हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant) profile picture

प्रवक्ता -शिवसेना

Mumbai, India
Joined September 2016
Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही... लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही ! असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे. राज ठाकरे ।
289
886
32
4,381
190,743
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
" ईव्हीएमबद्दलच्या रास्त शंका राजसाहेबांनी २०१९ लाच उपस्थित केल्या होत्या. इतकंच नाही तर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी ते श्रीमती ममता बॅनर्जी अशा अनेक नेत्यांना भेटून आणि देशातील सगळ्या महत्वाच्या पक्षांना पत्र लिहून, कधी थेट संवाद साधून या सगळ्याबद्दल आवाज उठवावं असं सूचित केलं होतं. पण तेंव्हा कोणाला या विषयाचं कदाचित गांभीर्य लक्षात नाही आलं. अर्थात राजसाहेब काळाच्या खूप पुढचा विचार करून बोलतात हा अनुभव आहे. राजसाहेबांनी ६ वर्षांपूर्वी मांडलेली भीती आज सगळ्यांना जाणवत आहे... निवडणूका पारदर्शी व्हायला हव्यात आणि त्यासाठी आमचा हा लढा आहे.. " श्री. बाळा नांदगावकर, नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना #MNSAdhikrut
10
45
1
255
6,294
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
किती इंटरेस्टिंग आकडेवारी आहे पहा. ह्यावर्षी महाराष्ट्रातल्या वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या फेरीत ८,१३८ प्रवेश झाले. त्यात लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी पहिल्या दोन स्थानांवर आहेत. पुणे आणि मुंबई त्याच्या मागे आहेत. ह्यात बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत. वाचा #शिक्षण
4
25
151
4,285
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
908
1,801
178
18,882
429,668
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
घनश्याम उपाध्याय या व्यक्तीने राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल केलेली पिटिशन कायद्याच्या दृष्टीने कमजोर स्वरूपाची व कायद्याच्या चौकटीत न बसणारी आहे. मनसे ची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करावी ही मागणी सर्वोच्च न्यायालयात न टिकणारी आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय नोटीस इशू करीत नाही तोपर्यंत @RajThackeray यांना न्यायालयात जाण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालय घनश्याम ची याचिका फेटाळून लावण्याची शक्यताच जास्त आहे.
8
54
500
10,865
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
UNESCO has given the status of World Heritage Sites to 12 forts built by Maharashtra's beloved deity Chhatrapati Shivaji Maharaj. This is a matter of great joy. Out of these 12 forts, 11 are in Maharashtra and one fort, the fort of Jinji, is in Tamil Nadu. On this occasion, those who talk about Maharashtra's achievements will know how far the idea of Swarajya instilled by Maharaj had reached and will also know how old and strong the bridge between two languages and cultures is. Now one can hope that these 11 forts in Maharashtra will get preserved properly. Once UNESCO gives the status of World Heritage Site, there are very strict criteria for the conservation and renovation of those structures, which will have to be followed, and the forts of our Maharaj will get the attention they deserve. Now the state government will receive funds for the conservation of these forts and the state should also allocate some more themselves. Every single government in the past had left these forts in a state of disrepair, making it impossible to invite the world to visit them and show them the glory of our Maharaj and Maharashtra. I hope that this will change now. I have been saying this for many years that if we preserve the forts built by Maharaj and preserve the coastline Maharashtra has been blessed with, and if we make the necessary infrastructure available for tourism, the state’s economy will truly soar. Anyway. I just want to remind the government that just because UNESCO has given it World Heritage status, it cannot be taken for granted. If the criteria are not followed properly, the status gets withdrawn. So far there have been two such examples in the world. One example is the Arabian Oryx Sanctuary in Oman and the other one is the Dresden Valley in Germany. The Dresden Valley got the World Heritage status, but it was taken away in 2009 due to non-compliance with the criteria. The government should not just celebrate this but also acknowledge the responsibility. Firstly, the government should demolish all the unauthorized constructions on these forts immediately! Regardless of the religion or cast of the encroachers. Once again, congratulations to the Marathi people. Yours, Raj Thackeray.
1,762
622
212
8,411
608,738
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
मुंबई ची तुंबई झाली आणि आजी माजी सत्ताधारी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी बाहेर पडले. मात्र ही समस्या ज्यांच्यामुळे निर्माण होतेय त्यांच्याबद्दल केवळ मनसे च बोलतेय. लोकशाही @LokshahiMarathi वृत्तवाहिनी वरील चर्चेत मनसे प्रवक्ते हेमंतकुमार कांबळे @fighterhemant ह्यांनी पक्षाची भूमिका मांडली.
18
44
547
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
"मराठी अभ्यास केंद्र" आयोजित इ. पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात व इ. पहिलीच्या हिंदी पाठ्य पुस्तक छपाई विरोधात आणि महाराष्ट्रावरील हिंदीच्या आक्रमणाविरोधात अभ्यासक, कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांची आज जाहीर सभा मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर पूर्व, मुंबई येथे पार पडली. ह्या सभेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाचे प्रवक्ते श्री हेमंत कुमार कांबळे ह्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रवक्ते हेमंतकुमार कांबळे @fighterhemant यांनी असे मत मांडले की आपापसात कितीही मतभेद असले तरी मराठीच्या प्रश्नावर आणि या तिसऱ्या भाषेचा विरोध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. शिवाय आमची लढाई ही रस्त्यावरचीच असल्याने मराठी बाबत कोणतेही आंदेलन झाल्यास मनसे पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिल. #मराठी #MNS #Hindi #StopHindiImposition
3
42
1
127
2,461
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
होय इंग्रजी चालते,पण हिंदी चालणार नाही.... एका मागासलेल्या प्रदेशाची भाषा आम्हाला नाही शिकायची. @Dev_Fadnavis
1
9
32
306
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
मी गुजरातमध्ये ४ दिवस फिरत असताना, मी जिथे जिथे गेलो तिथे बँका आणि आस्थापनांवर गुजराती आणि इंग्रजी भाषेतील बोर्ड दिसले. मग महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का केली जात आहे? @mnsadhikrut @fighterhemant @CMOMaharashtra @SandeepDadarMNS @AjitPawarSpeaks @mieknathshinde
4
8
183
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत. बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी. प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे. पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत. माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो ! आपला नम्र राज ठाकरे ।
1,158
1,638
343
6,470
552,593