तुषार खामकर (@KhamkarWrites) header
तुषार खामकर (@KhamkarWrites) profile picture

आईच्या मायेसारखी उबदार आणि संकटात ढाल बनून उभी राहणारी आमची मराठी! या मायबोलीच्या प्रेमात पडा, तिचं रक्षण करणं हाच माझा धर्म आणि श्वास आहे. 🚩

महाराष्ट्र
Joined July 2025
Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)
सातबारा आपल्या बापाचा आहे! पहिला हक्क #मराठी माणसाचा? सरसकट मागणी हवी. जमीनी आपल्या मग पहिले आणि शेवट पर्यंत आपणच! एक बाहेरचा लागणार चाटूगिरी करणार नंतर सगळे तेचेच #भाऊबंध दिसणार. नवी मुंबई विमानतळ जर #महाराष्ट्र राज्याच्या जमिनीवर उभ तर #सरसकट_मराठी माणसांनाच काम भेटलं पाहिजे.
8
77
4
333
6,036
चार भिंती स्मारक, अजिंक्यतारा परिसर, सातारा, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम. वेळ : सकाळी ११:०० वा. स्थळ : चार भिंती स्मारक, अजिंक्यतारा परिसर, सातारा, संपर्क : धनराज जगदाळे (९०६७४४७०१३) बघताय काय, सामील व्हा !!! जय मराठी, जय महाराष्ट्र ! #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
8
27
249
तुषार खामकर retweeted
महाराष्ट्राची जमीन आणि संसाधने नेमकी कोणाच्या हितासाठी वापरली जात आहेत? मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड का? विकास हवा, पण महाराष्ट्र उध्वस्त करून नको @Dev_Fadnavis @mieknathshinde जय महाराष्ट्र 🚩 #कर्जत #महाराष्ट्रहित #मराठीमाणूस #जयमहाराष्ट्र
1
6
9
219
औरंग्या, मुरार, सका पाटील, फडणवीस असे कितीतरी महाराष्ट्रद्वेष्ट्ये आले आणि गेले. आमच्या लोकांच्या चुकांमुळे महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्या या नराधमांनी येथे राज्य केले खरे, पण इतिहासात यांची नोंद कायम महाराष्ट्रद्रोही म्हणूनच राहणार. #हुतात्मादिन #स्वराज्य 🚩
12
22
347
वाढवणचा संघर्ष ! हा आपला लढा आहे, इथे लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात आपल्यालाच लढावं लागणार ! #वाढवण #महाराष्ट्र #बिरसामुंडा #महाराष्ट्रधर्म #मराठी #वाढवणबंदर #Maharashtra #PoliceAction #MaharashtraDharma #Marathi
31
75
541
दादर आणि पुणे यांचा नामांतरवाद हा जातीय भांडणे लावण्याचा प्रकार आहे..
बाबासाहेब आंबेडकरांबद्द्ल पूर्णतः आदर आहे अन् राहील, पण दादरचे नाव दादरच रहावे यावर कोणत्याही मुंबईकराचे दुमत नसेल. आता कसेही वागत असले तरी काही वर्षांपूर्वी खुद्द प्रकाश आंबेडकरांनीसुद्धा हेच मत व्यक्त केले होते.
12
43
550
तुषार खामकर retweeted
Never ask a Rajput why elder son of Brijbhushan shot himself and what was written in his death note. Check the Migration, Transport, Healthcare,education facilities in Constituencies of these 'Dabdaba'jeets, they match the 9th century's backwardness
6
21
577
तुम्ही कितीही फुट पाडायचा प्रयत्न करा, मराठी ओळख संपवू शकत नाही, तयार रहा, परवा मराठी वादळ धडकणार आहे... 🚩 भल्याभल्यांना या मराठी मातीत गाडलंय, या मराठी द्वेष्ट्यांचाही अंत फार दूर नाही... 🙌 #हुतात्मा_चौक #संयुक्त_महाराष्ट्र
1
22
57
477
तुषार खामकर retweeted
Aura 🔥🔥 Tell me you are Marathi..without telling me you're are Marathi २१ नोव्हेंबर #हुतात्मादिन #महाराष्ट्रधर्म
2
56
175
1,450
तुषार खामकर retweeted
Aura 🔥🔥 Tell me you are Marathi without telling me you're Marathi! 🚩 २१ नोव्हेंबर | हुतात्मा दिन #हुतात्मादिन #महाराष्ट्रधर्म 🚩
22
55
631
तुषार खामकर retweeted
परप्रांतीयांच्या छठपूजेसाठी कोट्यवधींचा खर्च; पण १०७ हुतात्म्यांच्या स्मारकाला महाराष्ट्र दिनी साधी सजावटही नाही! १२ कोटी मराठी जनतेच्या अभिमानाच्या स्मारकाकडे दुर्लक्ष का? जय शिवराय! जय महाराष्ट्र! जय मराठी! @CMOMaharashtra @mybmc @Dev_Fadnavis २१ नोव्हेंबर #हुतात्मादिन
3
19
42
404
२१ नोव्हेंबर हुतात्मा दिन! मराठी माणसाची एकी तोडण्यासाठी मुरार देसाईचा चेला झाडखाऊ लाकूडतोड्याने हुतात्मा दिनाच्या तोंडावरच राज्यात जातीय विष कालवण्याचा जो प्रयत्न केलाय तो मराठी माणसाने विसरता कामा नये. #महाराष्ट्रद्रोही_झाडखाऊ #हुतात्मादिन #महाराष्ट्रधर्म
18
66
529
२००४ मध्ये सावरकरांच्या अपमानाविरोधात बाळासाहेबांनी अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. आज सावरकर समर्थक म्हणवून घेणाऱ्यांच्या हातून त्या ऐतिहासिक लढ्याचा फोटो का फाडला? उलट सावरकरप्रेमींसाठी तो फोटो अस्मितेचा आणि अभिमानाचा होता. #शिंदेगट 🤔🤫
2
6
102
तुषार खामकर retweeted
#हुतात्मादिन येत्या २१ नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०७ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन. मुंबईसह एकात्मिक महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या त्या सर्व वीरांच्या बलिदानामुळे आज आपल्याला ‘महाराष्ट्र’ हे राज्य मिळाले. हुतात्मा चौकातील धगधगती मशाल आजही मराठी अस्मितेची जाणीव करून देते. त्यांच्या त्यागाची आठवण जपूया. ज्यांना शक्य आहे ते हुतात्मा स्मारक किंवा जवळच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन करूया. जय महाराष्ट्र! 🚩🔥 #संयुक्तमहाराष्ट्र #मराठीअस्मिता #महाराष्ट्र
🤖 Made with AI
1
8
23
293
तुषार खामकर retweeted
दिवस मावळला… रात्र गडद झाली… पण संघर्षाची ज्योत अजूनही तेवत आहे! आज दिवसभर #वाढवण बंदराच्या विरोधात #संघर्ष केल्यानंतरही #भूमिपुत्रांची पावले घराकडे वळली नाहीत. थकलेले देह आहेत… पण न थकणारी मने आहे . हा #लढा उद्याच्या पिढ्यांना जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून आहे.
1
24
49
454
हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर पडू देणार नाही! मुंबईसह राज्यभरात अभिवादन कार्यक्रमांचे अभूतपूर्व आयोजन. परप्रांतीय मतांच्या लांगुलचालनापेक्षा महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेचा सन्मान करा; रेल्वे स्थानकांवर 'महाराष्ट्रगीत' वाजवण्याची मराठी अभ्यास केंद्राची मागणी मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांच्या रक्तातून आणि हजारो कार्यकर्त्यांच्या त्यागातून मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मात्र आज सत्तेच्या आणि मतांच्या राजकारणात या ऐतिहासिक बलिदानाचा राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. नवीन पिढीलाही महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा गौरवशाली इतिहास पुरेसा माहीत नाही. धर्मकेंद्री राजकारणामुळे महाराष्ट्राची मराठी भाषिक ओळख धोक्यात आली असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रधर्माचा जागर करण्याची गरज निर्माण झाली आहे. येत्या २१ तारखेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्रधर्माची ज्योत मराठी मनामनांत पेटवण्याचा निर्धार मराठी अभ्यास केंद्राने केला आहे. यासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ठिकठिकाणच्या स्मृतिस्थळांवर अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत एकीकडे परप्रांतीय मतांच्या राजकारणासाठी शासकीय यंत्रणा राबवून छठपूजेसारख्या उत्सवांचे भव्य आयोजन केले जाते, तर दुसरीकडे ज्या हुतात्म्यांच्या बलिदानावर हे राज्य उभे आहे, त्यांच्या स्मारकांकडे आणि स्मृतींकडे दुर्लक्ष केले जाते. या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत, केवळ औपचारिकता म्हणून हार-तुरे न वाहता हुतात्म्यांच्या स्मृती दैनंदिन जीवनात जिवंत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडे ठाम आणि सडेतोड मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोहिमेमागील भूमिका स्पष्ट करताना मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी राज्यकर्त्यांच्या परप्रांतीय लांगुलचालनावर जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हता, तर तो मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचा आणि 'मराठीकारण' व 'महाराष्ट्रधर्मा'चा लढा होता. आज राज्यातील सत्ताधारी व विरोधक परप्रांतीय मतांच्या लांगुलचालनासाठी मुंबईत सरकारी खर्चाने आणि यंत्रणा राबवून छटपूजेचे आयोजन करण्यात धन्यता मानत आहेत. इथल्या मूळ संस्कृतीला आणि सणांना दुय्यम स्थान देऊन परप्रांतियांचे लाड पुरवणे हा संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान आहे. त्यासाठीच आज आम्ही शासनापुढे दोन ठाम मागण्या करत आहोत. पहिली म्हणजे, २१ नोव्हेंबरपर्यंत सर्व रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देणारी उद्घोषणा करून 'महाराष्ट्रगीत' वाजवावे; आणि दुसरी म्हणजे, ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो, त्या मंत्रालयीन दालनांना १०७ हुतात्म्यांची नावे देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना 'मराठीकारण' आणि 'महाराष्ट्रधर्म' हेच या राज्याच्या राजकारणाचे केंद्र असले पाहिजे. हुतात्म्यांचा इतिहास केवळ पुस्तकात बंदिस्त न ठेवता, तो रेल्वे स्थानकांवर आणि मंत्रालयाच्या भिंतींवर दिसला पाहिजे.” राज्य शासनाकडे दोन प्रमुख मागण्या: १. रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्रगीत प्रसारित करणे : २१ नोव्हेंबरपर्यंत सर्व रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देणारी उद्घोषणा करण्यात यावी आणि राज्याचे 'महाराष्ट्रगीत' वाजवून प्रवाशांना या संघर्षाची जाणीव करून द्यावी. (या संदर्भातील निवेदन करणारे पत्र १६ नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि महाव्यवस्थापकांना पोहोचवण्यात आले आहे.) २. मंत्रालयाला हुतात्म्यांच्या नावाची ओळख: ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो, त्या मंत्रालयीन दालनांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०७ हुतात्म्यांची नावे देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. २१ तारखेला होणाऱ्या या संपूर्ण कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा धनराज पवार यांनी मांडली. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत कला, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीतील मान्यवर, लढाऊ कार्यकर्ते मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत असलेल्या या स्मृतिस्थळांना अभिवादन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनराज पवार यांनी सांगितलेली मुंबईतील कार्यक्रमाची रूपरेषा: सकाळचे सत्र: • सकाळी ८:३० वा.: हुतात्मा चौकात चिन्मयी सुमीत (अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत) • सकाळी ९:०० वा.: मेट्रो सिनेमागृह पुढील परिसरात सुनील डिमेलो (इतिहास, संस्कृती अभ्यासक) • सकाळी ९:३० वा.: सिताराम बनाजी पवार स्मारकाजवळ (फणसवाडी, गिरगाव) हुतात्मा सिताराम बनाजी पवार यांचे कुटुंबीय आणि हुतात्मा अनंत गोलतकर यांचे कुटुंबीय • सकाळी १०:०० वा.: राज भुवन येथे (खेतवाडी, गिरगाव) प्रकाश रेड्डी (भारतीय कस्युनिस्ट पक्ष) • सकाळी १०:३० वा.: शाहीर अमर शेख मार्ग (सातरस्ता) येथे अभिवादन ' तोडकं मोडकं' कलापथक • सकाळी ११:०० वा.: संत गाडगे महाराज उद्यानात (सातरस्ता) निसार अली आणि वैशाली महाडिक (सफल विकास वेल्फेअर सोसायटी) • सकाळी ११:३० वा.: कामगार मैदानावर (परळ) विनायक कोळवणकर (नाट्यलेखक, दिग्दर्शक) • दुपारी १२:०० वा.: आचार्य अत्रे चौकात (वरळी) समीर खांडेकर (अभिनेता) दुपारचे सत्र: • दुपारी ३:०० वा.: प्रबोधनकार ठाकरे पुतळ्याजवळ (पोर्तुगीज चर्च) वैभव छाया (कवी, युट्यूबर) • दुपारी ३:३० वा.: सेनापती बापट पुतळ्याजवळ (दादर प.) प्रशांत कदम (मुक्त पत्रकार) • दुपारी ४:०० वा.: चैत्यभूमी येथे (दादर प.) शाहीर संभाजी भगत (लोकशाहीर) • दुपारी ४:३० वा.: छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ (शिवाजी पार्क) स्वप्निल जाधव (नाट्यलेखक, दिग्दर्शक) • सायंकाळी ५:०० वा.: संयुक्त महाराष्ट्र दालनात (शिवाजी पार्क) राज्यभरातील कार्यक्रमांबाबत कॉस्माईल डिसुझा यांचे निवेदन: हा लढा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे, असे स्पष्ट करत कॉस्माईल डिसुझा यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमधील नियोजनाबद्दल निवेदन दिले. मुंबईसोबतच पनवेल, पुणे, नांदेड, नाशिक, वाई, कोल्हापूर, चंद्रपूर, कराड, संगमनेर, सांगली, अमरावती, गोपुरी, परभणी तसेच गोव्यातील पणजी येथेही विविध शहरांत मराठीप्रेमी नागरिक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत आणि या मागण्यांचा आवाज बुलंद करणार आहेत. जय मराठी, जय महाराष्ट्र ! #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
2
54
155
1,107
कधीतरी गर्दीतून बाजूला होऊन हुतात्मा स्मारकासमोर शांत उभे राहा, ती मशाल तुम्हाला १०७ हुतात्म्यांची शौर्यगाथा ऐकवते तेव्हा अंगावर काटा येतो! हाच मराठी स्वाभिमान अनुभवण्यासाठी येत्या २१ तारखेला हुतात्मा चौकात नक्की या. 🚩🔥 #हुतात्मादिन #मराठीअस्मिता #मुंबई #महाराष्ट्र
1
13
75
522
तुषार खामकर retweeted
2
16
113
985
तुषार खामकर retweeted
मराठी माणूस हिंदू नाही का? छटपूजेच्या वेळी मोठ्या आवाजात गाणी वाजत होती, तेव्हा कायद्याची आठवण का झाली नाही? आणि आता मराठी माणसांच्या पारंपरिक जागरण-गोंधळावरच निर्बंधांची चर्चा का? नियम असतील तर ते सर्वांसाठी समान असले पाहिजेत धर्मात आणि परंपरांमध्ये दुजाभाव नको🚩💯 @Dev_Fadnavis
6
33
2
90
2,326
बघताय काय, सामील व्हा... (संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.०) शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या... सकाळचे सत्र: ८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट ९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स ९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव १०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव १०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता ११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता ११:३० वा. कामगार मैदान, परळ १२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी दुपारचे सत्र: ३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च ३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर (प) ४:०० वा. चैत्यभूमी, दादर (प) ४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८ जय मराठी, जय महाराष्ट्र ! व्हिडीओ निर्माता : रोहन शिंदे (इंस्टाग्राम आयडी : rohan_shindeee) #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
8
15
318
तुषार खामकर retweeted
🚩 चला हुतात्मा चौक! २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा चौक, मुंबई येथे महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मी जातोय, तुम्ही पण या! 🚩💯 #हुतात्मा_दिन #संयुक्तमहाराष्ट्र
२१ नोव्हेंबर #हुतात्मा_दिन लक्षात आहे ना?
6
19
271