणं योग्य नाही.. 🌼 #स्वसंवाद_वैशाली ✍️
2
5
1
72
1,307
सुंदर मेसेज - गणपती बाप्पाकडे फक्त मागू नका.. काहीतरी देऊनही बघा.. कारण मागण्यात इच्छा असते तर अर्पणातच खरी भक्ती दडलेली असते.. 🌺
अर्पण…. नक्की बघा आणि आपला अभिप्राय द्या. youtu.be/bbGM5o0hLkM?si=QlAs… गणपती बाप्पा मोरया! - Zyada Matt Soch Stories beyond imagination ✨ #Shortfilm #Direction #Writing #Youtube
2
2
13
896
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक रंगबेरंगी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. #आषाढी_एकादशी #Ashadhiekadashi2026
10
137
4
1,007
14,802
Aniruddha P retweeted
केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे . मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं. काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, 'लेम डक' प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला ! माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती 'परीक्षा पे चर्चा' इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा. लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे ! या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !
93
712
21
2,697
70,975
Aniruddha P retweeted
असो , अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा व्हायलाच हवा आणि परीक्षांमध्ये पारदर्शीपणा यायलाच हवा हे महत्त्वाचे ! आंदोलनं चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो तर आंदोलन होऊ न देण्यात आणि झालंच तर सामंजस्याने सोडवण्यात खरा मोठेपणा असतो. मोठेपणा हा सर्वोच्च व्यवस्थेने दाखवायचा असतो हे भान अजून सुटलेलं नाही हे दाखवण्याची संधी गमावू नये. राज ठाकरे ।
11
172
3
828
13,308
Aniruddha P retweeted
India has awakened Inqalab Zindabad 🇮🇳
4,214
15,681
601
104,966
3,487,917
सोनम वांगचुक ह्यांच्या बाबत थोडेसे... अंधभक्तांनो थोडा वेळ काढून हे ऐका, आणि चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका रे... सांगा मोदींना, घ्या ना राजीनामा त्या धर्मेंद्र चव्हाण चा काय फरक पडणार आहे, कोणते लय देश उपयोगी काम करत आहे ते.... #I_sipport_sonam_wangchuk
11
38
1,297
एक रुपयाच्या melody chocolate ला राष्ट्रीय हेडलाईन्स बनवणारी विकलेली media, २२ लाख मुलांच्या NEET पेपर फुटीवर चुपचाप आहे... जनतेच्या भविष्यावर प्रश्न उभे राहिले तरी सत्ता शांत राहिली, मग प्रश्न पडतो-हीच का जबाबदार सरकारची ओळख?
12
44
1
313
5,375
तूमचा दिपकेला विरोध आहे?! ठीके! तूमचा वांगचुक सरांवर विश्वास नाही?! ठीके! पण पेपर लीक झाले हे तर खरंय?! २०,२२ विद्यार्थी मेले. हे तर खरंय?! मग प्रश्नं कोण विचारतोय पेक्षा ती व्यक्ती बरोबर प्रश्नं विचारत्ये हे तर खरंय ना?! मग तरीही तूम्हाला हे महाशय धर्मेंन्द्र प्रधान कसे चालतात?! काही उत्तरदायित्व आहे की नाही त्यांचं?! आणि हे आपल्याला कधी समजणार की लोकशाहीत आपण मालक आहोत! विचारधारा काहीही असो! सत्ताधाऱ्यांना जाब विचारलाच पाहिजे!
91
284
8
1,351
35,960
Aniruddha P retweeted
या देशाच्या इतिहासात हुकुमशहा नरेंद्र मोदींसारखा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही. तो इतका वाईट माणूस आहे की मुलांवर लाठीचार्ज करतो, भारताच्या इतिहासात असा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, मोदी पंतप्रधान आहेत ही आपल्या देशासाठी शरमेची गोष्ट आहे. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी #AbhijeetDipake #NarendraModi #CockroachJanataParty #PMModi (Abhijeet Dipake, Narendra Modi, Cockroach Janata Party, PM Modi)
91
316
11
1,640
22,429