
Official Handle of District Information Office, #KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra.
Kolhapur, India
Joined September 2012
- Tweets22.4K
- Following122
- Followers12.5K
- Likes1.6K
जल हेच जीवन!
महात्मा जोतीराव फुले यांनी 1883 सालीच पाण्याचे महत्व ओळखून जलसंधारणाचा मूलमंत्र दिला होता.
पाणी आडवा, पाणी जिरवा - हाच खरा विकासाचा मंत्र!
#महात्माफुले200
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
1
156
मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन..
शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करा, फार्मर आयडी मिळवा...
#शेतकरी
#ईकेवायसी
#शासकीययोजना
#AgriStack
@MahaDGIPR
146
#कोल्हापूर जिल्ह्यात जनगणनेचा दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे.या टप्प्यात प्रगणकांनी घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती काळजीपूर्वक भरावी,यात हलगर्जीपणा नको,असे निर्देश जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्यचे सह संचालक रमेश भोसले यांनी दिले.
@MahaDGIPR
1
209
#कोल्हापूर: राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी जीवन प्रमाण व आधार फेस आरडी ॲपद्वारे 30 नोव्हेंबरपर्यंत डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे
जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र भारमल यांचे आवाहन.
@MahaDGIPR
2
267
पालकसचिव जिल्ह्यांमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश : हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीरमध्ये सर्वेक्षण करून अहवाल सादर करा
#शेतकरी
#दुष्काळ
@MahaDGIPR
193
दुष्काळाबाबत गडहिंग्लज, हातकणंगले, करवीरसह कागलचे सर्वेक्षण होणार
चंद्रशेखर बावनकुळे यांचे दुष्काळ उपसमितीच्या बैठकीत निर्देश
#शेतकरी
#दुष्काळ
@MahaDGIPR
142
District Information Office, Kolhapur retweeted
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून आवश्यक उपाययोजनांना गती देण्यासाठी पालक सचिवांनी अधिवेशनापूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेट देऊन दुष्काळाच्या सर्व निकषांनुसार परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल मुख्य सचिवांकडे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
चिपळूण, दिंडोरी, वाडा आणि विक्रमगड या चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली असून, दुष्काळाची मागणी होत असलेल्या हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीर यासह अन्य तालुक्यांचे निकषांनुसार संपूर्ण सर्वेक्षण करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मंत्रिमंडळाच्या दुष्काळ उपसमितीच्या बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंघल आदि उपस्थित होते.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या दहा उपाययोजनांबाबत येत्या एक-दोन दिवसांत शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत योजना पूर्ण झाल्यास ज्या गावांमध्ये टँकरची आवश्यकता भासणार नाही, अशा १३ तालुक्यांतील २१२ योजनांच्या कामांसाठी वित्त विभागाने ८३.१८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच रेट्रोफिटिंगसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या कामांसाठी यापूर्वीची ३४९ कोटी रुपयांची थकबाकी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध होणार असून हा निधी डिसेंबरअखेरपर्यंत मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यात केवळ ५.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने तेथे विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यासाठी विशेष बैठक घेऊन पुढील आठ ते दहा महिन्यांचे पाणी नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
शिरपूर पॅटर्नप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागातील यंत्रसामग्री कार्यान्वित करून तलावांमधील गाळ काढण्याची कामे सुरू करावीत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक अधिकार द्यावेत. गाव तलाव आणि साठवण तलावांच्या कामांना ग्रामविकास विभागाने प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी व्ही.बी.-जी. राम जी योजनेंतर्गत मका आणि ज्वारी या चारा पिकांची लागवड करण्याबाबत जिल्हास्तरीय यंत्रणांना कळविण्यात आले आहे. तलावांच्या बाजूला चारा लागवड करण्याबाबतही आदेश जारी करण्यात आले आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्यास त्यांच्यासोबत जिल्हास्तरावर करार करून कामे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
@cbawankule
#दुष्काळ
#शेतकरी
#Farmerwelfare
District Information Office, Kolhapur retweeted
‘उमेद’ अभियानाची विक्रमी झेप. सेवा संकल्प अभियान कालावधीत बचत गट स्थापनेत महाराष्ट्र देशात अव्वल
#उमेद #MahaDGIPR
धरती, जंगल आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी लढणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा!
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला.
#जनजातीय_गौरव_दिन
174
राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. वन जमिनीवरील गवताचे लिलाव तात्काळ थांबवून चारा पशुपालकांसाठी उपलब्ध करून देण्याचा वन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय. #RevenueDepartment #DroughtRelief
@MahaDGIPR
163
जोतीरावांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात १८८३ साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले.शेतीचे शिक्षण,संकरित बियाणे,अवजारे,पीकपद्धती,शेतीला जोडधंदे,‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आधुनिक पद्धतीने करण्यावर त्यांनी भर दिला.
1
243
शेतीमालाला ‘उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव’ मिळाले पाहिजेत याचा त्यांनी आग्रह धरला.
#महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
@MahaDGIPR
20
#कोल्हापूर : दिव्यांगांना आवश्यक सुविधा व लाभ देण्यासाठी विभागांनी तत्परतेने कार्यवाही करावी- निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव
जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण समितीची त्रैमासिक आढावा बैठक संपन्न; पालकत्वाचे ४६ अर्ज मंजूर
255
District Information Office, Kolhapur retweeted
📍कोल्हापूर
राज्यातील सार्वजनिक #आरोग्यसेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ‘महा-पल्स एआय’ (MahaPulse AI) प्रकल्पाचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणारा हा पहिलाच जिल्हास्तरीय प्रकल्प असून, प्रायोगिक तत्त्वावर #कोल्हापूर जिल्ह्यात त्याची सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापुरातील यशस्वी प्रयोगानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश सरकारच्या ‘HOPE’ मॉडेलपासून प्रेरणा घेऊन, आयआयटी मंडीच्या तांत्रिक सहकार्याने विकसित करण्यात आलेली ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित आहे.
➡ कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील १०४ शासकीय आरोग्य संस्था एका जिल्हा कमांड सेंटरशी जोडल्या जाणार. यामध्ये १ सामान्य रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालये, १५ ग्रामीण रुग्णालये आणि ८३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश.
➡ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णालयांतील डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांची गर्दी, प्रतीक्षा वेळ, रांग व्यवस्थापन, स्वच्छता आणि हाऊसकीपिंगवर प्रत्यक्ष वेळेत देखरेख.
➡ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज नाही! उपलब्ध सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून रुग्ण अचानक कोसळणे, आग लागणे किंवा धूर निर्माण होणे यांसारख्या आपत्कालीन घटनांची एआय प्रणाली तत्काळ ओळख करून संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट देणार.
➡ आरोग्य संस्थांमधील त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना. एकाच डॅशबोर्डवर सर्व रुग्णालयांच्या कामकाजाची माहिती आणि कार्यवाहीचा आढावा उपलब्ध होणार. यामुळे आरोग्य यंत्रणेतील उत्तरदायित्व आणि प्रशासकीय पारदर्शकता वाढणार.
➡ आयआयटी मंडीच्या तांत्रिक सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आर्थिक तरतूद. रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, २०२३ मधील तरतुदींचे पालन.
“जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा महा-पल्स एआय प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल,” असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमिन, आरोग्य सभापती सारिका नरंदेकर, शिक्षण सभापती शितल यादव, उपस्थित होते.
@iprakashabitkar
#MahaPulseAI
#Kolhapur
District Information Office, Kolhapur retweeted
📍 जिल्हा परिषद, पुणे
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत स्व. अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वार नामकरण समारंभ
#LIVE xitter.gq/i/broadcasts/2EmbBErBv…
भगवान बिरसा मुंडा जयंती
जंगल संवर्धनातील आदिवासींची भूमिका !
गौण वनोपजांचा मितव्ययी वापर, बियाणे व रोपे टिकवणे, मधमाशांचे संरक्षण, औषधी वनस्पतींचा संयमी वापर.
वनांचे रक्षण, निसर्गाचे संवर्धन - हीच खऱ्या अर्थाने आदिवासी परंपरा !
#बिरसामुंडाजयंती #BirsaMundaJayanti
@MahaDGIPR
#कोल्हापूर : 'महा-पल्स एआय' (MahaPulse) प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभानंतर बोलताना @CollectorKolha1 डॉ. विजय राठोड
@MahaDGIPR























