PRO Bhandup Mahavitaran retweeted
अभय योजना २०२६-२७
महावितरणची अभय योजना २०२६-२७ ही दि. १५ जानेवारी २०२७ पर्यंत लागू असून, संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. येत्या दि. १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सहभागी झाल्यास मूळ थकबाकीमध्ये आणखी २० टक्क्यांपर्यंत सूट. यासह विविध आकर्षक सवलती.
पात्र बिगरकृषी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे अर्ज करावा किंवा नजिकच्या कार्यालयात संपर्क साधावा.
portal.mahadiscom.in/abhay_y…
#Mahavitaran #MSEDCL #AbhayYojana
PRO Bhandup Mahavitaran retweeted
दिवाळी आणि भाऊबीजेचा आनंद सर्वजण कुटुंबीयांसोबत साजरा करत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुचरी आणि तेरे परिसरातील नागरिकांवर मात्र अंधाराचे सावट पसरले होते. ऐन दिवाळीत मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळामुळे तब्बल ४० वीज खांब कोसळले आणि ८ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद झाला. परिणामी सुमारे ५०० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
घनदाट जंगल, दुर्गम भाग आणि सततची आव्हाने समोर असतानाही महावितरणच्या जिगरबाज अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी स्वतःचा सण बाजूला सारत सलग ५ दिवस अहोरात्र मेहनत घेतली. हे काम पूर्ण करायला १०-१२ दिवस लागण्याची शक्यता असताना केवळ ५ दिवसांत वीजयंत्रणा पुन्हा उभी करत या शिलेदारांनी ग्राहकांचे घर पुन्हा प्रकाशमान केले.
अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे, उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी तसेच जनमित्र रवी कदम, ओंकार कळंबटे, किशोर लाड, अंकेश गेले, राहुल धनावडे, विश्वनाथ जोशी, विलास भरणकर, अक्षय खानविलकर, किरण मोरे, विनिल काष्टे आणि रमेश कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
#Mahavitaran #MSEDCL
PRO Bhandup Mahavitaran retweeted
Maharashtra's Solar Power Surge: 128% Growth in Just One Year!
Maharashtra is making remarkable strides in its solar energy journey! Driven by the strong response to the PM Surya Ghar: Muft Bijli Yojana, rooftop solar installations have surged from 3.92 lakh in December 2025 to an impressive 8.95 lakh in November 2026.
With ₹6,375 crore in central subsidies and a rooftop solar generation capacity of 3,392 MW, Maharashtra accounts for over 21% of the central subsidy disbursed nationwide. Nagpur leads the state's district-wise performance with 1,26,273 installations, followed by Pune with 65,948.
Beyond clean energy, rooftop solar is delivering tangible benefits to households, offering potential monthly electricity bill savings of ₹800 to ₹2,400, along with the opportunity to benefit from surplus power supplied to the grid.
Mahavitaran is powering Maharashtra's solar transformation, enabling households to embrace clean energy, save on electricity costs and contribute to a greener, energy-secure future!
#Mahavitaran #MSEDCL #RooftopSolar #PMSuryaGhar #SolarEnergy #RenewableEnergy #GreenMaharashtra
PRO Bhandup Mahavitaran retweeted
सूर्यशक्तीचा सूर्योदय! महाराष्ट्राची सौर ऊर्जेत ऐतिहासिक झेप!
महाराष्ट्राच्या घराघरांत आता सूर्यऊर्जेचा प्रकाश पोहोचत आहे! ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’ला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये ३.९२ लाख असलेली रूफटॉप सोलर प्रकल्पांची संख्या नोव्हेंबर २०२६ मध्ये तब्बल ८.९५ लाखांवर पोहोचली आहे. अवघ्या एका वर्षात झालेली ही १२८ टक्क्यांची वाढ राज्याच्या सौर ऊर्जेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
देशभरात वितरित झालेल्या एकूण केंद्रीय अनुदानापैकी २१ टक्क्यांहून अधिक वाटा महाराष्ट्राने मिळवला असून, पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत तब्बल ६,३७५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यामुळे राज्याची रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ३,३९२ मेगावॅटवर पोहोचली आहे. जिल्हानिहाय कामगिरीत नागपूर १ लाख २६ हजार २७३ प्रकल्पांसह आघाडीवर असून, पुणे जिल्ह्यात ६५ हजार ९४८ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यांनीही या अभियानात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
विशेष म्हणजे, सौरऊर्जेमुळे ग्राहकांना दरमहा ८०० ते २,४०० रुपयांपर्यंत वीजबिलात बचत करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे सौरऊर्जा ही केवळ पर्यावरणपूरक वीज निर्मिती न राहता सर्वसामान्यांच्या आर्थिक बचतीचे प्रभावी साधन ठरत आहे.
महाराष्ट्राची सौर भरारी नवनवीन विक्रम प्रस्थापित करत असून, देशाच्या हरित ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देत आहे.
#Mahavitaran #MSEDCL #RooftopSolar #PMSuryaGhar #SolarEnergy #RenewableEnergy #GreenMaharashtra
PRO Bhandup Mahavitaran retweeted
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या राजकीय आणि आर्थिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त महावितरण परिवारातर्फे विनम्र अभिवादन! राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प करूया!
#Mahavitaran #MSEDCL #IndiraGandhiJayanti
PRO Bhandup Mahavitaran retweeted
Powering Maharashtra's Next Energy Revolution!
From 15% to 52% renewable energy by 2030, Maharashtra is accelerating its transition towards a cleaner energy future.
With peak electricity demand projected to reach 45 GW by 2030 and data centres emerging as a major driver of consumption, Mahavitaran is geared towards supporting the state's evolving energy needs.
The ambition is clear: 65% renewable energy in the coming decade.
Building a future powered by clean energy, innovation and reliability!
Read the full article: bloomberg.com/news/articles/…
#Mahavitaran #MSEDCL #RenewableEnergy #CleanEnergy #EnergyTransition
PRO Bhandup Mahavitaran retweeted
मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनात गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात मानव संसाधन विभागाने राबवलेल्या विविध उल्लेखनीय कामगिरीचा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा लेखाजोखा मांडणारे ‘प्रकाशगाथा; महावितरणच्या मानव संसाधनाची!’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी पुस्तकाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना सविनय भेट दिली. या पुस्तकाचे मा. मुख्यमंत्री महोदयांनी आस्थेने अवलोकन करत महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक योगदानाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#Mahavitaran #MSEDCL
PRO Bhandup Mahavitaran retweeted
प्रत्येक बालकाला शिक्षण, संधी आणि प्रगतीची समान संधी मिळो. सर्व बालकांना महावितरण परिवारातर्फे बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Mahavitaran #MSEDCL #ChildrensDay
🤖 Made with AI
PRO Bhandup Mahavitaran retweeted
स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही संस्थांची उभारणी, वैज्ञानिक संशोधन, उच्च शिक्षण आणि औद्योगिक विकासाला चालना देणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महावितरण परिवारातर्फे विनम्र अभिवादन!
#Mahavitaran #MSEDCL #PanditJawaharlalNehruJayanti
PRO Bhandup Mahavitaran retweeted
ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करत आदिवासी समाजाचे हक्क, जल-जंगल-जमिनीवरील अधिकार आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी लढा देणारे महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महावितरण परिवारातर्फे विनम्र अभिवादन!
#Mahavitaran #MSEDCL #BhagwanBirsaMundaJayant
PRO Bhandup Mahavitaran retweeted
हरित ऊर्जेत महाराष्ट्राच्या कामगिरीला राष्ट्रीय पावती; मा. उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचा गौरव!
केंद्र शासनाच्या नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) यांच्या मूल्यांकन अहवालानुसार 'रिन्युएबल एनर्जी स्टेट असेसमेंट फ्रेमवर्क' (RE-SAF) अंतर्गत भारतामध्ये हरित ऊर्जेच्या निर्मिती आणि विकासात महाराष्ट्र राज्याला देशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये द्वितीय स्थान मिळाले.
मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पर्यावरणपुरक ५०० गिगावॅट हरित ऊर्जेच्या राष्ट्रीय ध्येयाकडे महाराष्ट्राने घेतलेल्या भरारीला राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित 'भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन २०२६' (Bharat RE Summit & Expo 2026) च्या समारोप सोहळ्यात, आज दि. ५ नोव्हेंबरला मा. उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांना पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान करून महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री मा. श्री. प्रल्हाद जोशी व राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
#Mahavitaran #MSEDCL #RenewableEnergy #GreenEnergy
PRO Bhandup Mahavitaran retweeted
भारत के नवीकरणीय ऊर्जा मानचित्र पर महाराष्ट्र की चमक!
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन के लिए महाराष्ट्र को राष्ट्रीय स्तर पर पहचान मिली है। Renewable Energy State Assessment Framework (RE-SAF) के तहत देश के सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने वाले राज्यों में महाराष्ट्र ने दूसरा स्थान हासिल किया है।
केंद्रीय नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) और पावर फाइनेंस कॉर्पोरेशन (PFC) द्वारा किए गए मूल्यांकन के आधार पर महाराष्ट्र को यह सम्मान मिला है। यह उपलब्धि भारत के स्वच्छ ऊर्जा परिवर्तन में महाराष्ट्र के महत्वपूर्ण योगदान को दर्शाती है।
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा के क्षेत्र में निरंतर प्रगति कर रहा है और भारत के 500 गीगावाट नवीकरणीय ऊर्जा क्षमता के महत्वाकांक्षी लक्ष्य को हासिल करने में अपना योगदान दे रहा है।
5 नवंबर 2026 को नई दिल्ली में आयोजित Bharat RE Summit & Expo 2026 के समापन समारोह में भारत के माननीय उपराष्ट्रपति श्री सी. पी. राधाकृष्णन के हाथों महाराष्ट्र की ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर और अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला ने महाराष्ट्र की ओर से यह प्रतिष्ठित RE-SAF पुरस्कार प्राप्त किया।
इस अवसर पर केंद्रीय नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री प्रल्हाद जोशी और केंद्रीय नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा राज्य मंत्री श्री श्रीपाद नाईक भी उपस्थित थे।
महाराष्ट्र के लिए गर्व का क्षण और स्वच्छ एवं टिकाऊ ऊर्जा भविष्य की दिशा में एक महत्वपूर्ण उपलब्धि!
#Mahavitaran #MSEDCL #RenewableEnergy #GreenEnergy #SustainableMaharashtra #BharatRESummit2026
PRO Bhandup Mahavitaran retweeted
Maharashtra Shines on the National Renewable Energy Map!
Maharashtra has earned national recognition for its outstanding performance in the renewable energy sector, securing the 2nd rank among the best-performing states in India under the Renewable Energy State Assessment Framework (RE-SAF).
This recognition, based on the assessment by the Ministry of New and Renewable Energy (MNRE) and Power Finance Corporation (PFC), acknowledges the state's significant contribution to India's clean energy transition.
Under the leadership of Hon'ble Chief Minister Shri Devendra Fadnavis, Maharashtra continues to make remarkable strides towards a sustainable and environmentally responsible energy future, contributing to India's ambitious target of 500 GW of renewable energy.
The prestigious award was presented by Hon'ble Vice-President of India Shri C. P. Radhakrishnan to Maharashtra's Minister of State for Energy, Smt. Meghna Sakore-Bordikar, and Additional Chief Secretary (Energy), Smt. Abha Shukla, in the presence of Shri Pralhad Joshi, Minister of New and Renewable Energy, and Shri Shripad Naik, Minister of State for New and Renewable Energy, at the concluding ceremony of Bharat RE Summit & Expo 2026 in New Delhi on November 5, 2026.
A national recognition of Maharashtra's green energy leadership and a strong step towards a sustainable tomorrow!
#Mahavitaran #MSEDCL #RenewableEnergy #GreenEnergy #SustainableMaharashtra #BharatRESummit2026
PRO Bhandup Mahavitaran retweeted
Under the leadership of Hon'ble Chief Minister Shri Devendra Fadnavis, Maharashtra has achieved national recognition for its remarkable progress in renewable energy. The Renewable Energy State Assessment Framework (RE-SAF) Award, recognising the State's second-place ranking nationally, was presented by Hon'ble Vice-President Shri C. P. Radhakrishnan to Maharashtra's Minister of State for Energy, Smt. Meghna Sakore-Bordikar, and Additional Chief Secretary (Energy), Smt. Abha Shukla, in the presence of Shri Pralhad Joshi, Minister of New and Renewable Energy, and Shri Shripad Naik, Minister of State for New and Renewable Energy, in New Delhi.
@CMOMaharashtra | @CPR_VP | @MeghnaBordikar | @JoshiPralhad | @shripadynaik
#Mahavitaran #MSEDCL
PRO Bhandup Mahavitaran retweeted
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. महावितरण परिवारातर्फे धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#Mahavitaran #MSEDCL #Dhanteras
PRO Bhandup Mahavitaran retweeted
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचा सामाजिक पुढाकार!
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ कोटी ६८ लाख १७ हजार ८८७ रुपयांचे योगदान दिले आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने या मदतकार्यात सहभाग नोंदवला.
मुंबई येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मदतीचा धनादेश अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सुपूर्द केला. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी. तसेच महावितरणचे संचालक श्री. धनंजय औंढेकर (संचालन), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. अनुदीप दिघे (वित्त) आणि श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) उपस्थित होते.
#Mahavitaran #MSEDCL
PRO Bhandup Mahavitaran retweeted
दीपावलीचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येवो. महावितरण परिवारातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#Mahavitaran #MSEDCL #Diwali
PRO Bhandup Mahavitaran retweeted
MSEDCL’s ambitious growth and transformation roadmap takes centre stage!
In a conversation with ET Manufacturing, Shri Lokesh Chandra, Chairman and Managing Director, MSEDCL, highlighted the company’s proposed IPO, ₹60,000 crore investment plans, and focus on strengthening power infrastructure, operational efficiency and renewable energy integration.
Read the full article: manufacturing.economictimes.…
#Mahavitaran #MSEDCL
PRO Bhandup Mahavitaran retweeted
बहिण-भावाच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकी अधिक दृढ होवो. महावितरण परिवारातर्फे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
#Mahavitaran #MSEDCL #BhaiDooj















