
Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar, MH
Joined July 2016
- Tweets10.2K
- Following25
- Followers16.1K
- Likes165
#छत्रपतीसंभाजीनगर #महाराष्ट्रलोकसेवाहक्कअधिनियम २०१५ हा सामान्य माणसाला कायद्याने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराचे संरक्षण करुन वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देणे, हे प्रशासनात कार्यरत प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे-डॉ. किरण जाधव
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्मवर्ष महात्मा जोतीराव फुले यांचे समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरुष समानतेचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवूया! #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
@MahaDGIPR
महात्मा जोतीराव फुले यांचा सामाजिक विचार केवळ भाषणापुरता किंवा लेखनापुरता मर्यादित नव्हता; त्याला सातत्याने कृतीची जोड होती. समाजातील विषमता, विशेषतः वर्णवर्चस्व आणि स्त्रीदमन, यांना उत्तर देण्यासाठी त्यांनी अनेक पावले उचलली. #MahatmaPhule200 #महात्माफुले200
महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी २३० कोटी रुपयांच्या विकास प्रस्तावाला मंजुरी. #MahatmaPhule #Phulewada #SavitribaiPhule #BhideWada #BahujanWelfare #OBCWelfare #RevenueDepartment #MaharashtraGovernment
सुक्या चाऱ्यासाठी कमाल १२ रुपये प्रति किलो आणि मुरघासासाठी कमाल ८ रुपये प्रति किलो असा आधारभूत दर निश्चित.
#DroughtRelief
#शेतकरीहित
#महाराष्ट्रशासन
Maharashtra DGIPR
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागाचे विविध उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
#राष्ट्रीयएकतादिन आणि #भारतपर्व२०२६ निमित्त गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे महाराष्ट्र #पर्यटन विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या विशेष दालनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक पैठणी साड्यांची पाहणी करून पैठणी विणकामातील कलाकुसर, पारंपरिक तंत्र आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची माहिती जाणून घेतली.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या या दालनातून राज्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, लोककला, हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविण्यात येत आहे.
१ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या उपक्रमात पैठणी विणकामाचे प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल, हस्तकला वस्तू आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही प्रमुख आकर्षणे आहेत.
पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव यांनी सांगितले की, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख आणि विविधतेतील एकतेची भावना दृढ होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दालनाला भेट देऊन पैठणी विणकामासह राज्याच्या कला-संस्कृतीची माहिती घेतल्याने महाराष्ट्राच्या पर्यटनवैभवाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळेल.
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे पर्यटनवैविध्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. केवडिया येथील उपक्रमामुळे राज्याचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला आणि खाद्यसंस्कृती यांना व्यापक व्यासपीठ मिळाले असून, यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.
@narendramodi
@shambhurajdesai
#सरदारपटेल
#राष्ट्रीयएकतादिवस२०२६
#SardarPatel
#RashtriyaEktaDiwas2026
#NationalUnity
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
‘प्रौढ प्रताप पुरंदर’ ऐतिहासिक महानाट्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती xitter.gq/i/broadcasts/2NglEAMOb…
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍छत्रपती संभाजीनगर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) व युवा वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर नूतन सिंथेटिक ट्रॅकवर मुली व मुलांच्या १०० मीटर प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी क्लॅप देऊन दोन्ही स्पर्धांना प्रारंभ केला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांत सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला.
#छत्रपतीसंभाजीनगर मध्ये सुंदर सिंथेटिक ट्रॅक व फ्लड लाईट्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात भारतासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त यावेळी केला. या क्रीडासुविधांच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल समिती व #क्रीडा विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्रीडाप्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@SanjayShirsat77
@save_atul
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍छत्रपती संभाजीनगर
शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आरामदायी व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने #छत्रपतीसंभाजीनगर महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करण्यात आलेल्या ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-व्ही चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प व मिटमिटा शाळेच्या इमारतीचे लोकार्पणही करण्यात आले.
या कार्यक्रमात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५९ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. महापौर समीर राजूरकर व महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@SanjayShirsat77
@save_atul
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 छत्रपती संभाजीनगर
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत आज ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना बळीराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जबिंदा मैदान, बीड बायपास येथे ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शेतकऱ्यांना नवी प्रेरणा आणि बळ मिळणार आहे. छत्रपतींच्या विचारांवर शासन काम करीत असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून संघर्ष, स्वाभिमान, लोककल्याण आणि शेतकरीहिताचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही मुख्यमंत्री यांनी केले. छत्रपतींच्या विचारांचा वारसा स्मरणात ठेवण्यासाठी त्यांनी हजारोंच्या समुदायाला साद घातली. तत्कालीन परिस्थितीचे स्मरण करून शिवरायांचा पराक्रम, त्यांचा संघर्ष आणि स्वराज्यनिर्मितीमागील प्रेरणा जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. छत्रपतींच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी शासनाची भूमिका असून, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, ह.भ.प. भास्करगिरी महाराज, महंत रामगिरी महाराज, श्री महंत शिवाजी महाराज आणि ह.भ.प. महंत विष्णू महाराज शास्त्री, महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती महेंद्र वसंतराव राजेमहाडिक, देवेंद्र सेवा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात देवेंद्र समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक हजार पाण्याच्या टाक्या व महिला सक्षमीकरिता ५०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
@Dev_Fadnavis
@SanjayShirsat77
@save_atul






























