श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde) header
श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde) profile picture

महाराष्ट्रसैनिक🚩✌️ यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂

Joined May 2020
Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)Photo by श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde)
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्जत येथे सभेला संबोधित केलं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे म्हणल्यावर कर्जत येथे इंटरनेट बंद केलंय म्हणे. इंटरनेट बंद केलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो का? नुसतं कर्जतमध्ये बंद केलंय, पण बाकी अख्खं जग बघतंय. अर्थ्या तासात सगळं भाषण युट्युबवर पडेल मग सगळं जग बघेल. हे लोकं कोणत्या जगात जगतात तेच कळत नाही. मनात काळं असेल तर अशा गोष्टी करायच्या सुचतात. * आज सकाळी जंगलात जी झाडे तोडली आहेत ती बघायला गेलो होतो, तिथं लाकडं रचून ठेवली होती. तोडलेल्या झाडांची रचलेली लाकडं पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं. * हे राज्यात बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. कोणता प्रकल्प करायचा, कसा करायचा हे सगळं दिल्लीत ठरतं. * मी पूर्वीपासून सांगत होतो, हा महाराष्ट्र जर या दोघांच्या हातात गेला तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हातात राहणार नाही. * आज तुम्ही रडत बसता आणि निवडणुकीच्या तोंडावर जातीच्या, धर्माच्या नावावर यांना मतदान करता. परत पुढचे पाच वर्ष रडत बसता. किती काळ हे चालू राहणार. * आमच्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतायत. हे १५०० रुपये देऊन तुमची तोंडं बंद केली जात आहेत. * त्यादिवशी मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकत होतो. मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले, केंद्राने आणि एका खाजगी कंपनीने ठरवून आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला. हे सगळं केंद्रात ठरतं हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं. * सत्तेची भिती, पदाची भिती या भितीमधून या गोष्टी घडतात. हा असा गप्प, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा हा महाराष्ट्र? गुजरातमधली २ माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार? * आज मी जंगलात भेट दिली तेव्हा मला महिला भेटल्या. हात जोडून विनंती करत होत्या, आमचं जंगल वाचवा. तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? तुमचे कोयते काय करतात अशावेळी ? * आज भीमाशंकरचा प्रकल्प आलाय. त्याचं टेंडर वगैरे काही नाही असाच देऊन टाकलाय. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अशाच प्रकारचे एकूण २३ प्रकल्प येत आहेत. * यापुढे महाराष्ट्रात जे खाजगी प्रकल्प येत आहेत. त्यांना जे पाणी आणि वीज लागणार आहे त्याची तरतूद व्हावी यासाठीची पूर्वतयारी म्हणून हे प्रकल्प सुरू केले जात आहेत * या सगळ्यातून तुमचे मतदारसंघ फोडले जात आहेत असे प्रकल्प आले की तुम्ही आहात त्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होणार. आणि तिथे दुसरे लोकं स्थायिक होणार. हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. * सर्बियामध्ये तरुणांनी, तिथल्या जेनझीने सत्तापालट करून दाखवला. मी आधीही माझ्या भाषणांत सांगितलंय जेनझी या महाराष्ट्राच्या खेडापाड्यातसुद्धा आहे. तुम्ही कधी जागे होणार आहात? * तुम्ही जर शांत बसणार असाल तर मला तुमचं नेतृत्व नाही करायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणायचं आणि पेटून उठायचं नाही याला काय अर्थ आहे? * गडचिरोलीत शेतीची सुपीक जमीन आणि जंगलातली झाडे कापून ती जमीन एका खाणीसाठी दिली. * जंगलातली झाडं जेव्हा तोडली तेव्हा त्या झाडावर राहणारे पक्षी वर हवेत घिरट्या घालत होते. ही घिरट्या घालायची वेळ पुढच्या काळात तुमच्यावरसुद्धा येणार आहे. * हे सगळे प्रकार, त्यासाठी केलेली आंदोलनं, मोर्चे हे तुम्ही निवडणुकीच्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर उपयोग काय या सगळ्या आंदोलनांचा? * ज्या सह्याद्रीत शिवछत्रपती खेळले, बागडले तो सह्याद्री आज महाराष्ट्राचेच लोक संपवत आहेत. आणि महाराष्ट्रातला नागरिक हताश होऊन बघत बसला आहे. याबद्दल शिवछत्रपतींना काय वाटत असेल, याचा एकदा विचार करा. * या सगळ्या अन्यायाविरोधात जर आपल्याला लढता येत नसेल तर परमेश्वरच वाचवू शकेल या महाराष्ट्राला. * शिवरायांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय कोणतंही झाड कापले जाऊ नये. निदान त्या शिवछत्रपतींचं तरी ऐकणार आहोत की नाही आपण? * महावितरणचा IPO डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार लाँच करणार आहे. म्हणजे यापुढे तुमच्या घरात येणाऱ्या वीजेचा दर हे सरकार नाही तर एक खाजगी कंपनी ठरवणार आहे. * जिथे जिथे महाराष्ट्रावर संकट येईल तिथे महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. हा महाराष्ट्र वेगवेगळा ठेऊन चालणार नाही नाहीतर यांना जे साध्य करायचंय ते साध्य होईल. * उद्या टोरंटचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याचं वितरण कसं होणार आहे? कुठे होणार आहे? कुणामार्फत होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने जरूर दिली पाहिजेत. * तुम्हाला मी आत्ता सांगतो, आज या गोष्टी तुम्ही हसण्यावारी नेत आहात. भविष्यात तुमची पोरं म्हणतील, माझा बाप नालायक निघाला. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा लक्ष दिलं नाही. * जर तुम्ही जागे असाल आणि पेटून उठलात तर त्या एकाच गोष्टीला जगातलं कोणतंही सरकार घाबरतं.हे जर नको असेल तर लोण्यासारखे थंड बसा. * जर आपली जंगलं वाचवायची असतील तर शिवछत्रपतींचे आज्ञापत्र वाचा. महाराष्ट्रातला माणूस पेटून उठला या गोष्टीचा शिवछत्रपतींनाही आनंद वाटेल. * मी उद्योगधंद्यांविरोधातला माणूस नाही, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हे माझंही मत आहे. पण महाराष्ट्राला काय हवं आहे हे महाराष्ट्रातल्या माणसांनी ठरवलं पाहिजे. दुसरं कोणी ठरवून चालणार नाही. * मला फक्त एवढंच सांगायचंय जिवंत रहा. जी लढाई करायचीय त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचंय. मी तुमच्या बरोबर आहे पण नेतृत्व तुम्हालाच करायचंय. मलाही बघायचं आहे, महाराष्ट्र जिवंत आहे की नाही. * शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर सुद्धा १२५ वर्षे या संपूर्ण हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं. तो मराठी माणूस आज शांत कसा बसलाय? * मला पोलिसांनाही सांगायचंय त्यांना साथ देऊ नका. तुम्हीही या महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत. उद्या तुमच्याही घरावर टकटक होणार. राज ठाकरे ।
136
1,036
23
5,141
92,684
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
महाराष्ट्रातील ३२५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, या गंभीर परिस्थितीचा आज मुंबईत ग्रामीण भागातील माझ्या पदाधिकारी सहकाऱ्यांशी भेटून सविस्तर आढावा घेतला. यावेळी दुष्काळग्रस्त भागांतील परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण जनतेला भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. याचदरम्यान पत्रकारांशी संवाद साधत दुष्काळाच्या प्रश्नासह राज्यातील इतर राजकीय घडामोडींवरही भूमिका मांडली.
52
398
2
2,747
96,760
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत. अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या ! राज ठाकरे - उद्धव ठाकरे
274
1,044
49
5,440
196,661
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच !
326
612
74
5,169
344,772
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #गणेशोत्सव #GaneshChaturthi
40
118
2
1,531
45,869
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
भाजप ने महाराष्ट्राची सांस्कृतिक घडी बिघडवून टाकली आहे. ह्यांचं हिंदुत्व म्हणजे फक्त बाया नाचवणे, मग ते दहीहंडी-गणेशोत्सव असो वा उत्तरेत छटपूजा-कावड यात्रा असो !!
28
395
13
1,467
41,598
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
राज ठाकरे यांना काही जण "फेल राजकारणी" म्हणतात. पण एक प्रश्न आहे... जर ते फक्त राजकारणच करत असते, तर प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात पक्षाचे झेंडे आणि चिन्हेच दिसली असती. दिवाळीत स्वतःच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून दीपोत्सव उभा करतात. हजारो लोक येतात, देश-विदेशातील पर्यटकही पाहायला येतात. पण तिथे मनसेचा झेंडा लावून राजकारण केलं जात नाही. मराठी भाषेवर घाला घातला जातो, लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं लादलं जातं, तेव्हा लाखोंची सभा घेतली जाते. पण आदेश असतो - पक्षाचे झेंडे नकोत, हा मराठीचा लढा आहे. दिल्लीत भाजप सरकारच्या काळात पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधासाठी तरुणांना शिवाजी पार्कवर बोलावलं जातं. तेव्हाही संदेश एकच - मनसेचा झेंडा नको, हातात तिरंगा घ्या. पण जर हेच आंदोलन भाजपने केलं असतं, तर प्रत्येक फोटोत, प्रत्येक मंचावर आणि प्रत्येक कोपऱ्यात कमळाचा प्रचार दिसला असता. समाजापेक्षा पक्ष मोठा करण्याची त्यांची सवय महाराष्ट्राने अनेकदा पाहिली आहे. त्यांना महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचे आहे , प्रत्येक गोष्टीत राजकारण करून ते होणार नाही. राजकारण करायचं, पण समाजाला पक्षापेक्षा मोठं मानायचं... ही भूमिका आज दुर्मिळ झाली आहे. म्हणूनच सत्ता नसली तरी अनेकांच्या मनात एकच नाव आहे - "राज ठाकरे" #rajthackeray #uddhavThackeray #cjpprotest #mumbai #mumbaiprotest #students #studentprotest #student #UBT #mns #news #politics
40
90
5
532
12,707
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
ठाकरे एकत्र आलेत… त्याचे रिझल्ट काय लगेच एका झटक्यात निवडणुकीत मिळणार नव्हतेच… ती एक प्रोसेस आहे…. त्याचे पडसाद हळू हळू महाराष्ट्रात दिसायला लागतील… ठाकरेंनीही कशाचीही पर्वा न करत महाराष्ट्राला पर्याय द्यावा… लोकं १०० टक्के तुमच्या मागे उभे राहणारच ❤️
44
162
1,232
12,857
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? दिल्लीत सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनाला हाताळताना विद्यार्थ्यांवर सर्रास लाठीचार्ज केला जात आहे. हा लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असता तरी एकवेळ ठीक, पण हा म्हणजे कुठलातरी सूड उगवल्यासारखा केला जात आहे. जे व्हिडीओज समोर येत आहेत त्यात फक्त आंदोलनकर्ते विद्यार्थीच नाही तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं जात आहे. आणि पोलीस अशी कृत्य करत आहेत याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊच शकत नाही . मुळात आंदोलन का झालं? तर NEET परीक्षेत गोंधळ झाले ज्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला त्या रागातून ही मुलं रस्त्यावर उतरली. त्यांच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थी पण उतरले. थोडक्यात हे आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं केलं, मोठं केलं. मग विद्यार्थ्यांना मारण्याचं कारण काय होतं ? आणि हा अधिकार पोलिसांना दिलाच कोणी ? विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाही तशी ती पोलिसाना पण नाही. पण तरीही हे का केलं गेलं ? पूर्वी शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना सर्रास मारायचे ( त्यांचे प्रसाद मलाही अनेकदा मिळालेले आहेत ) जिच्यावर पुढे बंधनं आली कारण न्यायव्यवस्था सोडली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मग हाच न्याय पोलिसांना का नाही ? मी अनेकदा सांगत आलो आहे आणि आजदेखील हेच म्हणेन, महाराष्ट्रातले पोलीस असोत की इतर कुठलेही त्यांना जी कृती करायला सांगितली जाते ती करणे याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांना सर्वस्वी दोषी ठरवता येत नाही. पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते त्यांना कोणी अधिकार दिले ? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का ? युनायटेड नेशन्सचे काही महत्वाचे नियम आहेत जे ऍम्नेस्टी इंटरनॅशनल पण पाळते. ते म्हणजे, जेंव्हा केंव्हा बळ वापरायची वेळ येईल त्यासाठी केली जाणारी कृती संविधानिक असली पाहिजे- आवश्यक असेल तरच झाली पाहिजे- ती प्रमाणात असली पाहिजे -त्याचं उत्तरदायित्व हवं. आज नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, न्यूझीलँड या देशांमध्ये अशा पद्धतीने पोलिसी बळाचा वापर झाला तर त्याची कठोर चौकशी होते. आणि त्या चौकशीचा रोख हा आदेश देणाऱ्यांकडे जास्त असतो. हे आपल्याकडे पण व्हायला हवं. हे कोण करेल असा प्रश्न आहे. पहिल्यांदा देशाचे सरन्यायाधीश या मुलांना झुरळ म्हणणार आणि मग हेच देशातील सर्वोच्च न्यायालय आम्हाला सध्या तरी हे मारहाणीचे व्हिडीओज बघायला वेळ नाही सांगणार. हे अजब आहे. त्यांना नक्की कशासाठी वेळ आहे मग हा प्रश्नच आहे. सध्याच्या सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत म्हणून तरुण-तरुणींना रस्त्यावर उतरावं लागत आहे. त्यामुळे याचा विचार सिव्हिल सोसायटीने करायला हवा. यावर चर्चा व्हायला हवी. खासदारांनी संसदेत यावर चर्चेचा आग्रह धरला पाहिजे. प्रश्न राज्याकडे नागरिकांवर बळ वापरण्याचा अधिकार आहे की नाही, हा नाहीच आहे. तो अधिकार जवळपास प्रत्येक राज्याकडे असतो. खरा प्रश्न असा आहे की, घटनात्मक लोकशाही स्वतःच्या अधिकारावर संयम ठेवण्याची क्षमता दाखवते का? लोकशाहीची परिपक्वता विरोध किती कठोरपणे दडपला जातो यावर ठरत नाही; तर विरोधाचा आवाज कसा संयमाने आणि पुढच्या परिणामांचा विचार करत हाताळते हा आहे ! राज ठाकरे ।
199
857
26
4,351
74,051
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत . आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे ! अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल. नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं . नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ? २०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ? आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ? नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका ! राज ठाकरे ।
335
1,232
67
5,977
439,629
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
मा. राजसाहेब ठाकरे यांनी नागरिकांना पार्किंग व नो-पार्किंग क्षेत्रे सहजपणे ओळखता यावीत यासाठी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. #MNSAdhikrut
4
36
1
308
15,317
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
जंगल में चूनाव नहीं होता.. गरुड, सिंह यांचा कधी राज्याभिषेक होत नसतो.. त्यांना निवडणुकीच्या validation ची गरज नसते.. त्याच वागणं , बोलणं , जगणं हे राजासारखं असत.. 🔥 Fearless 🔥 crystal clear 🔥 bright Happy birthday @RajThackeray
6
43
3
207
3,102
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
व्यक्तिमत्त्व मोठं ठरतं ते केवळ लोकप्रियतेने नाही… लोकांना विचार करायला भाग पाडण्याची क्षमता महत्वाची! आपल्या वक्तृत्वातून, वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमधून मराठी माणूस व महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सातत्याने स्पष्ट मत मांडत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळू दे... #RajThackeray #HappyBirthdayRajThackeray #RajSahebThackeray #Maharashtra
3
33
1
302
4,272
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
मराठी माणसाला त्याची ओळख न विसरू देणार नाव म्हणजे राज ठाकरे 🚩 मनसे प्रमुख श्री राज ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🎉 @RajThackeray 👑
11
51
316
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
राजसाहेब आपणांस वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. मराठी भाषा, मराठी संस्कृती, आणि मराठी माणूस यांच्यावरचं तुमचं प्रेम हे अद्वितीय आहे, आणि त्यामुळेच या कशावरही कोणीही किंचित ओरखडा उमटवायचा प्रयत्न केला तर तुम्ही ज्या त्वेषाने समोरच्यांवर तुटून पडता हे या प्रांताने आणि देशाने पाहिलं आहे. आज आपल्याच राज्यात बाहेरून आलेल्यांची मुजोरी वाढत चालली आहे. अशी मुजोरी खपवून न घेणं आणि त्यांना शासन करणं हे काम खरंतर सत्ताधाऱ्यांच, पण सत्ताधारी इतके सत्तातुर झालेत की तेच यांना कुरवाळत आहेत. आणि महाराष्ट्राचं एकूणच नैतिक होकायंत्र भरकटतंय की काय असं वाटत असताना, महाराष्ट्रासाठीचा आणि मराठी माणसासाठीचा एकमेव आवाज आपण आहात. मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसावरचं तुमचं प्रेम हे परमोच्च आहे. तुमचं मराठी भाषेवरचं, मराठी माणसावरचं प्रेम हे जसं आजपर्यंत अनेकांना प्रेरणा देत आलं आहे, त्यांच्यात स्वाभिमान जागृत करत आलं आहे, ती प्रेरणा, तो स्वाभिमान मात्र वृद्धिंगत होत जाऊ दे याच शुभेच्छा. आपणांस पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा ! #राजठाकरे #MNSAdhikrut
13
57
1
376
4,768
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
मा.राजसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
42
83
3
1,466
23,071
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
आमचे श्रद्धास्थान,आमचे दैवत माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🌹 #श्री_राजसाहेब_ठाकरे #वाढदिवस
4
85
757
5,657
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
अशी माणसं कुठली राजकीय पार्श्वभूमी नसतानाही फक्त राज ठाकरेंकडेच कशी असतात.. शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं करून,समाजातील विविध घटकांसाठी वेड्यासारखं काम करणारी ही माणसं… मग सांगा ना… अशी माणसं तुम्हाला आमदार खासदार म्हणून का नकोत…???
8
75
2
431
6,473
श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweeted
मनसेचा नवी मुंबई मध्ये पहिला नगरसेवक निवडून आला, हे २० वर्ष वेड्यासारखा संघर्ष करणाऱ्या तेथील प्रत्येक स्थानिक मनसे कार्यकर्त्यांचं कष्टाचं फळ…❤️ काल राज ठाकरेंनी नवी मुंबईत भेट दिली…एवढ्या कठीण काळात ही राज ठाकरेंवरील प्रेम हे जरा सुद्धा हलत नाही ही आश्चर्याची गोष्ट !!!
5
38
1
364
4,076