MAITRI (@Maitripune) profile picture

MAITRI is forum of volunteers. We started our work in 1997 with Korku people in Melghat to help them fight malnutrition. It is now one of our many activities.

Pune, Maharashtra
Joined April 2010
Photo by MAITRI (@Maitripune)Photo by MAITRI (@Maitripune)Photo by MAITRI (@Maitripune)Photo by MAITRI (@Maitripune)Photo by MAITRI (@Maitripune)Photo by MAITRI (@Maitripune)Photo by MAITRI (@Maitripune)Photo by MAITRI (@Maitripune)Photo by MAITRI (@Maitripune)Photo by MAITRI (@Maitripune)
Mangesh Joshi, a dedicated Tata Motors employee, believes in creating a lasting impact. Led by Mangesh Joshi, the Melghat Mitra Group has been recognised by Tata Group for their exceptional volunteering work. These Tata employees took on the challenge of child hunger in Melghat. Through grain banks, sustainable farming initiatives, and youth training, they were able to create lasting change which empowered the community. #BuildingTogetherMillionDreams #TataMotors #ConnectingAspirations
6
5
3
32
6,490
मेळघाटमध्ये जारिदा नावाच्या गावात “विज्ञान प्रकल्प स्पर्धा” पार पडली.. विज्ञानविषयक मुला-मुलींमध्ये रूची निर्माण व्हावी हा हेतू होता.. पुण्याहून जाऊन काही मित्रांनी तिथल्या आयोजनात भाग घेतला. स्थानिक मित्र तर होतेच. तुम्हीही अशा सामाजिक कामात सहभागी होऊ शकता. किती दिवस आपण “त्यांनी हे करावं, ह्यांनी हे करावं” असं म्हणत बसणार? आपल्याला कायमस्वरूपी पूर्णवेळ सामाजिक काम तर करता येणार नाही परंतु वर्षातून एकदा आठवडाभर सामाजिक कामासाठी का देता येणार नाही का? अवश्य जोडून घ्या.. @Maitripune ला किंवा मला Direct Message करा किंवा [email protected] लिहा. “मैत्री” संपर्क साधेल. #मैत्री #समाजकार्य #मेळघाट #मैत्रीसंस्था #समाजसंघटन
19
119
3,142
पळण्याचा व्यायाम करणारे पुण्यात किमान ५,००० आहेत आणि ते हवेच्या प्रदूषणानं अत्यंत त्रस्त आहेत. तर ह्यावर उपाय काय करता येईल असा सगळे विचार करत होतो. एक खरं आहे की एखाद्या शहराच्या हवेची गुणवत्ता एका रात्रीत सुधारणार नाही किंवा त्याला एकच एक उत्तरही नाही. पण, "शुध्द हवा हा आमचा मानवी, मुलभूत हक्क आहे" असे फलक घेऊन हे पळणारे ५,००० आणि त्यांना साथ देणारे ५,००० रस्त्यावर आले आणि पुणे महानगरपालिकेसमोर तासभर उभे राहिले तर येत्या वर्षभरात ज्या तीन निवडणुका होणार आहेत त्यातल्या उमेदवारांना तरी त्यावर काही भूमिका तरी जाहीर करावीच लागेल.. आज आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस आहे, त्या दिवशी "शुध्द हवा" हा आमचा मानवी हक्क आहे, अशी आठवण ठेवायलाच हवी. #HumanRightsDay2023 #HumanRights #मानवीहक्क #प्रदूषण #हवाप्रदूषण #pollution #AirQuality #पुणे
7
20
1
109
4,382
दूरपल्ल्याचं नियोजन काय करता येईल? असं पुन्हा होणार नाही म्हणून नागरिकांच्या संघटना आणि स्वयंस्फूर्त संस्था कशा एकत्र करता येतील? त्यांचा सरकारी संस्थांशी समन्वय कसा साधता येईल? @Maitripune @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
#IrshalwadiLandslide #LANDSLIDE सलग तीन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे #इर्शाळवाडी येथे #mudflow प्रकारची दरड कोसळली. ही दरड या आधीच्या #माळीण, #तळीये सारखीच आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @ParagKMT @ShreedharLoniMT @sameerkarveMT @shree_brahmeMT @suneetMT @Matapune
2
15
59
2,993
नदीकाठची झाडं बेसुमार तोडली की काय होतं पहा.. हे मुंसियारी खोऱ्यातलं खोतीला गावचं दृश्य आहे. तिथल्या सरपंच नंदा बिश्त ह्यांनी पाठवलंय. २०१३ मध्ये “मैत्री” चे ‘मित्र’ तिथे जाऊन त्यांनी पुनर्वसनाचं, मदतीचं काम केलं होतं. प्रशांत, दत्ता, शिरीष सांगत होते की गेल्या ११ वर्षांत आपण मागच्या संकटातून काहीच शिकलो नाही.. #महापूर
7
52
1
245
17,066
हिमाचल प्रदेश आणि एकूणच उत्तर भारतात मुसळधार पावसानं आणि पूरानं धुमाकूळ घातला आहे.. मागच्या पूराच्या वेळी "मैत्री" नी तिथे @Maitripune तातडीच्या मदतीचं आणि पुनर्वसनाचं काम केलं, तेंव्हाच अशा घटना वारंवार होणार हा अंदाज होता.. शास्त्रज्ञांनीही अशा घटना वारंवार होत रहाणार असल्याचं सांगितलं आहेच. सरकार, नागरी स्वयंस्फूर्त संस्था आणि ह्या विषयातले प्रशिक्षित कार्यकर्ते ह्यांनी अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेतआणि झाल्या तरी त्याचा दाह कमी व्हावा म्हणून दूरगामी नियोजन करून काम करत रहायला पाहिजे. #disasterpreparedness
21
102
5,473
Was watching a documentary on #netflix last night,#OurPlanet2 narrated by #DavidAttenborough, the importance of preserving our natural habitat worldwide for the future generations is emphasized on, this meeting will be able to make us understand our role in preserving the environment locally and will be able to build consensus on the need to protect the natural habitat surrounding our very city #Pune, this is our opportunity to be a part of a movement of which our future generations would be proud and thankful for. #DoJoin.
*खास online बैठक* मंगळवारी २० जून सायंकाळी ०६:३० ते ७:३० पुण्यातील “नदी सुधार प्रकल्पाच्या” विरोधात सध्या नागरिक आंदोलन करत आहेत. मध्यंतरी झालेल्या ‘चिपको’ आंदोलनात आपल्यापैकी काही सहभागीही झाले होते. हा प्रकल्प काय आहे? ह्यात काय धोके आहेत? पर्यावरणाचं काय होणार आहे? (1/3)
4
7
771
ओरिसा रेल्वे दुर्घटनेनंतर तिथे जखमी, मृत व्यक्तिंचे नातेवाईक अशा लोकांशी बोलून त्यांना मानसिक आधार देऊ शकतील अशा अनुभवी मानसशास्त्रज्ञांची ताबडतोब गरज आहे.. टाटा समाजविज्ञान संस्थेच्या काही विद्यार्थ्यांनी तिथे काही व्यवस्था उभी केली आहे.. संपर्क साधाः
1
37
109
3,825
आमची मेळघाटची मित्रमंडळी एका प्रशिक्षणासाठी पुण्यात आली आहेत.. २० जण आहेत. ह्यातले दोघे-दोघे काल एकेका घरात जेवायला गेले होते.. खूप चांगला संवाद झाला. #मैत्री #मेळघाटमित्र #संवाद ⁦@Maitripune⁩
15
164
5,165
#मेळघाट च्या @Maitripune च्या कृषीप्रदर्शनात एक पुस्तकांचाही स्टॅाल होता. आनंदाची गोष्ट म्हणजे मुली तिथे येऊन पैसे देऊन पुस्तकं विकत घेत होत्या. हे खूप चांगलं चित्र आहे.. खूप आशादायी.. #मेळघाटचीगोष्ट #मैत्री #पुस्तकं
3
19
205
5,289
दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मेळघाटात खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. ह्यानं स्पर्धेची सवय लागते. संघटनकौशल्याला धार लावता येते. नेतृत्वगुण शोधता येतात, आणि, ह्यावर्षी सगळं नियोजन स्थानिकांनीच केलं होतं.. #मेळघाटचीगोष्ट ⁦@Maitripune⁩ #मैत्री #मेळघाट
3
11
149
5,062
खरंय.. पहिला अंक संपला. मूळ प्रश्नांची तीव्रता कमी झाली असली तरी अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. नवीन प्रश्न आ वासून उभे आहेत.. या कामाची २५ वर्षे अनेक अर्थानी महत्त्वाची आहेत. अनेक कार्यकर्ते घडले. उभे राहीले. धडपडलेही.. पण काम चालू राहिलं.. मीही आहेच..
1
1
5
305
२५ वर्षांपूर्वी बालमृत्यू वाचवण्यासाठी मेळघाटात पाऊल ठेवलं. आज तिथे नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ‘कृषी-प्रदर्शन’ आयोजित केलंय म्हणून निघालो.. मनात समाधान आहे. एक अंक संपून दुसरा अंक सुरू झाल्याची थोडी हुरहुरही आहे. #मेळघाटचीगोष्ट ⁦@Maitripune⁩
5
20
161
3,648
आम्ही गेलो तेंव्हा मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूनी थैमान घातलं होतं.. आता ती मुलं मॅरेथॅान पळतात, कृषी प्रदर्शन करतात, स्वतःला सिध्द करण्याची आकांक्षा त्यांच्यामध्ये आहे.. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी चला मेळघाटात २४ आणि २५ फेब्रुवारी ! संपर्क साधा ⁦@Maitripune⁩
1
13
107
2,510
मेळघाटातील आकांक्षी तरूण-तरूणींना शहरात जायची ओढ आहे. कर्तबगार बाहेर पडले तर गावात विकासासाठी भांडवल कसं येणार आणि आलं तर त्याचा चांगला विनियोग कसा होणार? चांगलं भांडवल आलं पाहिजे, समूहही संघटित हवा आणि कौशल्यही विकसित व्हायला पाहिजे हे चक्र कसं भेदायचं? @Maitripune #अर्थसंकल्प
3
12
81
2,805
मंगळवारच्या @Maitripune बैठकीत उत्तराखंड मध्ये नैसर्गिक आपत्तीत काम करणारे काहीजण म्हणाले " #जोशीमठ सारखी परिस्थिती कोकणात होऊ शकते". उत्तराखंडचा त्यांचा अनुभव सांगताना महाराष्ट्रातल्या काही ठिकाणांबाबतीतही काळजी घ्यावी असं त्यांचं म्हणणं.. अशी कुठली ठिकाणं आहेत महाराष्ट्रात?
4
13
82
4,597
उत्तराखंडमध्ये “मैत्री”नी २०१३-१४ मध्ये भूकंपग्रस्तांसाठी काम केलं होतं.. आज जे जोशीमठात होत आहे त्याचा अंदाज तेंव्हाच आमच्या काम करणाऱ्या मित्रांना आला होता.. तेंव्हाचं आमचं घोषवाक्यही फार छान होतं.. “Hope and Beyond” .. खरंच पण Hope च्या - आशेच्या पुढे काही असतं का?
2
9
75
2,811
वाटतं, प्रत्येक माणसाचा चांगल्या मित्रांचा एक तरी ग्रुप असावा, त्याला एखादा तरी छंद (hobby) असावा, एक तरी खेळ त्यानं खेळत रहावं, एखादं वाद्य शिकावं आणि किमान एका तरी सामाजिक संस्थेत स्वयंस्फूर्त काम करावं.. माझी संस्था “मैत्री”.. आत्ताच मेळघाटात आठवडाभर काम करून परतलो..
5
30
1
419
16,296
१८ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्सुनामीच्या तडाख्यानं देशाचा पूर्व किनारा झोडपला गेला.. "मैत्री" सोबत तिथे अगदी पहिल्या दिवशीपासून काम करण्याची संधी मिळाली आणि खूप शिकलो.. लोकांना पुन्हा त्यांची आजिवीका मिळवून देणं आणि त्यांचं जीवन पूर्ववत करणं हे आमचं काम होतं.. @Maitripune
3
13
124
4,968