इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य. संचालक,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , छ.संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar
Joined August 2018
आपण भरभरून मतदान करून भगव्याची शान राखली.. आता छत्रपती संभाजीनगर नावाला शोभेल असा विकास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! #भाजपाचे_छत्रपती_संभाजीनगर
4
1
26
6,690
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त फुलेवाडा, भिडेवाडा विकासाला गती देण्याच्या सूचना! ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महसूल मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन सहभागी होऊन इतर मागासवर्गीय तसेच भटके-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.. शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत सदर बैठकीत पुढील विषयांवर चर्चा करून सूचना दिल्या.. १) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुण्यातील फुलेवाडा आणि भिडेवाडा येथील सुशोभीकरण व विकासकामे गतीने पूर्ण करावीत. २) महात्मा फुले यांच्या नावाने दुष्काळ निवारणासाठी योजना तयार करण्याच्या दृष्टीने संबंधित ८ विभागांनी कार्यवाही करावी. ३) राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याकरिता उर्वरित जागांची निश्चिती १५ दिवसांत पूर्ण करावी. मुंबई शहरातही जागा उपलब्ध करून द्यावी आणि प्रत्येक वसतिगृहात ५०० विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होईल, असा आराखडा तयार करावा. आतापर्यंत १२ ठिकाणच्या जागा निश्चित झाल्या आहेत. ४) भटके-विमुक्त जाती-जमातींच्या विकासासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष सुरू करावे. ५) व्हीजेएनटी समाजासोबतच ओबीसी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेतील भत्त्यात वाढ करावी. या समाजघटकांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद, शैक्षणिक सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे.. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.श्री.छगन भुजबळ, कृषी मंत्री ना.श्री.दत्तात्रय भरणे, पाणीपुरवठा मंत्री ना.श्री.गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री ना.श्री.संजय राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्री.अतुल पाटणे, ओबीसी विभागाचे सचिव श्री.आप्पासाहेब धुळाज आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री.नवलकिशोर राम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.. #ओबीसी_कल्याण #भटके_विमुक्त #SocialJustice #StudentWelfare
81
शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी दमदाटी करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. अशा कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार. #मायक्रोफायनान्स #शेतकरी_संरक्षण #कठोर_कारवाई #Maharashtra
1
2
116
येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,००० च्या अग्रीम मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार.. #अग्रीम_मदत #शेतकरी_दिलासा #Maharshtra
1
2
92
‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याचा नेत्रदीपक सोहळा, स्वराज्याच्या वैभवाची भव्य अनुभूती.. #प्रौढ_प्रताप_पुरंदर #शिवशौर्य #छत्रपतीसंभाजीनगर #ChhatrapatiSambhajinagar
76
दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि आत्मसन्मानाचे बनवणे ही सरकारची जबाबदारी आहे.. त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेतील अडथळे दूर करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे! #DivyangWelfare #Empowerment #MahayutiGovernment #SocialJustice #Maharashtra
77
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या आर्थिक लाभात वाढ! विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या आर्थिक लाभात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सुधारित लाभ सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहेत.. या योजनेंतर्गत मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्त्यापोटी वार्षिक एकूण ₹८०,००० मिळणार आहेत. इतर विभागीय शहरे व ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रासाठी ₹६८,०००, जिल्ह्यातील इतर ठिकाणे तसेच महानगरपालिका हद्दीपासून ५ किमी परिसरातील शैक्षणिक संस्थांसाठी ₹५७,०००, तर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ₹५०,००० इतका वार्षिक लाभ निश्चित करण्यात आला आहे.. याशिवाय, वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याकरिता प्रतिवर्ष ₹८,०००, तर इतर शाखांतील विद्यार्थ्यांना ₹४,००० इतकी अतिरिक्त एकरकमी मदत मिळणार आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्याच्या मदतीसह पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणानुसार वार्षिक ₹५४,००० ते ₹८८,००० पर्यंत लाभ मिळू शकतो.. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील अनेक कुटुंबांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक खर्च भागविणे सोपे व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. योजनेच्या इतर अटी व शर्ती कायम राहणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी अर्जासाठी संबंधित इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून आवश्यक माहिती घ्यावी.. #विद्यार्थी_सक्षमीकरण #उच्च_शिक्षण #EducationSupport #StudentWelfare
124
‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याच्या दुसऱ्या दिवशीही भव्य सादरीकरणातून छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गाथा अनुभवायला मिळाली. #शिवशौर्य #प्रौढ_प्रताप_पुरंदर #DevendraSevaMahotsav #ChhatrapatiSambhajinagar
3
99
भाजपा खासदार श्री.अशोक चव्हाण आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! जनसेवेचे आपण करीत असलेले कार्य वृद्धिंगत होऊन आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा.. @AshokChavan1958 #वाढदिवस #शुभेच्छा #happybirthday
1
9
218
शिवशौर्याचा जागर, ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याचा दुसरा दिवसही तितकाच भव्यदिव्य! ‘देवेंद्र सेवा महोत्सवा’अंतर्गत ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याच्या दुसऱ्या दिवसालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा, स्वराज्याची प्रेरणा आणि अद्वितीय सादरीकरणाने उपस्थितांना इतिहासाचा पुन्हा एकदा रोमांचक अनुभव दिला.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महोत्सवातून सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यासोबतच समाजाप्रती संवेदनशीलतेचा संदेशही दिला जात आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सन्मानासाठी आणि मदतीसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याचा अनुभव घेण्यासाठी सहकुटुंब अवश्य उपस्थित राहा! 📍 जाबिंदा मैदान, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर ⏰ दररोज सायंकाळी ६ वाजता #शिवशौर्य #प्रौढ_प्रताप_पुरंदर #DevendraSevaMahotsav #ChhatrapatiSambhajinagar
1
6
176
मंत्रिमंडळ निर्णय : जनहितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय! जनतेच्या हिताला प्राधान्य देत, सकारात्मक बदल घडवून आणणारे महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. या जनहिताच्या निर्णयांसाठी मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांचे मन:पूर्वक आभार व धन्यवाद! #मंत्रिमंडळ_निर्णय #जनहित #MaharashtraGovernment #Governance
1
3
6
213
यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तू खरेदीला प्राधान्य द्या. आपल्या एका निर्णयातून स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक बळ मिळेल आणि ‘आत्मनिर्भर भारत’चा संकल्प अधिक मजबूत होईल. #VocalForLocal #SwadeshiDiwali #AatmanirbharBharat
1
1
3
141
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १% निधी राखीव ; १६ योजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी! राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन, स्वावलंबन आणि सक्षमीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सन २०२५-२६ पासून दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या या निधीतून १६ प्रमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.. दिव्यांगांसाठी कोणत्या योजना राबविण्यात येणार? १. ई-वाहन आणि ई-बाईक: रोजगार किंवा स्वरोजगारासाठी दिव्यांगांना कमाल ३ लाख रुपयांचे ई-वाहन किंवा १.५ लाख रुपयांची ई-बाईक देण्यात येणार आहे. यासाठी वय १८ ते ५० वर्षे, किमान ४० टक्के कायमस्वरूपी दिव्यांगत्व आणि वैध वाहन परवाना आवश्यक असून रोजगार व स्वरोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल.. २. ई-व्हीलचेअर: हालचालींमध्ये अडचण असलेल्या पात्र दिव्यांगांना कमाल १ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य.. ३. डिजिटल उपकरणे: डिजिटल सक्षमतेसाठी टॅबलेट, टॉकिंग लॅपटॉप आणि स्क्रीन रीडर यांसारख्या उपकरणांसाठी कमाल ७५ हजार रुपये.. संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. facebook.com/share/p/1JuFbmH… #दिव्यांग_सक्षमीकरण #स्वावलंबन #DisabilityEmpowerment #InclusiveDevelopment
1
7
163
अराजकवादी प्रवृत्ती आणि संविधानविरोधी कृतींवर मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे परखड भाष्य.. हा लेख आवर्जून वाचा!! #लोकशाही #संविधान #SaveDemocracyRemoveAnarchy
2
5
120
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प : विकास आणि पर्यावरणाबाबत वस्तुस्थिती जाणून घ्या! कर्जत तालुक्यातील सैदोंगर येथे प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी ऊर्जा साठवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी टॉरेंट पॉवर कंपनीकडून गुंतवणूक केली जाणार असून, निर्माण होणारी वीज महाराष्ट्राला उपलब्ध होणार आहे.. नेमका हा प्रकल्प काय आहे? पंप स्टोरेज प्रकल्पात अतिरिक्त वीज वापरून पाणी उंच जलाशयात साठवले जाते. विजेची मागणी वाढल्यावर हे पाणी खाली सोडून वीज निर्माण केली जाते. त्यामुळे सौर ऊर्जेसारख्या नवीकरणीय स्रोतांमधून मिळणाऱ्या विजेचा अधिक प्रभावी वापर करता येतो.. प्रकल्पाबाबत महत्त्वाचे मुद्दे : - महाराष्ट्रासाठी ऊर्जा: प्रकल्पाची नियोजित क्षमता ३,००० मेगावॉट असून, राज्याच्या वीजपुरवठ्याला आणि वीजव्यवस्थेच्या स्थिरतेला मदत होणे अपेक्षित आहे.. - गुंतवणूक आणि रोजगार: प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आर्थिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.. - पर्यावरणीय मंजुरी: कंपनीच्या माहितीनुसार, पर्यावरणीय व वनविषयक मंजुरीसाठी सुमारे १८ महिन्यांची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.. - वनजमीन आणि वृक्षारोपण: प्रकल्पासाठी २३३ हेक्टर वनजमीन आवश्यक आहे. कंपनीने भरपाईच्या वनीकरणासाठी २५३ हेक्टर खासगी जमीन वन विभागाकडे दिल्याचे सांगितले आहे. कंपनीकडून ६० हजार, तर वन विभागाकडून ३० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे.. - अभयारण्यापासून अंतर: कंपनीच्या माहितीनुसार, प्रकल्प भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे १६ किमी आणि ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे २० किमी दूर आहे. प्रकल्पाचे घटक अभयारण्याच्या आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.. - प्रदूषणात संभाव्य घट: कोळशावर आधारित वीजनिर्मितीची गरज कमी करण्यास मदत झाल्यास कार्बन उत्सर्जन, कोळशाचा वापर आणि औष्णिक प्रकल्पांसाठी लागणाऱ्या शीतकरणाच्या पाण्याची बचत होऊ शकते.. या प्रकल्पाबाबत पर्यावरणीय परिणाम आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे विकासासोबतच वनसंपदा, जैवविविधता आणि स्थानिक नागरिकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी मंजुरीतील अटींची काटेकोर अंमलबजावणी व प्रभावी देखरेखही महत्त्वाची आहे.. #ऊर्जा_सुरक्षा #पर्यावरण_संवर्धन #EnergyStorage #SustainableDevelopment
3
129
जितना ज़्यादा कीचड़ उछालोगे, कमल उतना ही ज़्यादा खिलेगा!! #ModiNahiJayega #LongLiveTheIndianRepublic
4
92
‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्य नेत्रदीपक व भव्य उद्घाटन सोहळा.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित, ‘देवेंद्र सेवा महोत्सव’ अंतर्गत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा भव्य आविष्कार असलेल्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याचा उद्घाटन सोहळा ना.शिवेंद्रराजे भोसले, मा.मुधोजी राजे भोसले आणि मा.प्रतापसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, दुष्काळग्रस्त शेतकरी दांपत्याच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा गौरव करताना दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सन्मानाला आणि मदतीला प्राधान्य देण्यात आले. शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या जीवनात आधार निर्माण करण्याचा हा उपक्रम ‘देवेंद्र सेवा महोत्सवा’च्या सेवाभावी संकल्पनेचे प्रतीक आहे. इतिहासाचा अभिमान, समाजाप्रती संवेदनशीलता आणि सेवेतून लोककल्याण साधण्याची भावना यांचा संगम अनुभवण्यासाठी सहकुटुंब या भव्य महानाट्याला अवश्य भेट द्या! 📍 स्थळ: जाबिंदा मैदान, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर ⏰ वेळ: दररोज सायंकाळी ६ वाजता #DevendraSevaMahotsav #प्रौढप्रतापपुरंदर #छत्रपतीशिवाजीमहाराज #शेतकरीसन्मान #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra
1
2
5
198
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कुटुंबीयांसमवेत स्वागत केले. #शिवेंद्रसिंहराजे_भोसले #सदिच्छा_भेट #ChhatrapatiSambhajinagar
1
6
260
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर नाका, छत्रपती संभाजीनगर येथे प्रस्तावित उड्डाणपुलाच्या अनुषंगाने पाहणी केली.. शेंद्रा ते वाळूज औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी आणि कनेक्टिव्हिटी सुधारावी, या दृष्टीने प्रस्तावित उड्डाणपुलाच्या नियोजनाचा आढावा घेतला.. या प्रकल्पामुळे औद्योगिक वाहतूक अधिक सुरळीत होण्यास आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल.. शहराच्या व औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.. #वाहतूक #Infrastructure #Development #ChhatrapatiSambhajinagar
6
280