DigitalManse (@DigitalManse) header
DigitalManse (@DigitalManse) profile picture

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Mumbai, India
Joined April 2020
Photo by DigitalManse (@DigitalManse)Photo by DigitalManse (@DigitalManse)Photo by DigitalManse (@DigitalManse)Photo by DigitalManse (@DigitalManse)Photo by DigitalManse (@DigitalManse)Photo by DigitalManse (@DigitalManse)Photo by DigitalManse (@DigitalManse)Photo by DigitalManse (@DigitalManse)Photo by DigitalManse (@DigitalManse)Photo by DigitalManse (@DigitalManse)
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा झालेला अपमान हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला दिलेली ठेच आहे! ज्यांच्या नावाचा आधार घेऊन राजकारण केलं, त्यांच्याच प्रतीमेचा असा अनादर? कृतघ्नतेचीही काही मर्यादा असते! बाळासाहेब म्हणजे केवळ एक नाव नाही, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाची अस्मिता आणि लाखो लोकांची श्रद्धा आहे. बाळासाहेब हे एक पर्व होते आणि पर्व कधीच संपत नसतात! जुईली शेंडे सरचिटणीस, मनसे #ShameOnShainaNC #Shivsena @ShainaNC @DigitalManse @mnsadhikrut
1
1
42
DigitalManse retweeted
शायनिंग मारताना आपण कोणाचे फोटो फाडतोय याचे ही भान राहिले नाही शिंदे सेनेच्या फडतूस प्रवक्त्यांना ... तसेही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी दुरान्वये संबंध नसलेल्या या माठ प्रवक्त्यांकडून बुद्धिमत्तेची अपेक्षा करणे चुकीच ... पुस्तक फाडून कसले शौर्य दाखवत आहात ... विचारांचा प्रतिवाद विचारांनी करा ...
6
48
395
4,533
दुष्काळात मायक्रो-फायनान्स करणाऱ्या कंपन्या आणि खाजगी सावकारांवर राज्याच्या गृहमंत्रालयानं विशेष नजर ठेवली पाहिजे. भीषण परिस्थितीतही अव्वाच्या सव्वा व्याज आकारणं ही मंडळी चालूच ठेवतात. अक्षरश: लुटतात. ह्यातल्या पिळवणुकीविरूध्द आणि बेकायदेशीर व्याज आकारणी विरोधात महाराष्ट्र शासनानं सजग रहावं. अशा परिस्थितीत महाराष्ट्रानं पूर्वी - फार पूर्वी महात्मा फुल्यांच्या काळात - दंगे झालेले पाहिले आहेत. “दख्खनचे दंगे” (१८७५) ह्या नावाने ते प्रसिध्दही आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये ह्याची दक्षता घेतली पाहिजे. #दुष्काळ #महाराष्ट्र
1
13
72
1,600
DigitalManse retweeted
Jai Maharashtra, The Bharatiya Janata Party (BJP) and the toxic social media ecosystem it nurtures are currently making desperate attempts to incite conflict in Mumbai, Maharashtra, by exploiting the issue of 'Chhath Puja'. To this end, they are circulating reels on social media depicting the rituals and what they frame as a ‘cultural invasion’ stemming from them. As if that weren't enough, they even attempted to play Bhojpuri music at certain railway stations in Mumbai, which was promptly shut down by the Maharashtra Navnirman Sena (MNS) anyway. Yet, the BJP remains frustrated because the conflict they so desire has failed to materialize. All this frantic maneuvering is being orchestrated with an eye on the upcoming elections in Uttar Pradesh. It appears that the BJP’s ‘think tank’ has suffered a decline in its intellectual capacity. The ‘divide and rule’ tactic which they have relied upon for years to win elections is no longer effective. Whenever Lok Sabha elections approach, they stoke Hindu-Muslim tensions; they parade women wearing burqas through public grounds and parks, aiming to frighten the public by suggesting that 'the other' has now encroached upon their own spaces. The social media is rife with videos, often staged, featuring individuals, including men, dressed in burqas to manufacture fear. When state-level elections draw near, they sow the seeds of caste-based hatred. Last year, in a bid to win the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) elections, they manufactured ‘Gujarati versus Marathi’ conflict, centered around the issue of feeding pigeons (kabutarkhana). I have often stated in my speeches that the BJP cannot win elections based on their actual performance; instead, they engineer conflicts between groups and secure victories on the back of the blood spilled in those clashes. Of course, this is largely a superficial spectacle, as the real work is done by the Election Commission. But it provides them with a convenient narrative to explain how they achieved their 'victory'. Spurred by the 'Gen Z' movement, the journey toward the Bharatiya Janata Party’s (BJP) ouster from power, both at the Centre and in the states, has begun. It is bound to happen soon! This has left the BJP and its mentors completely rattled. They fear that once out of power, the ghosts of everything they have done over the last 12 to 14 years will come back to haunt them. Regardless, whatever is destined to happen to them, will happen! I urge the Marathi people: there is no need for us to fight on the battlefield of their choosing. That is not the ‘Maharashtra way.’ They may have forgotten Chhatrapati Shivaji Maharaj’s guerrilla warfare tactics, but we must remember it. We shall decide how and when to respond using these tactics. We must not fall into the traps they have laid for their own selfish ends. The BJP has ruined the nation, destroying the social harmony and tolerance that once existed. The same is happening in Maharashtra. Acting on directives from the Centre, they are effectively selling off Maharashtra piece by piece, to a single industrialist and his cronies, stripping the state bare from every direction. They have even begun to hollow out the Sahyadri mountain range. The very land where our Chhatrapati Shivaji Maharaj and his loyal warriors once lived. Forests are being handed over, lands are being signed away; whatever that industrialist sets his eyes upon in Maharashtra is being gifted to him. Yet we remain seemingly indifferent. I have often said that I have never encountered a society as unvigilant as the Marathi community. A people who wake up to an incident, only to fall back into a slumber and forget everything within a day or two. The Marathi people must not forget what is unfolding all around them. We must express our anger at the right moment; only then do we earn the right to invoke the name of Chhatrapati Shivaji Maharaj!
1,228
635
229
3,782
1,063,954
DigitalManse retweeted
Furthermore, should anyone attempt to incite a ‘cultural frenzy’ under the guise of religious worship, plunder Maharashtra and tarnish its cultural heritage, (though I doubt anyone would dare) do not take our restraint as a sign of cowardice! The North Indian and Gujarati communities must also realize that these people are merely pitting you against us to serve their own selfish interests. And if you choose to join them and confront us, be advised: this is Maharashtra! This is the land of the Marathas! To the BJP, I say: try to come up with something new, rather than constantly stoking conflicts based on religion, region, or caste! To my fellow Marathi brothers and sisters, and to my 'Maharashtra Sainiks': do not fall into their trap but remain vigilant! We shall make the right decision at the right time! Raj Thackeray
149
102
16
576
76,126
DigitalManse retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! राज ठाकरे ।
733
1,064
182
5,506
524,231
९ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात रमणबाग युवा मंचातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना राजसाहेबांनी त्यांचे परखड विचार मांडले.
17
107
5,404
DigitalManse retweeted
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं ! सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील. भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे ! राज ठाकरे ।
282
1,782
41
8,529
233,317
गोकुळ मुळे गाढव गेलं आणि ब्रम्हचर्य सुद्धा गेलं अशी सरकारची अवस्था होऊ देऊ नका ! योगेश खैरे प्रवक्ता - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
1
8
40
460
DigitalManse retweeted
धनत्रयोदशीनिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
3
24
183
2,687
DigitalManse retweeted
नम्र आवाहन.
96
556
23
3,462
193,049
DigitalManse retweeted
चला,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करूया ... मगच आपल्या दारी दिवा लावूया ... नवी मुंबई मनसे कडून, बीड मधील केज तालुक्यातील गावी शेतकरी बांधवांना महाराष्ट्रधर्माचा शिधा वाटप ...
1
10
48
872
“सत्तेवर असलेला पक्षच संविधान वाचवा, लोकशाही वाचवा असा मोर्चा काढतोय. भाजपने लोकशाही वाचवा असं सांगणं म्हणजे कॅंटकी फ्राइड चिकनच्या बाहेर उभ्या असलेल्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा असं सांगण्यासारखं आहे! तुम्ही सत्तेत आहात, मग असे मोर्चे कशासाठी काढत आहात?” — मा. राजसाहेब ठाकरे पु. ल. देशपांडे दिनदर्शिका २०२७ प्रकाशन समारंभ, मुंबई ३ नोव्हेंबर २०२६
8
18
2
69
2,945
DigitalManse retweeted
फटाके फोडणे टाळा, पर्यावरणासाठी जात, धर्म, पंथ, प्रांत, विचार सगळे सोडून एकत्र या. पर्यावरण आहे, तर आपण आहोत. शुभ दीपावली! 🪔 #diamirza #saveenvironment #mybmc
81
151
11
892
16,029
दिवाळी निमित्त Zee मराठीने बनवलेला हा व्हिडिओ बरंच काही सांगून जातो. आपली परंपरा, आपली शान… आपली संस्कृती, आपली ओळख आहे.आपली भाषा, आपले सण, आपले उत्सव, आपल्या रूढी-परंपरा आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी सर्वप्रथम आपलीच आहे. त्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून द्या आणि आपल्या मातीशी जोडून ठेवा. महाराष्ट्र ही आपली भूमी आहे. आपण या भूमीत बाहेरून आलेले नाही, तर या भूमीचेच भूमिपुत्र आहोत. म्हणूनच आपल्या संस्कृतीचा संकोच नको, तर अभिमान हवा ! परप्रांतीय बांधवांनाही आपल्या महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांची ओळख व जाण करून देणे हे आपले कर्तव्य आहे.कारण संस्कृती जपली तरच अस्मिता टिकेल आणि अस्मिता टिकली तरच आपली ओळख कायम राहील ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय !
28
418
11
1,665
43,800
DigitalManse retweeted
अमित चाटमचे थोबाड ऐन दिवाळीत कोर्टाने काळे केले … चाटमच्या बुडाखाली योग्य फटाके लागले … कायम हिंदू-मुस्लिम करणाऱ्या भाजपालाही ही एक जोरदार चपराक आहे …
29
74
6
653
7,075
हा महाराष्ट्र शिवरायांचं पण ऐकणार नाही का ? #Bhimashankar #RajThackeray #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #MaharashtraNavnirmanSena #MNS
2
24
105
1,516
DigitalManse retweeted
भाजप वाले फक्त आता हे बोलायचे राहिले आहेत की , कर्जत भीमाशंकर येथील झाडाना पाकिस्तानचे पाणी येत होते ,त्यामुळे झाडे देशद्रोही आहेत .. त्यात ते हिरवे दिसतात .. #गिधाडांपासूनमहाराष्ट्रवाचवा
15
63
1
434
5,245
DigitalManse retweeted
I shared a documentary by Sabir Bhatia on my social media detailing the long-standing friendship between Gautam Adani and Narendra Modi, and how the Indian industrial landscape is consequently being handed over to Adani. It garnered over 4.8 million views on Twitter alone and received an overwhelming response on Facebook as well, not to mention the additional, uncounted views from shares by others. My intention was for this serious issue to reach the public, and that objective has been achieved. While Sabir Bhatia produced this documentary recently, I had already delivered a major presentation back in January 2026 at Shivtirth in Mumbai, illustrating how the Adani Group is effectively setting out to swallow the entire nation. That presentation received an exceptional response, and those videos remain available on my social media to this day. In fact, some clips from our presentation were even incorporated into this documentary. Anyways. I have clarified my stance on this matter time and again: my opposition is not directed at any specific individual, but rather against the rise of a monopoly. I have often stated in my speeches that the Prime Minister should foster the growth of many industrialists across the country, creating vast employment opportunities and generating immense wealth for the nation, and empower them to conquer global markets. However, if the government chooses to favor only one person to the point where it poses a threat to the nation, we oppose it and will continue to do so. My opposition is, therefore, directed against any form of monopoly, whether it involves Adani or anyone else. Even now, the central government has directed the state government to hand over several hundred hectares of forest land in Bhimashankar to the Gujarat-based Torrent Group. This government has handed over vast tracts of forest and wilderness land in Maharashtra to a select group of industrialist friends, and it plans to hand over even more! I care little about which political party anyone belongs to; however, as citizens of Maharashtra, how can you remain so indifferent while our state is being sold off right before your very eyes? Does it not even spark a sense of outrage among our Marathi Members of Parliament, MLAs, and ministers to see this happening? Such total submission to power is entirely inconsistent with the history, traditions, and culture of Maharashtra. Why, then, do you bother raising slogans in the name of Chhatrapati Shivaji Maharaj or putting on a farce by singing the state anthem? Anyway.. Sabeer Bhatia’s documentary received such an overwhelming response that it was only natural for those in power to grow anxious, fearing that their secrets might be exposed. The intensity of this fear must have been significant, as I received a request, conveyed through the Mumbai Police Commissioner, to take it down. My primary objective, both during the meeting in January 2026 and through the subsequent posting of this documentary, was and remains, to enlighten the nation. However, the request I received came from the Mumbai Police Commissioner. The Mumbai and Maharashtra Police forces are among the most efficient in the country, and I have always held them in high regard. Out of respect for the head of the Mumbai Police, I am choosing to honor this request. Therefore, I am deleting the post containing the documentary. The fire has already been ignited. In January 2026, from Shivteerth, I ignited a spark against the authoritarianism in this country, that has now grown into a raging wildfire. Our struggle continues. Our post from January 2026 remains exactly where it was, and it will stay there. The documentary we shared was produced by others; our sole objective was to ensure it reached the public, a goal that has been achieved. On this occasion, I am bringing our well-researched analysis of this subject back into the spotlight. I am re-sharing a portion of our January 2026 presentation here; please take another look.
774
1,812
239
8,435
820,294
DigitalManse retweeted
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही. थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो. या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी. पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे. आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो.. पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी. मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
534
2,137
151
9,669
423,727