Maha Forest Official retweeted
कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र व नवीन विस्तारित तानसा वन्यजीव राखीव क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता
१४ संवर्धन राखीव क्षेत्रांनाही मान्यता
#वनक्षेत्र
#MahaDGIPR
Maha Forest Official retweeted
गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्रास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात तसेच तानसा वन्यजीव अभयारण्य क्षेत्राजवळील नवीन विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्यास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील १४ संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांना मान्यताही यावेळी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची २६ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वन मंत्री गणेश नाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच वन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, मंडळाचे सदस्य तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्यासह मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांचे गाभा, बफर व अधिसूचित पर्यावरण संवेदनशील क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून अधिसूचित करणे, मानव-वन्यजीव संघर्षाला नैसर्गिक आपत्ती घोषित करणे आणि व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रातील इच्छुक गावांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करणे या प्रस्तावांवरही बैठकीत चर्चा झाली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी, विद्यमान नुकसानभरपाई व्यवस्था आणि वन विभागाचे अधिकार यांची सुसंगती तपासून पुढील कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अभयारण्य म्हणून घोषित झालेली; मात्र अद्याप प्रादेशिक वन विभाग किंवा वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापनाखाली असलेली क्षेत्रे वन्यजीव शाखेकडे देण्याबाबत कर्मचारी समायोजन, प्रतिनियुक्ती आणि रिक्त पदांचा अभ्यास करून एका महिन्यात निर्णयासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks
#वन्यजीव #अभयारण्य
महाराष्ट्र वन विभागामार्फत सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येत आहे.
मागील २ ते ३ दिवसांपासून भीमाशंकर अभयारण्यामध्ये एका कंपनीच्या प्रकल्पासाठी अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या सोशल मीडिया व विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झालेल्या आहेत.
वनातील अमूल्य ठेवा – मोह / महुआ (Madhuca longifolia)
ग्रामीण व आदिवासी भागात 'कल्पवृक्ष' म्हणून ओळखला जाणारा मोह हा आपल्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे.
या वृक्षामुळे मातीची धूप रोखली जाते. फुला-फळांद्वारे वन्यजीवांना अन्न, फुलांपासून सिरप/लाडू आणि
बियांपासून औषधी तेल असे हे बहुगुण वृक्ष आहे.
#MahaForest #MadhucaLongifolia #SaveTrees #Biodiversity
गवताच्या प्रजातींचे जतन करूया,
पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
'संकरित नेपिअर गवत' जनावरांसाठी अत्यंत रसाळ व पौष्टिक असून, यातून प्रति हेक्टर २५० ते ४०० टन प्रचंड उत्पादन मिळते. यामुळे दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढण्यास मदत होते
#हत्तीगवत #हिरवाचारा #पशुपालन #वनविभाग
गवताच्या प्रजातींचे जतन करूया,
पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
डोंगरी (Chrysopogon fulvus) ही चारा प्रजाती उथळ, मुरमाड आणि खडकाळ जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे गवत चवदार, पौष्टिक असून जमिनीची धूप रोखण्यास मदत करते आणि प्रति हेक्टर १६ ते २० टन उत्पादन देते.
#डोंगरीगवत
गवताच्या प्रजातींचे जतन करूया,
पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
बहुवार्षिक ज्वारी सीओएफएस २९ ही चारा प्रजाती पशुपालकांसाठी अतिशय उत्तम आहे. कमी पाण्यात उत्तम वाढ, हेक्टरी १७० टन हिरवा चारा आणि जनावरांसाठी पौष्टिक व पाचक असलेला हा चारा वाळवूनही साठवता येतो.
#MahaForest
गवताच्या प्रजातींचे जतन करूया,
पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
पशुपालनासाठी उत्तम 'सिग्रल गवत' हेक्टरी ३० ते ४० टन हिरवा चारा देते आणि यात ९ % ते २०% प्रथिने असतात. सर्व प्रकारच्या जमिनीत उगवणारे हे गवत मातीची धूप थांबवून शेताचे बांध मजबूत करते.
#MahaForest #चाराविकास
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
सर्व प्रकारच्या जमिनीत आणि सावलीत तग धरणारी, भरपूर उत्पादन देणारी 'गिनी गवत' (Panicum maximum) ही दुधाळ जनावरांसाठी एक अत्यंत पौष्टिक व पालेदार गवताची प्रजात आहे.
#चाराव्यवस्थापन #पशुधन #MahaForest
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चार्याची सोय करूया!
कमी पर्जन्यमानात (२००-३५० मि.मी.) तग धरणारी आणि पौष्टिक असणारी 'धामण किंवा काळा धामण' (Cenchrus setigerus) ही एक अत्यंत काटक गवताची प्रजात आहे.
#चाराव्यवस्थापन #पशुधन #MahaForest #GrassSpecies
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
कमी पावसात, उच्च तापमानात आणि खडकाळ किंवा चुनखडीयुक्त जमिनीतही उत्तम वाढणारे 'मद्रास अंजन किंवा अंजन' हे गवत पशुधन आणि मृद संधारणासाठी अत्यंत गुणकारी आहे.
#वनविभाग #चाराव्यवस्थापन #पशुधन
काळ्या जमिनीत उत्तम वाढणारे आणि मातीची धूप थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे 'मारवेल' (Dichanthium annulatum) हे गवत पशुपालक आणि मृद संधारणासाठी खूप महत्त्वाचे आहे.
शेताच्या बांधावर आणि कुरणांमध्ये लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
#चाराव्यवस्थापन #पशुधन #MahaForest
नवरात्रीच्या मंगल पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
#नवरात्री
दुष्काळी परिस्थितीत किंवा कमी पर्जन्यमानाच्या भागात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न नेहमीच भेडसावतो. अशा वेळी 'मोठा पवना किंवा शेडा' हे गवत शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चार्याची सोय करूया!
#चाराव्यवस्थापन #पशुधन
नाशिकच्या 'मित्रा' येथे जैवविविधता व्यवस्थापन समितीचे १-दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण पार पडले. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने पुरस्कृत या उपक्रमास यशदा पुणे व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सहकार्य लाभले.
#Mahaforest
वन्यजीव सप्ताह निमित्त सामाजिक वनीकरण विभाग जळगाव आणि चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज हातनूर धरण, वरणगाव ता. भुसावळ, जि. जळगाव येथे पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
#वन्यजीवसप्ताह #सामाजिकवनीकरण #पक्षीनिरिक्षण




























