WARD FS BMC retweeted
🔷मुंबईच्या सागरी किनारपट्टीचे प्रदूषण कमी करून समुद्र स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या 'द ओशन क्लीनअप' (The Ocean Cleanup) या संस्थे दरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
🔷मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उप आयुक्त (पायाभूत सुविधा ) श्री. गिरीश निकम आणि 'द ओशन क्लीनअप'चे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बोयन स्लॅट यांनी या सामंजस्य करारावर सह्या केल्या.
🔷नेदरलॅंड दूतावासाचे महावाणिज्यदूत श्री. नबील तौवाती, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. मेहुल पेंटर यांच्यासह पर्जन्य जलवाहिन्या विभागाचा अभियंता - अधिकारी उपस्थित होते.
🔷या सहकार्याच्या माध्यमातून समुद्रात वाहून जाणारा प्लास्टिक कचरा आणि अन्य घनकचरा रोखणे, त्याचे संकलन करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सागरी प्रदूषणावर प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांचे पर्यावरणीय संतुलन राखणे, सागरी जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि स्वच्छ व सुंदर मुंबईच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
🔷'द ओशन क्लीनअप' (The Ocean Cleanup) ही आंतरराष्ट्रीय संस्थेने मालाड खाडीतील रामचंद्र नाला व ट्रॉम्बे खाडीतील सुभाष नगर नाला येथे ट्रॅश इंटरसेप्टर प्रणाली स्थापित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत एकूण ११९.५ मेट्रिक टन कचरा संकलित करून हटविण्यात आला आहे. यात ट्रॉम्बे खाडीतील १०२ मेट्रिक टन, तर मालाड खाडीतील १७.५ मेट्रिक टन कचऱ्याचा समावेश आहे. मुंबईमध्ये ‘प्लास्टिक फिशर’ (Plastic Fischer) आणि ‘युनायटेड वे मुंबई’ (United Way Mumbai) या स्थानिक अंमलबजावणी भागीदार संस्थांचे 'द ओशन क्लीनअप' यांना सहकार्य लाभले आहे.
🔷आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारांतर्गत प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी ‘इंटरसेप्टर’ (Interceptor) यंत्रणा अतिरिक्त नऊ ठिकाणी तैनात केली जाणार आहे. त्यात दादर - धारावी नाला, पिरामल नाला, गजधरबंध नाला, मिठी नदी, ट्रॉम्बे खाडी, कला नगर नाला, राजेंद्र नगर नाला, माहुल नाला व मालवणी नाला या ठिकाणांचा समावेश आहे. प्लास्टिक कचरा अरबी समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दिशेने हा सामंजस्य करार एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
WARD FS BMC retweeted
🔷As per Solid Waste Management Rules, 2026, it is mandatory for all waste generators to segregate waste into four streams. Bulk Waste Generators are also required to scientifically manage the waste generated by them.🗑️🚮
🔷The Hon’ble Supreme Court, vide its order dated 5 May 2026 in Civil Appeal No. 6174 of 2023, and the Hon’ble Bombay High Court, vide its order dated 3 November 2026 in Writ Petition No. 790 of 2018, have also mandated its compliance.
#mybmcupdates
@mybmcSWM
WARD FS BMC retweeted
🔷घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या तरतुदींनुसार, सर्व कचरा निर्माणकर्त्यांनी कचऱ्याचे ४ स्वतंत्र प्रकारांमध्ये वर्गीकरण करणे अनिवार्य आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी (BWG) त्यांच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वैज्ञानिक व पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन करणे बंधनकारक आहे.🗑️🚮
🔷माननीय सर्वोच्च न्यायालयाने सन २०२३ मधील दिवाणी अपील क्र. ६१७४ प्रकरणी दिनांक ५ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार तसेच सन २०१८ मधील रिट याचिका क्र. ७९० प्रकरणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार संबंधित तरतुदींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
#mybmcupdates
@mybmcSWM
WARD FS BMC retweeted
📚Mumbai Book Festival – 2026: Promoting the Culture of Reading!
🔷The Mumbai Book Festival – 2026 is being organised to promote the culture of reading and provide an enriching experience of knowledge, ideas and the world of literature through books.
🗓️The festival will be held from 24th to 29th November 2026 at the University of Mumbai, Kalina Campus. The exhibition will remain open to the public daily from 11:00 a.m. to 10:00 p.m.
🔷In addition to the book exhibition, the festival will feature literary discussion sessions, special activities for children, cultural programmes and theme-based exhibitions, offering visitors an opportunity to explore and experience diverse aspects of literature and knowledge.
#MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #Mumbai #BookFestival #NBTIndia #ReadIndia #BookLovers #Literature #MumbaiReads
@nbt_india
आज एफ/दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी आभा (ABHA) कार्ड निर्मिती व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
#MyBMCUpdates
1
594
WARD FS BMC retweeted
📚Mumbai Book Festival – 2026: Promoting the Culture of Reading!
🔷The Mumbai Book Festival – 2026 is being organised to promote the culture of reading and provide an enriching experience of knowledge, ideas and the world of literature through books.
🗓️The festival will be held from 24th to 29th November 2026 at the University of Mumbai, Kalina Campus. The exhibition will remain open to the public daily from 11:00 a.m. to 10:00 p.m.
🔷In addition to the book exhibition, the festival will feature literary discussion sessions, special activities for children, cultural programmes and theme-based exhibitions, offering visitors an opportunity to explore and experience diverse aspects of literature and knowledge.
#MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #Mumbai #BookFestival #NBTIndia #ReadIndia #BookLovers #Literature #MumbaiReads
@nbt_india
WARD FS BMC retweeted
📚वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा 'मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६' दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठ, कलिना संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे.
#MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #Mumbai #BookFestival #NBTIndia
@nbt_india
WARD FS BMC retweeted
🏥 मुंबई डिजीहेल्थ कनेक्ट अभियानाद्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) ला गती.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रीमती मनसादेवी तुलसीदास अगरवाल रुग्णालय आणि सेठ वाडीलाल छभुत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा (राजावाडी) रुग्णालय येथे मुंबई डिजीहेल्थ कनेक्ट (MDC) अभियानांतर्गत ABDM च्या अंमलबजावणीला गती देण्यात येत आहे.
🔷या अभियानांतर्गत ABHA कार्ड निर्मिती, हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (HPR) आणि हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री (HFR) मधील नोंदणीवर विशेष भर देण्यात येत आहे.
🔷आज रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आया, सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांची हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (HPR) अंतर्गत नोंदणी करण्यात आली.
🔷या उपक्रमामुळे आरोग्यसेवा व्यावसायिकांची डिजिटल ओळख निर्माण होण्यास, आरोग्य सुविधांची डिजिटल नोंदणी सुनिश्चित होण्यास तसेच ABHA द्वारे नागरिकांच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध व सुलभपणे शेअर करण्यास मदत होणार आहे. यामुळे आरोग्यसेवांची सुलभता, सातत्य आणि कार्यक्षमता वाढण्यास हातभार लागेल. मुंबईची डिजिटल आरोग्य परिसंस्था अधिक सक्षम व एकात्मिक करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.
#MumbaiDigiHealthConnect #ABDM #ABHA #HPR #HFR #DigitalHealth #MyBMCUpdates #BMC #PublicHealth
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
WARD FS BMC retweeted
💧मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा…
#mybmcupdates
WARD FS BMC retweeted
📚वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा 'मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६' दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठ, कलिना संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे.
#MumbaiBookFestival
@nbt_india
WARD FS BMC retweeted
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुसज्ज नागरी सेवा-सुविधा पुरवाव्यात
पूर्वतयारी आढावा बैठकीत मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे निर्देश
🔷हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून शिवसैनिक तसेच नागरिक हे दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानस्थित स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतात. त्यादृष्टीने स्मृतिस्थळ व परिसरात सुसज्जता राखून आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत.
🔷मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या अनुषंगाने स्मृतिदिन पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती दालनात, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी महापौर श्रीमती तावडे बोलत होत्या.
🔷या बैठकीस उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, सुधार समितीच्या अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, जलअभियंता श्री. मंगेश शेवाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री. अजित तावडे, उपप्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. विजय गोतारणे, उप उद्यान अधीक्षक श्री. दशरथ घुले, उप प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. के. आर. यादव, कीटकनाशक अधिकारी श्री. रितेश मारापे तसेच सहायक पोलीस आयुक्त (मध्य पश्चिम वाहतूक) श्री. दिलीप पाटील, सहायक पोलीस आयुक्त (समन्वय - मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय) श्री. मोहन खंदारे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔷प्रारंभी, सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई यांनी पूर्वतयारीची माहिती दिली. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ आहे. दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिस्थळ व परिसरात पुरवावयाच्या नागरी सेवा-सुविधा तसेच स्मृतिस्थळावर करावयाची तयारी ही कामे सुरू करण्यात आली आहेत, असे नमूद करून त्याचा तपशील श्री. देसाई यांनी सादर केला.
🔷उपमहापौर श्री. संजय घाडी म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि कार्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. यंदा बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम सुरू आहेत. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता, स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील स्मृतिस्थळावर महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक येतील. त्यामुळे महानगरपालिकेने पोलीस आणि इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने पुरेशी व्यवस्था करावी. दर्शन रांगेतील नागरिकांसाठी छत, पिण्याचे पाणी, मैदानात धूळ प्रतिबंधक उपाययोजना, आसन व्यवस्था, सातत्याने परिसरात स्वच्छता, वाहतूक पोलिसांशी समन्वय या सर्व बाबींवर योग्य कार्यवाही करावी. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची विविध छायाचित्रे परिसरात प्रदर्शित करावीत, इत्यादी सूचना श्री. घाडी यांनी दिल्या.
🔷अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईसह महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांना मानणारा वर्ग महाराष्ट्रासह देशभरात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोठ्या संख्येने येणारे शिवसैनिक आणि नागरिक लक्षात घेता, महानगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या नागरी सेवा-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. पिण्याचे पाणी, दर्शन रांग, स्वच्छता, वाहतूक समन्वय, फिरती प्रसाधनगृहे यासह महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्ज ठेवाव्यात. त्याचप्रमाणे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निगडित इतर स्थळे, पुतळे, चौक इत्यादी ठिकाणी देखील स्मृतिदिनास साजेशी व्यवस्था करावी. आवश्यकता भासल्यास प्रशासनाने वाढीव निधी उपलब्ध करून घ्यावा आणि सुसज्ज व्यवस्था करावी, असे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले. या पूर्वतयारीची प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पाहणी केली जाईल, असेही महापौरांनी नमूद केले.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
WARD FS BMC retweeted
📚वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६!
🔷पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार आणि साहित्यविश्वाचा समृद्ध अनुभव देणारा मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६ आयोजित करण्यात येत आहे.
🗓️ दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठ, कलिना संकुल येथे सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
🔷या महोत्सवात पुस्तक प्रदर्शनासह साहित्यिक चर्चा सत्र, बालकांसाठी विशेष उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विषय विशेष प्रदर्शनांचा आनंद घेता येणार आहे.
#MumbaiBookFestival
@nbt_india
WARD FS BMC retweeted
📚Mumbai Book Festival – 2026: Promoting the Culture of Reading!
🔷The Mumbai Book Festival – 2026 is being organised to promote the culture of reading and provide an enriching experience of knowledge, ideas and the world of literature through books.
🗓️The festival will be held from 24th to 29th November 2026 at the University of Mumbai, Kalina Campus. The exhibition will remain open to the public daily from 11:00 a.m. to 10:00 p.m.
🔷In addition to the book exhibition, the festival will feature literary discussion sessions, special activities for children, cultural programmes and theme-based exhibitions, offering visitors an opportunity to explore and experience diverse aspects of literature and knowledge.
#MumbaiBookFestival
@nbt_india
आज एफ/दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी आभा (ABHA) कार्ड निर्मिती व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
#MyBMCUpdates
1
122
आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त विविध आरोग्य केंद्रांवर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांची रक्तातील साखरेची तपासणी, पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत कार्ड नोंदणी तसेच लहान बालकांचे नियमित लसीकरण करण्यात आले.
#MyBMCUpdates – at Mumbai, India
82
विशेष स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ/ दक्षिण' विभागातील शिवडी येथील क्षयरोग महानगरपालिका रुग्णालय येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#MyBMCUpdate
#स्वच्छमुंबई
120
विशेष स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ/ दक्षिण' विभागातील परेल येथील किंग एडवर्ड मेमोरियल महानगरपालिका रुग्णालय येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#MyBMCUpdate
#स्वच्छमुंबई – at Mumbai, India
135
WARD FS BMC retweeted
🚨महत्त्वाची सूचना🚨
🔷अग्निसुरक्षेसंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी, अग्निशमन प्रतिबंधात्मक प्रमाणपत्रांचे वितरण तसेच त्यासंदर्भातील सेवा शुल्क आकारणी याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत जनहितार्थ सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. समाजमाध्यमांवर या संदर्भात प्रसारित होत असलेली माहिती दिशाभूल करणारी व खोटी आहे.
#mybmcupdates
#fakenews
आज एफ/दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी आभा (ABHA) कार्ड निर्मिती व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
#MyBMCUpdates – at Mumbai, India
166
आज एफ/दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी आभा (ABHA) कार्ड निर्मिती व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
#MyBMCUpdates
1
185




































