Years of hard work for #MPSC, yet today we sit on the streets just to be heard.Instead of rage,we chose Satyagraha.We’ve shared our journey at rahulgandhi.in/satyagraha. Grateful to @IYC for standing with us on the ground.Hope @RahulGandhi & all of you join our voice. #MPSCStudents
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाविरोधात आवाज उठवणारा, पोलिस भरतीची तयारी करणारा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
वैभव चव्हाण याने बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकारांविरोधात तक्रार करून संबंधित प्रकरणाला वाचा फोडली होती. त्याच्या तक्रारीनंतर जवळपास १४ पोलीस कर्मचारी आणि काही क्रीडा अधिकारी निलंबित झाल्याची माहिती समोर आली होती. अन्यायाविरोधात तक्रार करण्याचे धाडस दाखवणाऱ्या एका तरुणाचा अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होणे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
वैभवच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे? या घटनेचा आणि त्याने केलेल्या तक्रारीचा काही संबंध आहे का? त्याला यापूर्वी कोणाकडून धमक्या किंवा दबावाचा सामना करावा लागला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
वैभव चव्हाणला न्याय मिळणे ही केवळ त्याच्या कुटुंबाची लढाई नाही, तर अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेशी आणि व्यवस्थेवरील विश्वासाशी संबंधित बाब आहे..!
स्व. वैभव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
वैभव कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
#JusticeForVaibhavChavan
#वैभवचव्हाण
#बीड
बीड मध्ये बोगस खेळाडू प्रमाणपत्र बाबत तक्रार करणारा वैभव चव्हाण याचा खून झाला आहे. प्रकरण गंभीर आहे बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीची एवढी मजल जाते का तर बऱ्याच जिल्ह्याचे अध्यक्ष सचिव राजकीय व्यक्तींच्या जवळचे आहेत. याबाबत योग्य तपास होऊन लवकरात लवकर आरोपींना पकडा
@Dev_Fadnavis
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर
#अहवाल #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #एमपीएससी
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
विद्यार्थी एकजूटीचा आणखी एक महत्वपूर्ण विजय....!
राज्यभरातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पुण्यात उभारलेल्या #MPSC_विद्यार्थी सत्याग्रह आंदोलनात ३ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या गट क परिक्षेमध्ये जवळपास १८ हजार पदांचा समावेश करावा, ही प्रमुख मागणी होती. सरकारच्यावतीने देखील जागा वाढीचा शब्द देण्यात आला होता, तसंच त्यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुख्य सचिवांची भेट घेऊन तत्काळ विविध विभागांकडून मागणीपत्र मागवण्याची विनंतीही केली होती.
त्यानुसार आता उच्चस्तरीय समितीने गट क परिक्षेत जवळपास ११ हजार पदांची वाढ करून एकूण १६ हजार पदे भरण्याची शिफारस केली आहे. परिणामी आत्ता MPSC आयोगाकडून लवकरच याबाबत शुद्धीपत्रक काढलं जाईल. याचा फायदा राज्यभरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. न्याय्य मागण्यांसाठी ठाम राहीलं की विजय हा होतोच हे यातून पुन्हा अधोरेखित झालं. दिलेला शब्द पाळला त्याबद्ल मुख्यमंत्री साहेबांचे आभार आणि इतर मागण्या देखील दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण होतील, ही अपेक्षा..!
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो!
#MPSC
पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं सत्याग्रह आंदोलन स्थगित करताना सरकारने अनेक आश्वासनं दिली आहेत. त्यामध्ये ३ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या गट-क परीक्षेत दुप्पट वाढ करणे, राज्यसेवा नागरी परीक्षा २०२७ आणि गट-ब परीक्षा २०२७ मध्ये महत्त्वाच्या परीक्षांतील जागांमध्ये वाढ करणे, पदोन्नतीमध्ये पूर्वीप्रमाणे ५०-५० टक्के प्रमाण ठेवणे आणि आयोगाची सदस्यसंख्या वाढवणे यांचा समावेश आहे. या आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत संबंधित विभागांना लेखी निर्देश देण्याची मागणी मुख्य सचिव राजेश अग्रवाल साहेब यांच्याकडे केली. याबाबत त्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि या मागणीचं निवेदनही दिलं.
तसंच, MPSC च्या जाहिरात क्रमांक १११/२०२३ अंतर्गत लिपिक-टंकलेखक भरती प्रक्रियेतील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे तसेच राखीव प्रवर्गातील प्रतीक्षा यादीच्या माध्यमातून रिक्त पदे भरून एकूण ७००६ पदांची भरती पूर्ण क्षमतेने करण्याचंही निवेदन त्यांना यावेळी दिलं.
#MPSC
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
"नगरपरिषद संचनालयात" देखील पदोन्नती घोटाळ्याचा प्रकार सुरू असून यामध्ये वर्ग एक आणि वर्ग दोन मधील पदांचा सरळसेवा कोटा ०% करण्यात आलेला आहे.
पदोन्नती घोटाळा हा दशकातील सर्वात मोठा घोटाळा असून याला जबाबदार संबंधित विभागातील कर्मचारी संघटना, संचनालयाचे उच्च अधिकारी आणि संबंधित मंत्री आहेत.
#पदोन्नती_घोटाळा
#बेरोजगारी
@madhurimisal
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
अन्न व औषध निरिक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी MPSC तील काही अधिकारी आणि काही उमेदवारांना अटक करण्यात आली असली तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. याबाबत विद्यार्थ्यांनीही आणि आम्हीही काही पुरावे पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाचे सचिव मा. तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडं सादर केले आणि या पुराव्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्याची तसंच गुन्हे शाखेने चौकशीचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली.
याशिवाय MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षांसाठी असलेल्या OMR शिटमधील पाचवा पर्याय रद्द केल्यामुळं राज्यात एमपीएससी परिक्षेत गैरप्रकार करणारी टोळी सक्रीय झाली. त्यामुळं हा पर्याय का आणि कुणाच्या दबावामुळं रद्द केला याची चौकशी करण्याची मागणीही यावेळी केली.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
पोलिस उपनिरिक्षक (PSI) विभागीय मर्यादित परिक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असून यामध्ये ‘मास कॉपी’, आर्थिक देवाणघेवाण, ब्लॅकलिस्टमधील नावे बेकायदा पद्धतीने वगळणे, शारिरीक चाचणीतील गैरव्यवहार, नियमबाह्य पद्धतीने ताकीद देऊन गैरप्रकार करणाऱ्यांना पात्र ठरवणं, निकाल जाहीर होण्यापूर्वीच सोशल मिडियावर लीक होणं असे प्रकार घडले आहेत. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही न्यायिक चौकशी आयोगाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडं केली आणि याबाबतचं पत्रंही त्यांना दिलं.
याशिवाय ४ जानेवारी २०२६ रोजी MPSC मार्फत घेतलेल्या गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परिक्षेत गंभीर गैरप्रकार झाला असून यासंदर्भातील पुरावेही त्यांच्याकडं सुपूर्द केले आणि या अनुषंगानेही सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
एकीकडे विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट करायचे, पालकांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहायची; तर दुसरीकडे प्रशासकीय गैरकारभार आणि भ्रष्ट नेत्यांनी ही स्वप्न धुळीस मिळवायची. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक अत्यंत गंभीर घोटाळा स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून शोधला आहे.
शिक्षणाचा मांडलेला हा बाजार पत्रकार परिषदेतून समोर आणणार असून, अतिशय गंभीर असलेल्या या प्रकरणामुळे एका मोठ्या मंत्र्यालाही राजीनामा द्यावा लागू शकतो. भेटूया उद्या, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे, संध्याकाळी ४ वाजता!
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
यापूर्वी देखील आम्ही सांगितले होते आणि इथून पुढे देखील सांगत राहू की #MPSC पदभरती घोटाळा हा एका परीक्षेपुरता किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, यामध्ये अनेकांना अभय देण्याचा प्रकार सुरू आहे आणि जो कोणी यांना आश्रय देणारा आहे तो आज ना उद्या उघडा होईलच कारण विषय कष्टकरी विद्यार्थ्यांचा आहे, परंतु ज्यावेळी @Mpsc_Andolan समिती संघर्ष करत होती त्यावेळी का सर्वांनी आवाज उठवला नाही, विद्यार्थी एकता सर्वांची असते एका कोणाची नसते.... असो घोटाळे खूप झालेत आणि झालेल्या घोटाळ्यांच्या अनुषंगाने त्या सर्वांचा बाजार उठवणे आपले काम आहे कारण या लोकांनी आपल्या पिढ्या बरबाद केल्या लक्षात ठेवा...!
अजून खूप काही आहे बोलू सविस्तर
आयोगाच्या परीक्षांचे ठीक आहे पण ज्या सरळसेवा परीक्षांमध्ये घोळ झाला आहे त्याच काय @Dev_Fadnavis साहेब. @TCS ने घेतलेली एकही परीक्षा पारदर्शक झाली नाही. त्यामुळे याही परीक्षांची चौकशी झाली पाहिजे. @RRPSpeaks @Dhananjay4INC @MahebubShaikh20 यासाठी आपणही पाठपुरावा करावा ही विनंती.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
Sunday Wisdom!"अती घाई-संकटात नेई" याचा प्रत्यय #MPSC च्या संदर्भात खालील घटनांमधून.
•वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक मुख्य परीक्षेची शिफारस जून २०२२ मधे स्विकारत तत्संबंधित जुलै २०२२ च्या घोषणेत सुधारीत योजना लगेच मुख्य परीक्षा २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय.तयारीसाठी पुरेसा अवधी न दिल्याने परीक्षार्थींचे पुण्यात मोठे आंदोलन व निर्णयाची अंमलबजावणी दोन वर्षे पुढे ढकलणे क्रमप्राप्त.
•जुलै २०२६ मधील गट क च्या जाहीरातीत पूूर्व परीक्षेेचे निर्धारीत धोरण बदलत ती ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्याचा निर्णय थेेट जाहीरातीतून घोषित.विद्यार्थ्यांंचे पुन्हा आंदोलन,शासनाचा हस्तक्षेप व निर्णयाची अंमलबजावणी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची पाळी.
•गैरप्रकाराची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच अन्य पर्यायांची चाचपणी न करता दि.१३ मे २०२६ रोजी 'ऑप्टींग आऊटचा' पर्याय रद्द करत बहुुसंंवर्गीय पदांसाठी प्रतीक्षा यादी न ठेवण्याचेही सुतोवाच त्याच परिपत्रकात.उप निबंधक/कर निरीक्षक इ. संवर्गात बर्याच उमेदवारांची दोन पदांवर निवड झाल्याने व पदपसंंतीचा पर्याय न दिल्याने (प्रतिक्षा यादी अभावी पदे रिक्त राहूनही संधी गमावण्याच्या भितीने) उमेदवारांत असंतोष.प्रसार माध्यमे व समाज माध्यमांतून याची दखल.परिणामी रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतून शिफारस करण्याचे नंंतर स्पष्टीकरण देण्याची आयोगावर वेळ.
•औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पुरेशी चौकशी न करता वा संयम न बाळगता लगेच गैरप्रकार न झाल्याचा निर्वाळा देणारे पत्रक व त्यात तक्रार खोटी निघाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याबाबत फौजदारी कार्यवाहीची तंबी. मात्र शेवटी पेपरफुटी झाल्याची कबुली नि आयोगातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अटकेने तोंडघशी पडण्याची नामुष्की.
तात्पर्य आयोगाची तत्परता स्वागतार्ह मात्र परिक्षार्थ्यांच्या भवितव्याला प्रभावीत करणारे निर्णय व तत्संंबधीत घोषणां ह्याचा ताळमेळ बसवतांना परिणामांचा दूरगामी व सांगोपांग विचार करणे आयोगाच्या प्रतिमेेच्या दृष्टीने हितावह!
आयोगाने घेतलेल्या पेपर सोबत @TCS ने घेतलेल्या परीक्षांची पण चौकशी झाली पाहिजे. सर्वात मोठा भ्रष्टाचार तर सरळसेवा मध्ये झाला आहे.तलाठी भरतीची पुन्हा नव्याने चौकशी करावी असे कोर्टाचे आदेश असताना सुद्धा अजून @DGPMaharashtra यांनी तपास सुरू केला नाहीये. @Dev_Fadnavis याबाबद विचार करा
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
देवेंद्र फडणवीस जी, तुकाराम मुंढे यांना चौकशी समितीच्या नियुक्तीचा आदेश अद्याप का देण्यात आलेला नाही? 🤔
तुमच्या मंत्र्यांनी घोषणा केली, मग प्रत्यक्ष आदेश काढण्यात एवढा विलंब का?
घोषणा करायची एक आणि अंमलबजावणी करायची नाही, असं का?
फडणवीस जी, तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश कधी निघणार? महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उत्तर द्या!
#MPSC #तुकाराममुंढे #विद्यार्थ्यांना_न्याय
@imshivrajmore @CMOMaharashtra
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
किती नीच पण आहे
कामगार निरीक्षक पेपर कोणी फोडला कसा फोडला हे सर्व आम्हाला माहित आहे. ज्यांनी पेपर फोडला त्यांनी #MMRDA #तलाठी #समाजकल्याण अश्या अनेक परीक्षांचे पेपर फोडले आहेत. @Dev_Fadnavis साहेब तुम्हाला खरच तपास करायचा असेल तर सर्व गुन्हे एकत्र करून तपास करा आणि आम्हाला संपर्क करा
@RRPSpeaks
कामगार निरीक्षक पेपर कोणी फोडला कसा फोडला हे सर्व आम्हाला माहित आहे. ज्यांनी पेपर फोडला त्यांनी #MMRDA #तलाठी #समाजकल्याण अश्या अनेक परीक्षांचे पेपर फोडले आहेत. @Dev_Fadnavis साहेब तुम्हाला खरच तपास करायचा असेल तर सर्व गुन्हे एकत्र करून तपास करा आणि आम्हाला संपर्क करा
@RRPSpeaks
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
#MPSC आयोगातील महाभागांनी जास्त हुशारी करण्याचा प्रयत्नच करू नये! आंदोलन स्थगित झालं म्हणजे सर्व शांत झालं आणि आमचं लक्ष नाही, असं कुणीही समजू नये. पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भविष्याची होळी करणाऱ्या कुणालाच आम्ही सोडणार नाही.
चौकशी होऊद्या, पेपर फोडणारे सगळे घरी जातीलच..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCStudents #MPSCUpdates
MPSC ला जुनी कागदपत्रे रद्दी काढून नष्ट करण्याची एवढी घाई का झाली आहे? एवढा ‘चक्रम’पणा का? न्यायिक चौकशी आयोगाचा आणि मा. तुकाराम मुंडे साहेबांच्या धाकाचा हा परिणाम आहे का? आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण करायचं असेल तर सर्व जुनी कागदपत्रं देखील तपासणं गरजेचं आहे, तरच सत्य बाहेर येईल. त्यामुळं आयोगाच्या सचिवांनी किंवा सरकारने तत्काळ दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत रद्दी नष्ट करण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याच्या सूचना द्याव्यात...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@Tukaram_IndIAS
#MPSC #MPSC_आयोग
राज्यात सर्वात भ्रष्ट कोणता विभाग असेल तर तो आरोग्य विभाग आहे. या विभागात गट क चे पद परीक्षा न देताच काही जणांना दिले आहे आणि बोगस भरतीचे प्रमाण एवढे आहे की आपण खरच महाराष्ट्र मध्ये राहतो की कुठे हा प्रश्न पडतो लवकरच याचा आम्ही भांडाफोड करणार आहोत.
@iprakashabitkar @Dev_Fadnavis
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य retweeted
MPSC के अध्यक्ष को आखिर जाना पड़ा - अब भ्रष्टाचार की पूरी जांच होगी।
ये छात्रों की बड़ी जीत है,
ये युवाओं की बड़ी जीत है,
ये सत्याग्रह की बड़ी जीत है।
#Satyagraha
विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होत असेल तर आपण हे हुकूमशाही आहे अस का म्हणू नये. इथे आयोगाचे पेपर फुटले आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे, यासाठी ते उपोषण करताय आणि हे सरकार त्यांच्यावरच गुन्हे दाखल करत असेल तर ही हुकुमशाहीच आहे.
@Dev_Fadnavis



































