पुस्तकायन 📚 (@pustakaayan) header
पुस्तकायन 📚 (@pustakaayan) profile picture

📖। वाचन 🍁। कविता ✒️। लेखन 📚। गाथा पुस्तकांची..!!!

Joined February 2023
Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)
पुस्तकायन.. गाथा पुस्तकांची.. प्रत्येक पुस्तकातल्या कथे मागे अनेक कथा असतात.. अनेक हेतू असतात. असेच पुस्तकांचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी पुस्तकायन कडून हा प्रयत्न..!! ___________________________________ #पुस्तकायन #म #मराठी
2
1
1
47
12,068
📚 पुस्तकायन | सृजनवेध ‘सृजनवेध’च्या पहिल्या भागात ज्येष्ठ साहित्यिक श्री. देविदास फुलारी यांच्याशी विशेष संवाद! ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, लेखन आणि लेखकाच्या अनुभवविश्वाचा वेध.. 🎥 नक्की पाहा! youtu.be/ZwhevRBn8vs?si=3xwb… #लेखकसंवाद #मराठी
4
3
208
पुस्तकायन 📚 retweeted
आठवड्याचा वाचक.... आता तुमच्या वाचनप्रवासाला मिळणार खास व्यासपीठ. आठवड्याचा वाचक या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुमचा वाचनप्रवास आमच्यासोबत शेअर करा. सहभागी कसे व्हाल? 📸तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा फोटो शेअर करा. 📚 सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. 💬 त्या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, हे काही शब्दांत लिहा. निवडलेल्या वाचकांना मिळेल @LetsReadIndia कडून #पुस्तकभेट चला, आपल्या वाचनाची गोष्ट जगासोबत शेअर करूया आणि इतरांनाही वाचण्यासाठी प्रेरित करूया!
7
19
5
52
2,272
पुस्तकायन 📚 retweeted
वाचक हो, सहभागा व्हा.
आठवड्याचा वाचक.... आता तुमच्या वाचनप्रवासाला मिळणार खास व्यासपीठ. आठवड्याचा वाचक या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुमचा वाचनप्रवास आमच्यासोबत शेअर करा. सहभागी कसे व्हाल? 📸तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा फोटो शेअर करा. 📚 सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. 💬 त्या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, हे काही शब्दांत लिहा. निवडलेल्या वाचकांना मिळेल @LetsReadIndia कडून #पुस्तकभेट चला, आपल्या वाचनाची गोष्ट जगासोबत शेअर करूया आणि इतरांनाही वाचण्यासाठी प्रेरित करूया!
4
11
258
पुस्तकायन 📚 retweeted
ही चित्रं जेव्हा मी काढली तेव्हा तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं, "याचं पुस्तक कधी?"... पुस्तक करायचं तर बरीच कार्टून्स लागतील... आणि दर्जाशी तडजोड करून ते मला करायचं नव्हतं. पण तुमचा तो प्रश्न मनात राहिला. म्हणून त्या चित्रांवर आणखी काम केलं... आणि... #thread
Today is the 100th birth anniversary of Maharashtra's beloved humorist, Pu La Deshpande! Here's a small tribute to the legend... A series of 18 cartoons based on his popular literature. The words are all his, I've merely attempted to visualize :)
4
16
3
152
5,885
शब्द हेचि शस्र..!! विजयादशमीच्या शुभेच्छा...🌼
15
356
पुस्तकायन 📚 retweeted
अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाच्या विजयाची गाथा सांगणारी ही पुस्तके..!! 🍀🌼🍀 #पुस्तकायन #दसरा #विजयादशमी #mustread #Dasara2025 #महाराष्ट्र #मराठीपुस्तके #म #पुस्तके #मराठीपुस्तक #वाचन #वाचनवेड #वाचालतरवाचाल #मराठीसाहित्य #मराठीभाषा #लेख #कादंबरी
1
8
18
972
पुस्तकायन 📚 retweeted
मराठी मातीतला अस्सल रुपवान हिरा अभिनेत्री 'स्मिता पाटील' यांचा आज जन्मदिवस.
5
21
267
2,652
पुस्तकायन 📚 retweeted
वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा..!! “भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!” वाचत राहू, शिकत राहू..!! #पुस्तकायन #मराठी #महाराष्ट्र #मराठीपुस्तके #म #पुस्तके #मराठीपुस्तक #वाचन #मराठीसाहित्य #वाचनप्रेरणादिन
7
1
21
1,197
शब्दांना सूर आणि भावनांना काव्यरूप देणाऱ्या, आपल्या लेखणीतून मराठी मनावर अढळ ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 शांताबाई गेल्या, पण त्यांच्या शब्दांतून त्या आजही आपल्या मनात गुणगुणत राहतात! #शांताशेळके #मराठीसाहित्य #पुस्तकायन
अनवट शांताबाई..!! शांता शेळके यांच्या कविता, त्यांचं अभिवाचन आणि सुमधुर वायोलीन वादनाने समृद्ध झालेली मैफल. #गौरीदेशपांडे #शांताशेळके #वंदनाबोकीळ #मराठी #कविता
4
260
अलविदा नाना..!!
6
504
पुस्तकायन 📚 retweeted
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण. मुंबई आली की इथली रंगभूमी, इथलं व्यावसायिक सिनेमाचं जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपासून कुठेतरी रोज या शहरात स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, पुढे याच शहरातला आणि हळूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेलं अंडरर्वल्डचं विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल, पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणं आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारं राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. हमीदाबाईची कोठीपासून ते परिंदा ते क्रांतिवीर ते अब तक छप्पन ते अगदी नटसम्राटपर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले . सामान्य माणसाच्या मनात सातत्याने राग, अपमान, शक्तिहीनता, नैराश्य, अनैतिक गोष्टींबद्दलची घृणा, व्यवस्थेबद्दलची निराशा, वर्ग संघर्ष हे सगळं आत धुमसत असतं. ते अगदी कधीतरी किरकोळ भांडणं किंवा घरातील आदळआपट यातून बाहेर पडतं, अन्यथा ते आत धुमसत राहतं. हे धुमसत राहणं, प्रेशर कुकर सारखं आत रटरटत राहणं हेच त्याच्या वाट्याला येतं. नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या आयुष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. आणि मग कधीकधी नाना असतील किंवा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असतील यांनी पडद्यावर केलेले दोन हात ही माणसाच्या मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात. मी जसं नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब, इत्यादी गायकांनी ,संगीतकारांनी, चित्रपट तसेच नाटक निर्माते,दिग्दर्शक, कलाकारांनी भारतीयांचं किमान ६०/७० वर्ष मन रिझवलं तसंच नाना असतील किंवा बच्चन साहेब असतील यांनी आतली वाफ पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक नाही तर या देशांत दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती. नानांच्या अभिनयाकडे बघताना मला नेहमीच हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण येते. रूप असेल व्यक्तिमत्व असेल दोघेही तत्कालीन बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या कलाकाराच्या पठडीत बसणारे अभिनेते नाहीत. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकदा असं वाटतं की या माणसाने काळाच्या ओघात शहाणपण, पेशन्स, आणि आहे हे हे असं आहे हे स्वीकारलेपण आत्मसात केलं आहे. तर नानांच्या अभियाकडे पाहून मला राग, चंचलता, आणि खूप खोल साठलेलं नैराश्य जाणवायचं. या माणसाने खूप बघितलंय असं वाटणारा मॉर्गन फ्रीमन आणि या माणसाने खूप भोगलंय आता बस असं वाटणारे नाना. माणसाची दोन टोकाची रूपं असतात. यातलं दुसरं टोक नाना मनस्वीपणे पडद्यावर आणू शकायचे म्हणून ते मोठे कलाकार होते. २००० च्या दशकांत गोरे गोमटे आखीव रेखीव गुळगुळीत दिसणाऱ्या नटांच्या ऐवजी कथा ही सिनेमाच्या पटावर आली आणि ती कथा सांगणारे नट आणि प्रेक्षकाला ओढून आणणारे नट यांच्या चलतीचा काळ सुरु झाला. आणि या युगाचे पहिले नायक १००% नाना होते. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला वाट नानांनी करून दिली. पण इतकं सगळं असून देखील त्यांचा स्वभाव मनस्वी होता, मनात येईल ते बोलायचे, फटकळ होता (खरंतर मी कोणाला फटकळ म्हणणं चुकीचंच आहे. असो) यामुळे नानांना चित्रपटात घ्यायची इच्छा असली तरी निर्माते दिग्दर्शक टाळायचे, याने नानांचं नुकसान झालं का ? माहित नाही, ते बेफिकीर होते. पण १००% हिंदी चित्रपटसृष्टीचं आणि प्रेक्षकांच नुकसान झालं. नवाझउद्दीन सिद्दीकी किंवा इरफान खान( जे आज आपल्यात नाहीत) हे तसे उत्तम कलाकार, परंतु नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर कदाचित या आणि अशा काही कलाकारांना ज्या संधी मिळाल्या त्या मिळाल्या असत्या का, याबद्दल मनात शंका निर्माण होते. नानांनी नुसताच आक्रमक किंवा गंभीर अभिनय केला नाही तर वेलकम चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभ्या करू शकतो हे जगाला दाखवले ! नाना गेले, पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. त्याचा राग आहे, त्याची अस्वस्थता आहे, त्याचा अपमान आहे, त्याची धडपड आहे आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकदही आहे. कदाचित म्हणूनच नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे. नाना पाटेकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली राज ठाकरे ।
132
1,088
52
9,918
214,305
पुस्तकायन 📚 retweeted
Keshavasut (Krishnaji Keshav Damle) was a Marathi poet who is regarded as the pioneer of modern Marathi poetry. In addition to his Marathi works, he wrote poetry in English and authored a play as well. Today is his 160th Janmatithi. Here's his famous poem 'Zapurza' - marathimati.com/2023/03/zapu… English translation - zapurza.org/zapurza-poem/ en.wikipedia.org/wiki/Keshav…
1
13
64
3,393
पुस्तकायन 📚 retweeted
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 संदीप तापकीर होर्मुझमधील संघर्ष अजूनही संपलेला नाही. इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील या संघर्षामुळे जग भयचकित झाले आहे. हे युद्ध केवळ शस्त्रांनी लढले जात नाहीये. मुळात या तीन राष्ट्रांच्या नेत्यांची इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान या तीन गोष्टींमुळे हा संघर्ष पेटला आहे. भविष्यातील युद्धे केवळ तोफा आणि बंदुकींनी नव्हे, तर माहिती, ऊर्जा, पाणी व तंत्रज्ञानावरील नियंत्रणाने ठरणार आहे. ओमान आणि इराण यांच्यामध्ये अरबी समुद्रात ३३ किलोमीटर रुंद असलेली ही होर्मुझची सामुद्रधुनी अखिल विश्वासाठी किती महत्त्वाची आहे; जगाची अर्थव्यवस्था या जलमार्गावर कशी अवलंबून आहे, हे समजून देणारे हे पुस्तक लेखकाने अनेक संदर्भग्रंथांचा उपयोग करून आपल्यासमोर ठेवले आहे. या युद्धातील आजपर्यंतच्या घडामोडींचा वेथ विजय लोणकर यांनी अत्यंत तटस्थपणे घेतला आहे. अत्यंत गुंतागुंतीचा असणारा हा विषय त्यांनी साधेपणाने, तरीही तितक्याच प्रभावीपणाने मांडला आहे. त्यांचे युद्धसंदर्भातील अभ्यासपूर्ण विश्लेषण आपल्याला विचार करायला भाग पाडते. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
5
33
670
महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीसमोर मोठे आव्हान ! महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीसमोर सध्या मोठे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यातील ९९३ मान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालय बंद झाली आहेत.
2
10
28
479
पुस्तकायन 📚 retweeted
Stay Hungry, Stay Foolish म्हणत तंत्रज्ञान, डिझाइन आणि इनोव्हेशनला आपल्या कल्पकतेने व सर्जनशीलतेने नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या प्रभावी उद्योगकर्ता स्टीव्ह जॉब्स यांचा आज स्मृतिदिन. स्टीव्ह यांना कॅलिग्राफीची आवड होती, आणि याच आवडीमुळे आज Mac च्या फॉन्ट डिझाइनमध्ये पाहायला मिळतात.. स्टीव्ह जॉब्स हे केवळ एक उद्योजक नव्हते, तर ते एक नवनिर्माते, विचारवंत आणि जग बदलण्याची क्षमता असणारे व्यक्ती होते. त्यांचा जीवनप्रवास हा जिद्द, ध्येय, आणि सतत नवनवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास असलेल्या आपल्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे..
6
35
2,307
व्हिक्टरी सिटी - सलमान रश्दी अनुवाद - वंदना भागवत इतिहास, मिथक, वास्तव आणि कल्पनाविलासाचा हा एक महाकाय पट आहे. चौदाव्या शतकातील दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याच्या उदयाची आणि अस्ताची पार्श्वभूमीवर एका काल्पनिक विश्वाची निर्मिती केली आहे. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
2
9
1
35
881
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! 🚩
14
37
729
"भाषाबंध प्रकल्प" प्रिय सुहृदहो, नमस्कार. 'भाषाबंध' प्रकल्पात आपण संविधानातील २२ भारतीय भाषा आणि हिंदीसोबत इंग्रजी ही संपर्क भाषा, अशा २३ भाषांमधील निवडक कवितांचे आंतरभाषिक अनुवाद उपलब्ध करून देणार आहोत. 'भाषाबंध' हा माणसाचे माणसाशी तुटलेले संवादाचे धागे पुन्हा जोडण्याचा 👇
2
5
3
19
985
थोर कवी, साहित्यिक, गीतकार, गीतरामायणकार पद्मश्री ग.दी. माडगूळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! मराठी मातीचा गंध, माणसांच्या भावनांची ओल आणि शब्दांना गीताची लय देणारा मनस्वी स्वर म्हणजे ग. दि. माडगूळकर.. 👇 #गदिमा #मराठी #ग_दि_माडगूळकर
1
3
3
328
"सृजनवेध" या सदरातून आपण भेटणार आहोत मराठी आणि जागतिक साहित्यविश्वातील अशा लेखकांना, ज्यांच्या लेखणीतून शब्दांना अर्थ, विचारांना दिशा आणि वाचकांना नवा दृष्टिकोन मिळाला. 👇
1
3
30