Ganesh (@_rajthackeray14) profile picture

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा! 🚩

Joined July 2023
Photo by Ganesh (@_rajthackeray14)Photo by Ganesh (@_rajthackeray14)Photo by Ganesh (@_rajthackeray14)Photo by Ganesh (@_rajthackeray14)
Ganesh retweeted
Love him or hate him, you have to admit Raj Thackeray’s statements never go wrong.
13
113
1
668
44,102
Love him or hate him, you have to admit Raj Thackeray’s statements never go wrong.
13
113
1
668
44,102
That’s why we call it a true 'Ganimikava'! The video reached the masses and served its purpose, and out of respect for the request conveyed via the Mumbai Police Commissioner, it was taken down. Both objectives achieved gracefully. आम्ही शिवबाचे मावळे 🚩
1
2
46
That’s why we call it a true 'Ganimikava'! The video reached the masses and served its purpose, and out of respect for the request conveyed via the Mumbai Police Commissioner, it was taken down. Both objectives achieved gracefully. आम्ही शिवबाचे मावळे 🚩
1
2
46
4
36
130
6,559
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही. थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो. या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी. पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे. आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो.. पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी. मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
534
2,137
151
9,670
423,726
राज ठाकरे यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल मनसेने @Sonalimumbai1 या खात्या विरोधात कायदेशीर कारवाई करायला हवी @mnsadhikrut @SandeepDadarMNS @YKilledar
अशी हि बनवा बनवी...!! पोपट घाबरला.... कधी काळी मुंबई बंद करायची ताकद होती...आज पोलीस प्रोटेकशन मागत आहे...!!
15
91
414
14,447
Replying to @Sonalimumbai1
@MumbaiPolice @DGPMaharashtra खोटी बातमी प्रसारित केल्याबद्दल ह्या बाई वर गुन्हा दाखल करा. @kishormns24 मनसेच्या विधी विभागामार्फत ह्या व्यक्ती वर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कृपया योग्य ती कारवाई करा.
21
148
2,873
> People posted Adani’s documentary > Mumbai Police started sending notices to take it down > Then Raj Thackeray posted it from his handle > It now has over 33 Lakh views and Mumbai Police can’t even dare send a NOTICE to him. Someone from Mumbai Police ensured Adani’s Documentary is watched by the entire country.
This quoted post is unavailable.
41
1,517
9
8,040
324,487
The first priority of the next govt should be to nationalize all Adani assets. Watch this documentary, it will open your eyes.
This quoted post is unavailable.
1,344
9,701
298
42,965
1,562,508
"जेलमधून बाहेर काढून नागडं करून फटकावलं पाहिजे!” — Zero filters, zero fear. When it comes to calling out gangsters like Bishnoi, nobody else has the raw guts to talk like this! 🔥🚩 #RajThackeray
1
35
Ganesh retweeted
Samay Raina? Who? Raj Thackeray, always! 🔥🤣
34
345
10
2,454
135,797
Sarkar Raj 🔥
1
1
40
Sarkar Raj 🔥
1
1
40
आज माझ्या हस्ते मुंबई प्रेस क्लबच्या इमारतीत छायाचित्रकार श्री. गजानन दुधाळकर यांच्या 'डान्स ऑफ डेमोक्रसी' या छायाचित्र प्रदर्शनाचं उदघाट्न झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद झाला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे... ⁠२०१८ पासून मी बॅलेटपेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतोय. त्यावेळी मी देशातील अनेक नेते आणि निवडणूक आयुक्तांनाही भेटलो होतो. त्यावेळी मी काय बोलतोय हे लोकांना कळालं नाही ते आता कळतंय. •⁠ ⁠मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी. मी मतदान करतोय याचं समाधान मला असलं पाहिजे. •⁠ ⁠जगातील बहुतांश पुढारलेल्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होतं. फ्रान्समध्ये एका मतदाराने तक्रार केल्यानंतर तिथली ईव्हीएम मशीन्स बंद करून बॅलेट पेपरवर मतदान सुरू झालं मग भारतात ईव्हीएम मशिन्स कशाला हव्यात? •⁠ ⁠पुढच्या साधारण ३ ते ४ महिन्याांमध्ये या देशात काहीतरी मोठी गडबड होईल एवढं निश्चित. •⁠ ⁠पुढील काळात सरकारमधल्या अनेक गोष्टी समोर येतील. सरकार चुकांवर चुका करत राहील त्यातून काही महिन्यांमध्ये संपूर्ण देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. •⁠ ⁠सरकारने महाराष्ट्रातील ३००-३२५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. ही परिस्थिती आणखी खराब होणार आहे आणि कोणतीही पूर्वतयारी नसल्याने ती परिस्थिती सरकारला झेपणार नाही. •⁠ ⁠अमेरिकेतील कलाकार राष्ट्राध्यक्षांविषयी मत मांडतात म्हणून लगेच त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घातला जात नाही. आपल्याकडे त्याच भीतीने अनेक कलाकार बोलत नाहीत. •⁠ ⁠शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठीचार्ज केला, पोलिसांच्या गणवेशात तुम्ही तुमच्या पक्षाचे लोकं घुसवलेत, तुम्ही हंगामा केला, मुलांनी काहीच केलं नव्हतं. •⁠ ⁠सबीर भाटीया यांनी अदानींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे, ती काढून टाकायला सांगितलं आहे. कशाला काढायची? लोकांना पाहुदेत. प्रत्येक वेळी भाजपने स्पॉन्सर केलेलेच चित्रपट पाहायचे का आम्ही? •⁠ ⁠नागरी सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. हीच परिस्थिती जर भारतीय जनता पक्ष विरोधात असताना घडली असती तर ते काय बोलले असते? •⁠ ⁠लॉरेन्स बिश्नोईसारख्या लोकांना जेलमधून बाहेर काढून फटकावून काढला पाहिजे. त्याशिवाय कायद्याची भीती कशी राहिल? •⁠ ⁠मी अनेकदा हे सांगितलं आहे, आपल्याकडे लॉ आहे पण ऑर्डर नाही. माझा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे, त्यांना फ्री हँड दिला तर ते क्राईम रेट शून्यावर आणतील. •⁠ ⁠गेल्या काही वर्षांमध्ये देशात साचलेल्या गोष्टी फार काळ दबून राहू शकत नाहीत. प्रत्येकाचा राग हा एक ना एक दिवस बाहेर येईल.
97
358
10
2,143
114,595
आदित्य ठाकरे … नाम ही काफी है…! संध्याकाळी आदित्यचा फोन आला, तेंव्हा मी दिल्ली साठी विमानात बोर्डिंग करत होतो! आदित्य म्हणाला," काका, मी शिवाजी पार्क कडे निघालोय, तिकडे मुलांना अटक करत आहेत, अमितला (ठाकरे) अटक केलीय,मी पोहोचतोय) आदित्य शिवाजी पार्क ला पोहोचला.. हुकुमशाही विरोधात हिमतीने उभा राहिला! मिस्टर फडणवीस, ही लढणाऱ्यांची जमात आहे! ठाकरे एक आणि एकत्रच आहेत! जय महाराष्ट्र! @AUThackeray @amitrthackeray @Dev_Fadnavis @AmitShah
564
1,939
52
11,006
238,499
Nana is gone, but the man he portrayed on screen remains all around us. His anger remains, as does his restlessness, his humiliation, his struggle, and that intermittent surge of strength to confront his circumstances. Perhaps that is why, in bidding farewell to Nana, we are not merely parting with a great actor. We are parting with a face embodying the countless pent-up emotions of ordinary people. Heartfelt tributes to Nana Patekar on behalf of the Maharashtra Navnirman Sena. Raj Thackeray
7
66
1
804
54,282
आज पुण्यातील एम.पी.एस.सी. आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
95
660
13
4,489
89,896
आज महात्मा गांधीजींची जयंती. खरंतर कुठल्याही महापुरुषाची आठवण फक्त त्याच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला काढायची, त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचा आणि फोटो काढायचे इतक्या पुरतेच आपल्याला महापुरुष आठवतात. स्मारकं म्हणजे पुतळे ही आपली आवडती व्याख्या आणि आता पुतळ्यांच्या सोबत फोटो ही आपली नवीन श्रद्धांजली. असो. पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं... आणि प्रश्न विचारणं हे सद्य सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ ट्रोळ्या ‘ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात. आज आंदोलनांकडे संशयाने पाहिलं जातं, आंदोलकांवर बळाचा वापर होतो आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी गांधीजींची सर्वाधिक गरज आहे. गांधीजींनी या देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती? मला वाटतं—सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य! सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, सोयीने कायदा बदलण्याची शक्यता असते आणि या कायद्याच्या आधारावर गुन्हेगार ठरवण्याची शक्ती ते स्वतःकडे अबाधित ठेवतात. पण एवढं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर, त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते हे गांधीजींनी दाखवून दिलं. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीजच्या काळात या क्षमतेवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सर्वानी सावध राहायला हवं.. लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये. आणि हेच गांधीजींच्या शिकवणीचं सार आहे. म्हणून गांधीजी सत्ताधाऱ्यांना फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत बाकीचे गांधीजी त्यांच्या सोयीचे नाहीत. पण लोकशाहीला गांधीजी कायम आवश्यक असतात हे आपण विसरता कामा नये. महात्मा गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन ! राज ठाकरे ।
184
436
54
2,763
98,338