अंधारावर प्रकाशाची मात करणारा आणि समृद्धीची नवी पहाट आणणारा मंगल दिवस! लक्ष्मीमातेच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या घरात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो… सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#लक्ष्मीपूजन
@mieknathshinde @DrSEShinde
@Shivsenaofc
धनत्रयोदशीच्या पवित्र पर्वावर भगवान धन्वंतरींची कृपा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांना लाभो. प्रत्येकाच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी नांदो. प्रत्येक घर आनंदाने उजळून निघो, हीच प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#धनत्रयोदशी #धनतेरस #Dhanteras2026
वसुबारसच्या या पवित्र सणानिमित्त गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो. प्रत्येक घरात आनंद आणि मांगल्याचा प्रकाश सदैव राहो, हीच मंगलमय सदिच्छा!
#वसुबारस #Vasubaras #VasuBaras2026 #गोमाता
@mieknathshinde @DrSEShinde
@Shivsenaofc
प्रभागातील गणेश नगर तसेच मद्रास गल्ली येथील रस्ता व पॅसेज दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन करण्यात आले.
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc
भारताचे #लोहपुरुष, देशाचे पहिले गृहमंत्री व उप-पंतप्रधान #सरदार #वल्लभभाई_पटेल या थोर व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या महान विचारांना आज त्यांच्या जयंतीदिनी सविनय प्रणाम....
#IronManOfIndia #Sardar #VallabhbhaiPatel #राष्ट्रीय_एकता_दिवस
@mieknathshinde @Shivsenaofc
BEST कला आणि क्रीडा मंडळाच्या हॉकी विभागाच्या वतीने आयोजित आंतरआगार हॉकी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला तसेच यानिमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम ला भेट दिली व तेथील कर्मचारी यांच्याशी सवांद साधला.
@mieknathshinde @DrSEShinde
@Shivsenaofc
खेळ हा केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून तो शिस्त, संघभावना, जिद्द आणि खिलाडूवृत्ती जोपासण्याचे प्रभावी माध्यम आहे.
BEST मधील क्रीडा परंपरा अधिक समृद्ध व्हावी आणि खेळाडूंना आपल्या कौशल्याच्या जोरावर नवनवीन यश संपादन करण्याची संधी मिळावी, हीच सदिच्छा.
@mieknathshinde
@Shivsenaofc
दसऱ्याच्या या मंगलमय पर्वावर आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि यशाची सोनपावले पडोत. आपट्याच्या पानांसारखं सोनं लाभो, प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि आयुष्यात नेहमी आनंद नांदो!
विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#Dussehra #Vijayadashami #HappyDussehra
भगवा घेऊन खांद्यावर,
शिवसैनिक दिसेल बांधावर!
शिवसेनेचा दसरा मेळावा !
२० ऑक्टोबर, २०२६
संध्याकाळी ५ वाजता
स्थळ - नेस्को, गोरेगाव
#दसरामेळावा #Shivsena #Eknathshinde
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc
आई दुर्गेचा आशीर्वाद, सेवाभावाचा संकल्प!
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
याप्रसंगी खासदार डॅा. श्रीकांत शिंदे जी उपस्थित होते.
@mieknathshinde
@DrSEShinde @Shivsenaofc
स्त्री शक्तीच्या सामर्थ्याला सलाम करणारा आणि समाजातील प्रेरणादायी महिलांच्या योगदानाला वाव देणारा नवदुर्गा सन्मान सोहळा मा.खा.राहूल शेवाळे तसेच अध्यक्षा कामिनी राहूल शेवाळे यांच्या नियोजनाखाली संपन्न्न झाला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.
📍 भुवनेश्वर | ओडिशा
🚶♀️ ‘Urban Mobility’ परिसंवादांतर्गत अनुभवात्मक पदभ्रमंती!
जनपथ येथील पादचारी मार्ग आणि NMT (Non-Motorised Transport) सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुलभ आणि नागरिकाभिमुख रस्ते व्यवस्था कशी विकसित करता येईल, याचा अनुभव घेतला.
शाश्वत शहरी वाहतूक, पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी!
#UrbanMobility #PrajaFoundation #Bhubaneswar #PedestrianFriendly #SustainableUrbanDevelopment #UrbanGovernance
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते॥
सर्वांना #घटस्थापना व #नवरात्रोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा !
#नवरात्रि #शारदीय_नवरात्रि_उत्सव
#Navratri2026
@mieknathshinde
@DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc
काही कलाकार पडद्यावर भूमिका साकारतात…
पण काही कलाकार स्वतःच एक युग बनतात.
नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते;
ते आपल्या संवादातून मनाला भिडणारे, आपल्या अभिनयातून अस्वस्थ करणारे आणि आपल्या साधेपणातून माणुसकीची जाणीव करून देणारे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या आवाजातील ती धार, डोळ्यांतील तो भाव आणि अभिनयातील तो जिवंतपणा…
हे सगळं आता आठवणींच्या पडद्यावर कायमचं जिवंत राहील.
मराठी मातीचा हा अस्सल कलाकार आणि भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर अध्याय यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
ॐ शांती.
#NanaPatekar
#naamfoundation
@mieknathshinde
@DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
सायन येथील अणिक बस आगारात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या दुर्घटनेची माहिती घेताना संबंधित अधिकारी व अग्निशमन दलाकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
BEST समितीच्या अध्यक्षा म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरक्षित राहणे, प्रवाशांची सुरक्षितता आणि आगारातील सुरक्षाव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, यासाठी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या तसेच ह्यापुढे प्रत्येक आगारामध्ये एक अग्निशमक गाडी तैन्यात करण्यात यावी जेणेकरून अशी घटना घडल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात येईल.
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc
प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc
सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्यलढ्याची दिशा देणारे महात्मा गांधी.
सत्य, साधेपणा आणि नैतिक मूल्यांचा विचार समाजमनात रुजवणारे राष्ट्रपिता.
त्यांच्या विचारांचा आणि देशसेवेतील योगदानाचा आजही समाजाला मार्गदर्शक वारसा आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc
गणपती बाप्पा मोरया..!
मंगलमूर्ती मोरया..!
मुंबईतील प्रसिद्ध अश्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आज मनोभावे दर्शन घेतले. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
#chinchpokalichachintamani
@mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul
@Shivsenaofc
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया॥
गणपती बाप्पा मोरया!
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे आज मनोभावे दर्शन घेतले. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
बाप्पाच्या दिव्य दर्शनाने मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान लाभले.
गणपती बाप्पा मोरया !
मंगलमूर्ती मोरया !
#lalbaugcharaja
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc




































