ThePawanUpdates (@ThePawanUpdates) header
ThePawanUpdates (@ThePawanUpdates) profile picture

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक बातम्यांचे ONE STOP JUNCTION. For any querries, suggestions or news you can contact [email protected].

Joined March 2013
Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)
ठाणे! भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरातील 'ए.के. शोरमा' या सेंटरवरून शोरमा खरेदी करून खाल्ल्याने 17 मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. हा पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळातच एकापाठोपाठ एक अशा अनेक ग्राहकांची प्रकृती बिघडू लागली.
1
2
455
त्यांना पोटदुखीसह उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्रास असह्य झाल्याने नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी बाधितांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. सध्या या सर्वांवर रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
11
नाशिक! दत्तनगर - अंबड परिसरातील प्रदूषित पाण्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिका हद्दीतील अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींमध्ये केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १९३ उद्योग जलप्रदूषणास कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये १४६ इलेक्ट्रो प्लेटिंग
1
1
400
उद्योगांचा समावेश असून, त्यापैकी ६६ उद्योगांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ३० उद्योगांना बंदचे निर्देश, तर २३ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती एमपीसीबीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. दरम्यान, गोदावरी, नंदिनी नदी आणि
1
11
स्थानिक नाल्यांमधील पृष्ठभागावरील पाण्यात क्रोमियम आढळले नसले तरी बोअरवेलच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये क्रोमियमचे अंश आढळल्याचा धक्कादायक निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे.
10
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २३ नोव्हेंबर रोजी देशातील सर्वात महत्त्वाच्या बँकांची म्हणजेच डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स यांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील एखाद्या बँकेवर आर्थिक संकट आलं किंवा ती बुडाली, तर त्याचा परिणाम संपूर्ण देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होऊ शकतो.
1
1
407
त्यामुळे या बँकांना देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आरबीआयनं २०२६ साठी SBI, HDFC Bankआणि ICICI Bank या तीन बँकांना D-SIB चा दर्जा दिला आहे. या बँकांचा आकार आणि बँकिंग क्षेत्रातील त्यांचे महत्त्व लक्षात घेता त्यांना 'टू बिग टू फेल' म्हणजेच
1
28
इतक्या मोठ्या की त्या बुडणं परवडणारं नाही, असं मानलं जातं.
23
इराणमधील कट्टर धार्मिक कायद्यांचा आणखी एक धक्कादायक चेहरा जगासमोर आला आहे. हिजाब न घालता सार्वजनिकरीत्या गाणे गायल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध इराणी गायिका परस्तू अहमदी आणि तिच्या संगीतकार सहकाऱ्यांना सोमवारी प्रत्येकी ७४ कोडे मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली
1
1
481
व तिची अंमलबजावणी करण्यात आली. जून २०२६ मध्ये कोम शहरातील न्यायालयाने त्यांच्यावर 'अश्लील कंटेंट तयार करणे' आणि 'विनाहिजाब गायन करणे' या आरोपांखाली ही शिक्षा ठोठावली होती.
17
'मानवी बॉम्ब' बनून राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात मोठा आत्मघाती हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मेरठमधून उज्जैद नावाच्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.
1
1
433
उज्जैद हा पाकिस्तानात बसलेला दहशतवादी हँडलर शहजाद भट्टी याच्या नेटवर्कशी जोडलेला असल्याचं तपासात समोर आलं आहे. या अटकेमुळे देशातील एक मोठी दुर्घटना टळली असून, एटीएस, आयबी आणि इतर गुप्तचर यंत्रणा आता त्याची कसून चौकशी करत आहेत
13
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन सहसचिव आणि उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात अंशतः बदल करण्यात आले. उपसचिव विजय निवृत्ती भोसले यांची सुधारित तात्पुरती पदस्थापना आता सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आली आहे. याआधी त्यांची उपसचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांची
1
1
10
1,235
नगरविकास विभागात बदलीने पदस्थापना करण्यात आली होती. मात्र, या बदली आदेशाला न्यायालयीन प्रक्रियेची पार्श्वभूमी निर्माण झाली. त्याचबरोबर उपसचिव प्रसाद रामचंद्र शिंदे यांची प्रशासकीय कारणास्तव आंतरविभागीय बदली करण्यात आली आहे.
1
1
88
त्यांची राजशिष्टाचार विभागातून शालेय शिक्षण विभागात पदस्थापना करण्यात आली आहे.
71
पुणे! 10 कोटींच्या बदल्यात कंपनीला आदिवासींची जमीन मिळवून देण्याचा दावा करणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे वादात सापडले आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्यासोबत देवराम लांडे आणि त्यांचा मुलगा अमोल लांडे हे बोलणी करत असल्याची ऑडिओ क्लीप व देवराम लांडे यांच्या स्टींग
2
1
28
2,176
विधानसभेची निवडणूक लढवली होती. देवराम लांडे या ऑडियो क्लीपमधे प्रकल्पांबद्दल बातम्या देणाऱ्या स्थानिक पत्रकारांना आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांनाही आपण कंपनीच्या बाजुने वळवून घेऊ असा दावा करत आहेत.
1
4
198
त्याचबरोबर देवराम लांडे यांनी या ऑडिओ क्लीपमधे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचंही समोर आला आहे.
3
173
"अकाली दल पंजाबमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. आम्ही सर्व 117 जागांवर एकत्र निवडणूक लढवू. मोठा भाऊच मुख्यमंत्री होईल. याचा अर्थ अकाली दलाचा नेताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल." -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
9
542