
वाचनाच्या नवीन पिढ्या रुजवण्यासाठी शब्दांचे वृक्षारोपण करणारे व्यासपीठ…📖 #पुस्तकआणिबरचकाही : https://xitter.gq/t.co/RHviCCghvr
साहित्यविश्व
Joined May 2022
- Tweets6.5K
- Following78
- Followers4.7K
- Likes15.1K
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
पुस्तकाचे नाव - त्सुबाकी स्टेशनर्स
मूळ लेखिका - इतो ओगावा
भाषांतर - मयुरेश कुलकर्णी
मूळ प्रकाशक - Gentosha Publishing
प्रकाशक (मराठी भाषांतर) - कलासक्त, पुणे
आवृत्ती - प्रथमावृत्ती, ऑगस्ट २०२५
पृष्ठसंख्या - ३४२
मूल्य - ५५० रुपये
#marathi #marathipustak #भाषांतर
🧵 ⬇️
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीविश्वात 'हत्या' ही कादंबरी विशेषत्त्वाने उठून दिसते; ती तिच्यातील वेगळेपणाने. वास्तवाच्या पातळीवरील, तर्कसंगत आणि हृद्य अशी ही कथा पेंडसे यांनी आपल्या कादंबरीसाठी निवडली आणि पेंडसे यांची कादंबरी खऱ्या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली; परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन 'नायक' न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाङ्मयाभिरुचीच्या चौकटीत न बसणारी गोष्ट होती. आपल्या वेदनेची आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांची खालच्या सुरात दुःखार्त अशी मांडणी करणारी आणि काळजाला हात घालणारी ही कादंबरी आहे. पेंडसेविश्वातील पुढील कादंबऱ्यांच्या विकासाची बीजे या कादंबरीत सुप्तपणे विखुरलेली दिसतात. 'हत्या'च्या निमित्ताने पेंडसे यांनी मराठी कादंबरीतील 'हिरो'ची प्रतिमा पार बदलवून टाकण्याचे जे धाडस केले, त्यासाठी तरी या कादंबरीचे मोल आपण मान्य करायला हवे. (✍🏻 डॉ. रवींद्र शोभणे)
'हत्या' कादंबरीचा 'कलंदर' हा पुढील भाग; - पण किती तरी वेगळा. 'हत्या'तील आत्मकथनाची शैलीच केवळ इथे बदलली आहे, असे नाही, तर पेंडसे यांच्या कलेने आपल्या विकासाचा पुढील टप्पा गाठला आहे. निसर्ग येथे कथेच्या भावगुणाशी एकजीव आणि म्हणून अधिक समृद्ध झाला आहे; व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य तसेच रसरशीत आहे. पण ते अधिक विविध रूपे धारण करते आहे; कथानकाची गुंफण अधिक सूक्ष्म आणि म्हणून अधिक वेधक झाली आहे. 'एल्गार', 'हद्दपार', 'गारंबीचा बापू', 'हत्या' या आपल्या पूर्वीच्या कादंबऱ्यांत पेंडसे यांनी रंगविलेले जीवनाचे चित्र अधिकाधिक सूक्ष्म व संमिश्र होत गेले आहे. 'कलंदर'मध्ये तर पाश्चात्त्य संगीतातील अनेक वाद्यांच्या स्वरमेळाची आठवण व्हावी, इतके ते संमिश्र, चढते आणि अनेक बिंदूंभोवती रुंजी घालूनही एका केंद्राकडे झेप घेणारे व अनेक पातळ्यांवर विकास पावूनदेखील एकात्म व सुसंवादी आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
आटपाट देशातल्या गोष्टी
लेखक - संग्राम गायकवाड
आयकर आयुक्तांसारख्या अधिकाऱ्याच्या अनुभवातून जन्मलेली ही कादंबरी केवळ एका आयकर धाडीच्या निमित्ताने उघडकीस येणाऱ्या समाजाच्या विविध स्तरांचे, मानवी स्वभावाचे आणि नैतिकतेच्या गुंतागुंतीचे सखोल चित्रण आहे👇
@LetsReadIndia @PABKTweets
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
दिवाळी ऑफर " तुकाराम " पुस्तक
बंपर डिस्काउंटवर अधिक सविस्तर
माहितीसाठी संपर्क मो नं / व्हाॅट्सअप नं :
📞९५०३६५२५९६ / ९३७३५३७०७५
🪔🎆🏮🎇✨🪔
#tukarammunde #tukaramsir #marathibooks #marathipustak #iasofficer #HappyDiwali – at Pune, India
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
महामानवाचे जीवन, विचार, इतिहास समजून घेण्याच्या नव्या प्रवासाला प्रारंभ..
प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण चरित्र.
खंड १ – 'भिवा' (१८९१ ते १९२३)
बाबासाहेबांच्या जीवनावर अनेक लेखक, विचारवंत आणि अभ्यासकांनी लेखन केले आहे मात्र, एखाद्या महापुरुषाचे +
#DrBabasahebAmbedkar📍
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
📚 पुस्तकायन | सृजनवेध
‘सृजनवेध’च्या पहिल्या भागात ज्येष्ठ साहित्यिक श्री. देविदास फुलारी यांच्याशी विशेष संवाद! ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, लेखन आणि लेखकाच्या अनुभवविश्वाचा वेध..
🎥 नक्की पाहा!
youtu.be/ZwhevRBn8vs?si=3xwb…
#लेखकसंवाद #मराठी
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
आठवड्याचा वाचक....
आता तुमच्या वाचनप्रवासाला मिळणार खास व्यासपीठ.
आठवड्याचा वाचक या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुमचा वाचनप्रवास आमच्यासोबत शेअर करा.
सहभागी कसे व्हाल?
📸तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा फोटो शेअर करा.
📚 सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव सांगा.
💬 त्या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, हे काही शब्दांत लिहा.
निवडलेल्या वाचकांना मिळेल @LetsReadIndia कडून #पुस्तकभेट
चला, आपल्या वाचनाची गोष्ट जगासोबत शेअर करूया आणि इतरांनाही वाचण्यासाठी प्रेरित करूया!
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
On October 31st in New Delhi, the unthinkable occurred: the prime minister's own prized bodyguards turned their weapons on the very leader they were sworn to protect. In an unprecedented betrayal, Beant Singh and Satwant Singh-aided by their government-issued firearms, assassinated Prime Minister #IndiraGandhi in a brutal attack that left her body riddled with bullets.
Opening fire - at point blank range - Beant Singh fired five rounds from his .38 revolver, while Satwant Singh unleashed 25 rounds from his 9mm Sten submachine gun. Both assassins emptied their magazines, leaving a beloved prime minister, a personification of "Mother India", fatally injured by 30 bullets.
This shocking assassination sent ripples through the global community and exposed vulnerabilities within India's security establishment. How could such an attack occur within the nation's most secure location? And how did the assassins slip past the intense surveillance measures put in place as part of India's military assault on Darbar Sahib, measures specifically designed to prevent such an incident?
Baljit Singh, the NSYF's research lead, has painstakingly examined every available source to produce a comprehensive account that focuses on the lives and motivations of the assassins.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
दिवाळी ऑफर " तुकाराम " पुस्तक
बंपर डिस्काउंटवर अधिक सविस्तर
माहितीसाठी संपर्क :📞९५०३६५२५९६ / ९३७३५३७०७५
🪔🎆🏮🎇✨🪔
#tukarammunde #tukaramsir #marathibooks #marathipustak #iasofficer #HappyDiwali – at Pune, India
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांना मोठा वाचक वर्ग होता आणि आहे. कथेच्या वेगवेगळ्या रूपांना एकत्र करून त्यांनी समृद्ध, आशयसंपन्न कथा वाचकांना दिल्या. त्यांच्या कथेत मानवी मूल्य हमखास दिसते. सर्वसामान्य, अतिसामान्य आयुष्य त्यांनी कथांमधून उलगडली. त्यांच्या डोहकळीमा या कथासंग्रहातील प्रत्येक कथा याला अनुरूप आहेत.
त्यांच्या पहिल्या चार कथासंग्रहातील निवडक कथांचा यात समावेश केला आहे. 'बळी' या कथेत जोगतिणीच्या बेवारशी ठरलेल्या मुलीची, अमाशीची हृदयद्रावक कहाणी आहे. यात खेड्यातील जीवन, परंपरा, मानवाचे रानटी रूप दाखवून दिले आहे. 'माकडाचे काय; माणसाचे काय?' या कथेमधून माणसाच्या शेवटच्या दिवसांतील भावना व्यक्त झाल्या आहेत. तसेच 'रात्र झाली गोकुळी' मध्ये एका गरीब कुटुंबाचे चित्रण आहे. कनिष्ठ समाजाच्या परिस्थितीचे विदारक दर्शन यात घडते.
संग्रहातील अन्य कथाही भ्रामक कल्पनेपलीकडील जग आपल्यासमोर मांडतात. जी.ए. नी केलेल्या रुपकांच्या वापरामुळे कथानकाची वास्तवता दाहक मांडण्यास मदत होते. त्यामुळेच हा कथासंग्रह जी.ए. भक्तांसाठी एक खास भेट आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
Replying to @LetsReadIndia
स्वतःसाठी केलेलं अस काही तरी...
आमचा पुस्तकवाला बुकमार्क देत नाही त्यामुळे मीच रिकाम्या वेळेत हे काम करत असतो.
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
पुस्तक तेरावे
मायकेल लुईस लिखित 'द बिग शॉर्ट' (The Big Short: Inside the Doomsday Machine) हे पुस्तक २००७-२००८ मधील जागतिक आर्थिक मंदीवर आणि युनायटेड स्टेट्समधील हाऊसिंग मार्केटच्या पडझडीवर आधारित एक अत्यंत लोकप्रिय पुस्तक आहे.
२००० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेत बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी अशा लोकांना घर खरेदीसाठी सुलभ कर्जे (Subprime Mortgages) दिली, ज्यांची कर्जे फेडण्याची आर्थिक क्षमता किंवा क्रेडीट स्कोअर चांगला नव्हता.
बँकांनी ही सर्व धोकादायक कर्जे एकत्र करून त्याचे मॉर्टगेज-बॅक्ड सिक्युरिटी आणि सीडीओ (CDOs - Collateralized Debt Obligations) यांसारख्या गुंतागुंतीच्या वित्तीय उत्पादनांमध्ये रूपांतरित केली. मानांकन देणाऱ्या संस्थांनी (Rating Agencies) या धोकादायक सिक्युरिटीजला चुकीच्या पद्धतीने 'AAA' (सर्वात सुरक्षित) असे सर्वोच्च मानांकन दिले. यामुळे संपूर्ण वॉल स्ट्रीटवर आणि गुंतवणूकदारांमध्ये एक खोटा सुरक्षिततेच खोटे वातावरण निर्माण झाला.
या पुस्तकाची मुख्य कथा अशा काही मोजक्या आणि दूरगामी विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांभोवती फिरते, ज्यांनी वॉल स्ट्रीटमधील इतर लोकांच्या आधीच हे ओळखले होते की हाऊसिंग मार्केटचा हा फुगा (Housing Bubble) एक दिवस फुटणार आहे. मायकल बुरि(Michael Burry), स्टीव्ह इसमन (Steve Eisman) आणि इतर काही छोट्या निधी व्यवस्थापकांनी ( जसे की कॉर्नवॉल कॅपिटल) या व्यवस्थेविरुद्ध जाणीवपूर्वक 'शॉर्ट' (Short) पोझिशन घेतली, म्हणजेच त्यांनी अमेरिकेच्या गृहकर्ज बाजारपेठेच्या विरोधात पैज लावली.
सुरुवातीला या गुंतवणूकदारांना वेडे ठरवले गेले आणि त्यांच्यावर टीका झाली. परंतु, २००७ च्या उत्तरार्धात जेव्हा अमेरिकेतील रिअल इस्टेट मार्केट कोसळले आणि सबप्राइम मॉर्टगेजचे बुडणे सुरू झाले, तेव्हा संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आली. या मंदीच्या काळात ज्यांनी बाजाराच्या विरोधात पैज लावली होती (विशेषतः हे गुंतवणूकदार), त्यांनी प्रचंड संपत्ती कमावली.
हे पुस्तक आर्थिक प्रणालीमधील त्रुटी, लोभ, चुकीचे प्रोत्साहन आणि मानवी चुका कशा प्रकारे एका मोठ्या आर्थिक संकटाला आमंत्रण देतात, हे अत्यंत मनोरंजक आणि रंजक शैलीत स्पष्ट करते.
#मराठी_ट्विट
पुस्तक बारावे
A Random Walk Down Wall Street" ज्याचे लेखक बर्तन जी. मिकीएल आहेत. हे गुंतवणूक आणि वित्त (Finance) क्षेत्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि क्लासिक पुस्तक आहे.
या पुस्तकाचा मुख्य उद्देश वैयक्तिक गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गुंतागुंत समजून सांगणे आणि दीर्घकाळात यशस्वी गुंतवणूक कशी करावी, याचे मार्गदर्शन करणे हा आहे.
'रँडम वाक' (Random Walk) संकल्पना
पुस्तकात असे स्पष्ट केले आहे की, शेअर बाजारातील किमतींचे अल्पकालीन अंदाज लावणे कठीण किंवा अशक्य असते.
भूतकाळातील किमतींवर आधारित अंदाज वर्तवणे (Technical Analysis) नेहमीच यशस्वी ठरत नाही, कारण बाजारातील किमती यादृच्छिकपणे (Randomly) बदलतात.
लेखकाने बाजारातील विश्लेषणाचे दोन मुख्य मार्ग सांगित,ले आहेत:
टेक्निकल ॲनालिसिस (Technical Analysis): यामध्ये चार्ट्स आणि मागील ट्रेड्सचा अभ्यास करून भविष्यातील किमती अंदाजल्या जातात. लेखक या पद्धतीबद्दल थोडे साशंक आहेत.
फंडामेंटल ॲनालिसिस (Fundamental Analysis): यामध्ये कंपनीच्या ताळेबंद (Balance Sheet), नफा आणि भविष्यातील वाढीच्या क्षमतेचा अभ्यास करून कंपनीचे मूळ मूल्य (Intrinsic Value) शोधले जाते. मात्र, बाजारात अनेकदा कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा जास्त किंवा कमी असते.
पुस्तकात सुचवले आहे की, सामान्य गुंतवणूकदारांसाठी वैयक्तिक शेअर्स निवडण्यापेक्षा इंडेक्स फंड्स (Index Funds) किंवा ईटीएफ (ETFs) मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरते.
व्यावसायिक फंड मॅनेजर सुद्धा दीर्घकाळात बाजाराच्या सरासरीपेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाहीत, त्यामुळे कमी खर्चात संपूर्ण बाजाराची वाढ टिपणारे इंडेक्स फंड उत्तम पर्याय आहेत.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गुंतवणूक कशी करावी, याचे मार्गदर्शन पुस्तकात केले आहे.
तरुण वयात उच्च परताव्यासाठी इक्विटीमध्ये (शेअर्स) जास्त गुंतवणूक करावी आणि जसजसे वय वाढेल, तसतसे जोखीम कमी करण्यासाठी सुरक्षित पर्यायांकडे (उदा. बाँड्स किंवा फिक्स डिपॉझिट) वळावे.
हे पुस्तक आपल्याला सांगते की, शेअर बाजारात पटकन श्रीमंत होण्याची कोणतीही जादूई शॉर्टकट पद्धत नाही. शिस्तबद्ध पद्धतीने, कमी खर्चात, दीर्घकाळ केलेली इंडेक्स फंड्समधील गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापन हीच यशस्वी गुंतवणुकीची खरी गुरुकिल्ली आहे.
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
बलात्कारातून मिळालेले कुमारीमातृत्व असो वा फसवून, आमीष दाखवून किंवा संमतीनं संभोग केल्यानंतर मिळालेले कुमारीमातृत्व असो, यानंतर सर्वसामान्य आयुष्य जगणं स्त्रीला अवघड होतं; पुरुषाला नाही.
कारण चारित्र्य ही फक्त स्त्रीनंच टिकवायची गोष्ट असते; ते नीतिनियम पुरुषांना लागू होत नाहीत.
केवळ कौमार्यच नव्हे, तर निरागसता, प्रेम, सहजीवन, कौटुंबिक सुख, नातेसंबंधांवरील विश्वास अशा सगळ्याच गोष्टी या मुली कायमच्या गमावून बसतात. आपुलकी, सहृदयता, माणूसकी यातली कोणतीही वाट त्यांच्या वाट्याला कधीच येत नाही.
अन्याय-अत्याचाराचं एक दुष्टचक्र यातून सुरू होतं, त्याखाली चिरडत-भरडत राहणं हेच या मुलींचं भागधेय बनतं.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
या वर्षीच्या मराठी कॅलेंडरमध्ये एक नवा कोरा प्रयोग केला आहे कार्टूनिस्ट @caricatured आलोक यांनी.
आपल्या सर्वांचे लाडके भाई, म्हणजेच पु. ल. देशपांडे, यांचे गाजलेले विनोद यंदा कार्टून्सच्या रूपात अनुभवायला मिळणार आहेत.
दरवर्षीपेक्षा यंदा काहीतरी वेगळं, भन्नाट आणि खास हवंय ना? मग या वर्षीचं हे अनोखं कॅलेंडर नक्की मागवा आणि वाचा.
ऑनलाइन प्री-बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ऑर्डर करण्यासाठीची लिंक:👇
pages.razorpay.com/pl_Tq2gQN…
#LetsReadIndia📚📚📚
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
बुटक्या एका जमीनमालकाकडे कामाला असलेला अस्पृश्य मुलगा. दिवसभर बकऱ्या चारणारा, शेतात काम करणारा लहान मुलगा... खडतर आयुष्याचे चटके खाताना मित्रांच्या सोबतीत आणि निसर्गात विरंगुळा शोधणारा. चिमूटभर आनंदसुद्धा धरून ठेवण्यासाठी धडपडणारा... पण, अपार कष्ट आणि पोटाची आग यांत त्याचं चैतन्यमय निरागस बालपण हरवून गेलेला...
या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं भीषण वास्तव वाचकाला अस्वस्थ करतं, खिळवून ठेवतं आणि अंतर्मुख करतं.
'कुलामाथारी' या पेरुमाल मुरुगन लिखित अत्यंत वाचनीय तमिळ भाषेतील कादंबरीचा तितकाच प्रवाही, परिणामकारक अनुवाद.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
जग बदलणारा बापमाणूस | लेखक Jagdish Ohol जगदीश ओहोळ |
पुस्तकाचे सविस्तर माहितीसाठी
मो नं / व्हाटसॲप नं : ९५०३६५२५९६
#baapmanus #jagdishoholspeech #drbabasahebambedkar #baapmanus #babasaheb – at Pune, India
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
“असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे.”
— संत तुकाराम महाराज
#LetsReadIndia📚📚📚
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
बाजारात नवनवीन डिझाइन्सचे बुकमार्क्स येत असतात, पण आपण स्वतः तयार केलेले बुकमार्क वापरण्याची,कोणाला गिफ्ट करण्याची मज्जा वेगळीच नाही का ?
तुम्ही बनवलेल्या बुकमार्क्सचे फोटो आम्हाला नक्की पाठवा, तुमचे कलाकौशल्य आम्हालाही पाहायला आवडेल.
#LetsReadIndia #HomemadeBookmarks
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 नरहर कुरुंदकर
"विचारस्वातंत्र्य हे महत्त्वाचे स्वातंत्र्य आहे हे तर मी मानतोच; पण ती सर्व स्वातंत्र्याची परिपूर्णता आहे असेही मी मानतो. पण हे विचारस्वातंत्र्य विचार करणाऱ्याला गुलाम करणाऱ्या बाबी संपवून निर्माण करावे लागते...
...व्यक्तीला सुरक्षितता देऊन व दिल्यामुळे, व्यक्तीचे हक्क मान्य करून व केल्यामुळे, व्यक्तीच्या हक्कावर आक्रमण होणार नाही अशी काळजी घेऊन व ती घेतल्यामुळे, स्वातंत्र्य निर्माण होत असते."
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
`संभ्रम' हे बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगांचे चित्रण करणारे बोलके पुस्तक आहे.
यात रजनीश, रमामाता, न्यायरत्न विनोद, सदानंद महाराज यांच्या प्रभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे. मीरा दातारचा दर्गा, समर्थांच्या पादुकांचा आगमन सोहळा, शिर्डीच्या साईबाबांचा रामनवमी उत्सव, काळुबाईची जत्रा, वारकरी संमेलन यांसारख्या अंधश्रद्धांच्या केंद्रावरील वातावरण डॉक्युमेंट्री पद्धतीने घडवले आहे. जैन समाजात अल्पवयीन मुलींनाही संन्यासदीक्षा दिली जाते. यल्लम्मास अल्पवयीन मुली सर्रास सोडल्या जातात. या अंधश्रद्धांच्या बळींचाही येथे वेध घेतला आहे. या अंधश्रद्धांचा वैचारिक परामर्ष घेणारी प्रस्तावना सुप्रसिद्ध विचारवंत मे. पुं. रेगे यांनी लिहिली आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐



























