Balasaheb Thorat (@bb_thorat) header
Balasaheb Thorat (@bb_thorat) profile picture

Congress Working Committee Member | Former Minister @Maharevenue | Former President @INCMaharashtra

Sangamner, India
Joined March 2015
Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)Photo by Balasaheb Thorat (@bb_thorat)
संगमनेर तालुक्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या विविध सहकारी संस्थांमध्ये आज लक्ष्मीपूजन केले. सर्वत्र उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. सहकारी संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीत संगमनेरच्या बाजारपेठेत शेकडो कोटींची उलाढाल होते. सामान्य माणसाच्या आयुष्यात समृद्धी आणणाऱ्या या संस्था म्हणजे संगमनेरच्या प्रगतीचा भक्कम आधार आहेत. हा दीपोत्सव म्हणजे सहकार, लोकविश्वास आणि सामूहिक समृद्धीचा उत्सव आहे. #HappyDiwali 🪔 #दीपावली #लक्ष्मीपूजन #सहकारसमृध्दी #संगमनेर
2
49
1,389
Balasaheb Thorat retweeted
आपको और आपके परिवार को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! 🪔 हर घर में खुशियों और समृद्धि के दीप जलें। यह पावन पर्व पूरे भारत में सुख, शांति, सौहार्द और नई उम्मीदों की रोशनी लेकर आए।
2,475
8,165
363
41,260
660,013
आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔 लक्ष्मीपूजनाच्या या मंगल पर्वावर प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे दीप उजळावेत, प्रत्येक घरात सुख-समाधान नांदावे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजात प्रेम, बंधुभाव व एकतेचा प्रकाश सदैव पसरत राहावा, हीच मनःपूर्वक सदिच्छा! #लक्ष्मीपूजन #दीपावली #शुभदीपावली
4
3
40
946
🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान, सुख आणि समृद्धीचा प्रकाश घेऊन येवो. प्रत्येकाच्या आयुष्यात नवी उमेद, नवे चैतन्य आणि सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण होवो, हीच मनापासून सदिच्छा! आपण सर्वांना आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #शुभदीपावली #HappyDiwali #Diwali2026
6
5
39
1,095
Balasaheb Thorat retweeted
Sixty years in public life, and still the same person. Proud of you, Ma. ❤️ "The values that I learnt growing up survive. I have tried my best to be true to them: loyalty to family and friends, sincerity and feeling for others, the idea of being dutiful and responsible. I think I can say that in these I am the same person Rajiv met sixty years ago." - CPP Chairperson @SoniaGandhi Read her interview with The Hindu about her upcoming book, Belonging: A Journey of Love. thehindu.com/news/national/s…
1,158
5,348
145
22,224
793,839
Balasaheb Thorat retweeted
A long time ago Rajiv and I realised that there was no point in trying to keep up with all that had been written about us. But, as I say in the book, there came a time when I felt that I should tell my own story. Read my interview: thehindu.com/news/national/s…
331
2,606
59
7,803
156,108
दीपावलीनिमित्त आदरणीय शरद पवार साहेब यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी साहेबांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. साहेब लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू व्हावेत, हीच मनापासून सदिच्छा!
4
40
1
844
13,238
सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वानिमित्त प्रत्येकाच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. प्रत्येक घरात आनंदाचे दीप उजळोत आणि सर्वांच्या आयुष्यात भरभराटीची नवी पहाट उगवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! #धनत्रयोदशी #शुभदीपावली #Diwali
2
2
30
802
आज नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी व जिल्हाध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीस उपस्थित राहून काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून पत्रकार परिषदेला संबोधित केले. संघटनात्मक कामाचा आढावा, पक्षाची पुढील दिशा आणि आगामी काळातील नियोजन यांसह नाशिकमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांचे एक शिबिर संपन्न झाले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले होते, त्याच अजेंड्याचे पुनरावलोकन या बैठकीत करण्यात आले. भारतीय जनता पक्ष सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्तेसाठी जे केले तेच आता सहकार क्षेत्रातही करत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत सतेज ऊर्फ बंटी पाटील @satejp यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत असतानाही कोरमचा मुद्दा पुढे करत अध्यक्षाची निवड होऊ दिली नाही. ज्याचे बहुमत त्याचा अध्यक्ष निवडीचा अधिकार असतो. सरकारने कोरमचा नियम बदलला पाहिजे पण नवा कायदा करून ते आडमार्गाने गोकुळची सत्ता हस्तगत करत आहेत. सरकार नियुक्त ४ सदस्य नियुक्त करण्याचा अत्यंत चुकीचा प्रकार सरकारने सुरु केला आहे. हा कायदा संपूर्ण सहकार क्षेत्रातील संस्थांसाठी लागू होईल. भाजपा महायुती सरकार सहकार क्षेत्रच मोडीत काढण्यास निघाले आहे, या पापाचे धनी मुख्यमंत्र्यांनी होऊ नये. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सहप्रभारी बी.एम. संदीप, खासदार शोभाताई बच्छाव, आमदार हेमंत ओगले, उपाध्यक्ष गणेश पाटील, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस अभिजित सपकाळ व आदी उपस्थित होते. @sirivellaprasad @BMSandeepAICC @abhijitsapkal1 @hemantogale
1
7
101
1,407
उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक 📍नाशिक
4
22
641
📍नाशिक (पत्रकार परिषद) महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा आहे. राजकीय स्वार्थासाठी ही चळवळ मोडू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पापाचे धनी होऊ नये. ---------- बाळासाहेब थोरात
2
2
65
Balasaheb Thorat retweeted
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
The Maharashtra government is brazenly attempting to subvert the democratic mandate of milk producers at the Gokul Milk Federation by using legislative changes to manipulate the composition of an elected board. In the 19 October elections, the Congress-led panel won 13 of 25 seats, securing a majority over the Mahayuti’s 12. After Mahayuti-backed directors stalled the chairman’s election by remaining absent, the Bombay High Court directed a fresh election on 10 November. Instead of allowing the elected board to function, the state Cabinet has approved a proposal to nominate four government directors with voting rights, potentially altering the electoral arithmetic and overturning the mandate of milk producers. The larger question is whether a government can change the rules after an election simply because it does not like the result. We are challenging this decision in the Supreme Court to defend the democratic mandate and the autonomy of cooperative institutions.
726
8,825
210
30,211
946,115
वसुबारस… दिवाळीचा पहिला दिवस! 🪔 आपली कृषिप्रधान संस्कृती आणि पशुधन यांचे नाते अतूट आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात गोधनाचे असलेले महत्त्व अनन्यसाधारण आहे. वसुबारस हा सण आपल्याला पशुधनाप्रति कृतज्ञता आणि निसर्गाप्रति आदर व्यक्त करण्याची शिकवण देतो. आज गोधनाची पूजा करताना बळीराजाच्या जीवनात पुन्हा एकदा सुखाचे, समृद्धीचे दिवस यावेत, शेतकऱ्यांच्या कष्टांना भरभराटीचे फळ मिळावे, हीच मनापासून प्रार्थना! आपणा सर्वांना वसुबारसच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #वसुबारस #शेतकरी #गोधनपूजन #दिवाळी #शुभदिपावली
1
2
7
558
📍 संगमनेर संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित ‘एक पणती स्वच्छतेची, संगमनेरच्या सुंदर भविष्याची’ या स्वच्छता जनजागृती उपक्रमास उपस्थित राहून संगमनेरकरांशी संवाद साधला. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेच्या वतीने सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या आधुनिक वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये २ स्वीपिंग मशीन, १० नवीन घंटागाड्या, ५ घंटागाड्यांचे रिनोव्हेशन, ४ ट्रॅक्टर व २ अन्य वाहनांचा समावेश आहे. या आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून संगमनेर शहर धुळमुक्त व अधिक स्वच्छ करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. संगमनेर नगरपालिकेच्या आदर्शवत कामाची परंपरा मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळापासून सुरू झाली. त्यानंतर सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी ही परंपरा पुढे नेली. दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात स्वच्छतेच्या क्षेत्रात मोठे काम झाले आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी नगरपालिकेचा गौरव झाला. यातून शहरात स्वच्छता व शिस्तीची संस्कृती निर्माण झाली. दीपावलीच्या निमित्ताने आपण ज्या भावनेने आपले घर स्वच्छ करतो, त्याच भावनेने आपले शहरही स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे. शहरात मूलभूत सुविधा चांगल्या असून नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा जपून वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छतेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. संगमनेरमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळे असल्याचा अभिमान वाटला पाहिजे. स्वच्छतेच्या क्षेत्रात संगमनेर नगरपरिषदेला यापुढेही मोठा बहुमान मिळवून देण्याचे ध्येय आपण सर्वांनी ठेवले पाहिजे. या सुंदर उपक्रमासाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे आ. सत्यजित तांबे, नगराध्यक्षा मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नुरमोहम्मद शेख, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! #Sangamner
2
12
545
Wishing a very happy birthday to the young and hardworking AICC Secretary and In-charge of Maharashtra, Shri @BMSandeepAICC ! May you be blessed with good health, happiness, and a long life.
3
2
1
18
634
📍 धांदरफळ खुर्द प्रवरा ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन. #Sangamner
3
9
440
📍 धांदरफळ खुर्द आज धांदरफळ खुर्द येथे प्रवरा ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेच्या नूतन व अद्ययावत इमारतीचे उद्घाटन केले. संस्थेच्या माध्यमातून सभासद, शेतकरी बांधव आणि परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा व तत्पर सेवा मिळाव्यात, हा या नवीन वास्तूचा मुख्य उद्देश आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. पांडुरंग नारायण कोकणे यांनी सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या या संस्थेचा विस्तार होताना आनंद वाटतो. यावेळी प्रवरा दूध संस्था व प्रवरा ग्रामीण संस्थेच्या वतीने दीपावलीनिमित्त सभासद बांधवांना रिबेट, तेल व साखरेचे वाटप करण्यात आले. प्रवरा दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. संपतराव खताळ यांनी सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या या संस्थेने सभासदांच्या हिताची जपलेली परंपरा आजही कायम ठेवली आहे. संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाने एकत्रितपणे पुढाकार घेत अत्यंत सुंदर व नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. #sangamner
2
10
406
Balasaheb Thorat retweeted
LIVE: Insaaf Rally | Sangrur, Punjab xitter.gq/i/broadcasts/2onANypNq…
250
2,956
56
9,859
263,166
सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका सौ. सुलोचना केशव कुटे (पानसरे) यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला व पुढील आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षिका म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला ज्ञानाची दिशा देत त्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांचे पती श्री. भाऊसाहेब पानसरे यांनीही संगमनेर तालुक्यात महावितरणमध्ये उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना उत्कृष्ट सेवा बजावत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. शिक्षण आणि जनसेवेच्या क्षेत्रातील या दांपत्याचे योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #Sangamner
2
7
435