
Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra
Maharashtra, India
Joined August 2014
- Tweets41.2K
- Following198
- Followers35K
- Likes5.8K
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार महेशजी लांडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
#महेश_लांडगे
#Mahesh_Landge
@maheshklandge @BJP4Maharashtra
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद जोशी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।
आप स्वस्थ और दीर्घायु रहें, ईश्वर से यही कामना करता हूं।
#प्रल्हाद_जोशी
#Pralhad_Joshi
@JoshiPralhad @BJP4India
राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका, वंदनीय लक्ष्मीबाई केळकर (मावशी) यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि राष्ट्रनिष्ठा यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
#LaxmibaiKelkar #लक्ष्मीबाईकेळकर
लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळंकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#गणेशवासुदेवमावळंकर #GVMavalankar #FirstLokSabhaSpeaker
आज मुंबई येथे माझ्या हस्ते ‘एकल पाल्य समुपदेशन’ उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण पार पडले. एकल मातांच्या पाल्यांचे उच्च शिक्षण आर्थिक, सामाजिक किंवा भावनिक अडचणींमुळे थांबू नये, यासाठी शासनाने हा संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे.
या विद्यार्थ्यांना हक्काचा आधार मिळावा आणि योजनांची माहिती व योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी राज्यातील १२३८ अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी एका समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. हेमलता बागला समितीच्या शिफारशी व राज्यव्यापी सर्वेक्षणाच्या आधारे या विद्यार्थ्यांसाठी ठोस योजना आखल्या जात आहेत.
या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात उद्या, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथील 'MSFDA' संस्थेत निवडक मुख्य प्रशिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा होणार असून, हे प्रशिक्षक पुढे सर्व महाविद्यालयीन समुपदेशकांना प्रशिक्षण देतील. विद्यार्थ्यांना हक्काचा आधार आणि सुरक्षित शैक्षणिक परिसर मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, सहसचिव प्रताप लुबाळ, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल आणि सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
📍 २६ नोव्हेंबर २०२६, मुंबई
#SingleChildCounseling #HigherEducationMaharashtra #StudentWelfare #MaharashtraGovt #MSFDA #InclusiveEducation
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचा आज होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई येथे आढावा घेतला. यावेळी प्रलंबित प्रकरणांची सद्यस्थिती आणि त्यावरील पुढील कार्यवाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
तसेच, सीओईपीमधील पदभरती प्रक्रियेसाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) तातडीने देण्याचे निर्देश दिले. पदभरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून येत्या जून महिन्यापर्यंत उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रुजू होतील, या दृष्टीने कालमर्यादा निश्चित करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.
या प्रसंगी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, सहसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, सहसंचालक रुपेश राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
📍२६ नोव्हेंबर २०२६ | मुंबई
#HigherEducation #TechnicalEducation #COEP #AdministrativeReview #मुंबई #MaharashtraGovernance
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध!
आज मुंबईतील होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या विविध मागण्या आणि समस्या जाणून घेत त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येईल.
विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर निश्चितच सकारात्मक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी दिली.
या प्रसंगी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, समितीचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
📍२६ नोव्हेंबर २०२६ | मुंबई
#HigherEducation #Maharashtra #Education #EmployeeWelfare
#मुंबई
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचा, राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक न्यायाचा भक्कम आधार आहे. प्रत्येक नागरिकाला समान हक्क, सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य आणि प्रगतीच्या समान संधी देणारी ही मूल्यव्यवस्था आपल्या राष्ट्राची खरी ताकद आहे.
संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासोबतच, त्यातील कर्तव्यांचे भान ठेवून त्यांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानातील आदर्श केवळ विचारांपुरते मर्यादित न राहता ते आपल्या कृतीतून आणि आचरणातून प्रतिबिंबित व्हावेत, असा संकल्प आपण सर्वांनी करूया.
संविधान दिनानिमित्त मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लिहिलेला महत्त्वपूर्ण लेख प्रत्येकाने आवर्जून वाचावा, असे आवाहन करतो.
#संविधानदिन #SamvidhanGauravDiwas #ConstitutionDay #IndianConstitution
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
भारतीय संविधान हे आपल्यासाठी श्रद्धेचे प्रतीक आणि विकसित भारत @2047 च्या संकल्पपूर्तीचा मार्गदर्शक आहे.
#SamvidhanGauravDiwas
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
भारताच्या श्वेतक्रांतीचे जनक, पद्मविभूषण डॉ. वर्गीस कुरियन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सहकारी दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण स्वावलंबनाच्या माध्यमातून त्यांनी देशाला आत्मनिर्भरतेची नवी दिशा दिली. त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
#DrVergheseKurien #श्वेतक्रांती #डॉवर्गीसकुरियन
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांना आणि प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांचे अतुलनीय शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा सदैव आपल्या स्मरणात राहील. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करताना दहशतवादाविरोधातील आपला निर्धार अधिक दृढ करूया.
#2611 #MumbaiAttack #मुंबईहल्ला
भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
संविधान हे आपल्या लोकशाहीचा आत्मा, स्वातंत्र्याचे रक्षक आणि प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचा भक्कम आधार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला दिशा आणि सामर्थ्य देणारे आपले भारतीय संविधान हा आपल्या राष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे.
चला, संविधानातील मूल्ये, तत्त्वे आणि कर्तव्यांचे निष्ठेने पालन करून अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित भारत घडवण्याचा संकल्प करूया!
जय हिंद! 🇮🇳
#ConstitutionDay #संविधानदिन #भारतीयसंविधान
यवतमाळ येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी व वस्त्रोद्योग मिल परिसरात उपराष्ट्रपती मा. श्री. सी. पी. राधाकृष्णनजी आणि राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्माजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी मंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
स्वातंत्र्यलढ्यातील सहभागापासून ते पत्रकारिता, राजकारण आणि समाजसेवेपर्यंत बाबूजींनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवला. ग्रामीण विकास आणि समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण पर्व आहे.
त्यांचे विचार, मूल्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी नव्या पिढ्यांसाठीही दिशादर्शक ठरेल. बाबूजींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
📍२५ नोव्हेंबर २०२६ | यवतमाळ
#JawaharlalDarda #Babuji #Yavatmal #Maharashtra #Tribute
@CPR_VP @Jishnu_Devvarma @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाच्या विकासासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, या अंतर्गत रामटेक संस्कृत विश्वविद्यालय अधिनियम १९९७ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम १९८९ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तसेच, कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल व लेखे यांच्या संदर्भातील परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी सुधारणा करण्यात येणार आहे.
या दूरदर्शी निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक आभार!
#CabinetDecision #मंत्रीमंडळ_निर्णय #महाराष्ट्र #Maharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या कांस्य पुतळ्याचा अनावरण सोहळा
@CPR_VP @BJP4Maharashtra xitter.gq/i/broadcasts/2qVYzqaLL…
निर्णय महायुती सरकारचे, जनतेच्या हिताचे !
आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेले मंत्रिमंडळ निर्णय.
#मंत्रिमंडळ_निर्णय
#महाराष्ट्र_शासन
#maharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
बालेवाडीकरांचा मेट्रो प्रवास आता होणार अधिक सुखकर! 🚇
पुणे मेट्रोच्या विस्तारित सेवेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक गती मिळत आहे. आज, २५ नोव्हेंबरपासून पुणे मेट्रो मार्गिका ३ वरील बालेवाडी हाय स्ट्रीट (PMR 13) आणि बालेवाडी फाटा (PMR 14) ही दोन स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. दुपारी ३:३० वाजल्यापासून या स्थानकांवरून मेट्रो सेवा सुरू होणार आहे.
या नव्या सुविधेमुळे बालेवाडी परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल. पुणेकरांचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दिशेने पडलेले हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
#PuneMetro #Balewadi #Pune #MetroLine3 #ViksitPune
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
नक्षलवादावर निर्णायक विजय; विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल! 🇮🇳
वर्षानुवर्षे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या नक्षलवादाला निर्णायक आळा घालण्यात आलेले यश, हे नवभारताच्या सामर्थ्याचे आणि दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या ठाम रणनीतीमुळे देश नक्षलमुक्त भारताच्या ऐतिहासिक ध्येयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीनेही हे यश अत्यंत महत्त्वाचे आहे. नक्षलवादाचे आव्हान झेलणारा गडचिरोली जिल्हा आज शांतता, सुरक्षितता आणि औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे. संघर्षभूमी ते स्टील हब हा गडचिरोलीचा प्रवास नव्या विकासपर्वाची नांदी ठरत आहे.
या यशामागे आपल्या सुरक्षा दलांचे अतुलनीय शौर्य, पोलीस यंत्रणेचे समर्पण आणि स्थानिक जनतेचा विश्वास मोलाचा आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या योगदानाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
बंदुकीच्या आवाजाची जागा विकासाच्या संधींनी, भीतीच्या जागी विश्वासाने आणि संघर्षाच्या जागी समृद्धीने घ्यावी, हाच विकसित भारताचा संकल्प आहे!
#NaxalFreeIndia #ViksitBharat #NewIndia #Gadchiroli
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
उच्च शिक्षण विभागाची प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करणार; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव!
जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या नूतन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होईल.
विभागाच्या नवीन डिजिटल प्रणालीमुळे शासनाशी संबंधित ९८ ते ९९ टक्के कामकाज ऑनलाइन पद्धतीने होत आहे. राज्यातील सुमारे सहा हजार महाविद्यालयांचे कामकाज अधिक कार्यक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यासोबतच महाविद्यालयांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, समुपदेशन आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापन यांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि उच्च शिक्षण संस्थांची प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. पराग मसराम, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, उपविभागीय अभियंता एस. एल. देवरे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
📍जळगाव
#HigherEducation #Maharashtra #Jalgaon
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @SmitaWagh_ @SureshBhole1 @DeepmalaMKale
चाळीसगाव MIDC परिसरातील 'स्वयंदीप’ दिव्यांग महिला निवासी रोजगार प्रकल्पाला सदिच्छा भेट देऊन तेथील उपक्रमांची पाहणी केली. यावेळी प्रकल्पात कार्यरत असलेल्या दिव्यांग भगिनींनी आत्मीयतेने केलेले स्वागत खरोखरच भारावून टाकणारे होते.
या भेटीदरम्यान महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध रोजगार संधींची माहिती जाणून घेतली आणि या भगिनींच्या अदम्य जिद्दीचे व आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचे मनापासून कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दिव्यांग भगिनींना सहानुभूती नव्हे तर स्वाभिमानाने जगण्याची संधी देणारा 'स्वयंदीप'चा हा उपक्रम प्रेरणादायी असून, अशा सेवाभावी कार्याला पाठबळ देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम, भरत अमळनेर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
📍जळगाव
#Jalgaon #Chalisgaon #MIDC #Swyandeep #WomensEmpowerment #DivyangEmpowerment #SocialWork
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @mlamangeshbjp








































