Ravi Parab retweeted
२७३ नवीन खासदारांच्या बंगला, गाडी, कॉन्वॉय, सुरक्षा आणि त्यांच्या शेंबड्या पोरांच्या भविष्याची सोय आपल्याला करायची आहे.
थोडं जास्त मेहनत करावी लागेल आता आपल्याला.
Ravi Parab retweeted
माझ्या बापाचा कोणी असा अपमान केला असता तर मी आयुष्यात कधी त्या माणसाला माफ केलं नसतं, माझ्या बापावर चिखलफेक करणाऱ्यांना संपवण्यासाठी मी खपलो असतो...
पण @supriya_sule तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी म्हातारपणात बापाची प्रतिमा धुळीस मिळवली. अशी लेक असण्यापेक्षा नसलेली बरी.
Ravi Parab retweeted
हीच वेळ आहे मतदार म्हणुन आणि महाराष्ट्राचा सजग नागरीक म्हणुन @PawarSpeaks आणि @supriya_sule यांना आदरपुर्वक निग्रहाने सांगायचं की तुम्ही डिलीमिटेशन बील ला कुठल्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पध्दतीने पाठिंबा दिला / सहकार्य केलं तर तुम्ही वैयक्तीक काय, तुमचे नेते काय, तुमच्या पक्षाकडून साक्षात विष्णु भगवान उभे राहिलेत तरी छत्रपती शिवरायांची शपथ तुमच्या पक्षाला भविष्यात कधीच मतदान करणार नाही. @NCPspeaks
#Say_No_to_Delimitation
Ravi Parab retweeted
राज साहेब ह्यांची टीका ही घणाघाती असते , थेट हृदय चिरते!
४ वर्षापूर्वी राजसाहेबांनी होणाऱ्या नव्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे ह्यांच्याबाबत एक भाकीत केले होते तेव्हा अनेकांनी महिलेवर टीका केली म्हणत नाक मुरडले पण आज #Delimitation वर खरे सुळे बाहेर आल्यावर सगळ्यांना ते वाक्य पटले!
Ravi Parab retweeted
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
Ravi Parab retweeted
कार्यकर्ते आधी फक्त साहेबांना निवडून आणण्यासाठी पळापळ करत होते,आता त्यांना साहेबाच्या पोराला, पोरीला, बायकोला, पुतण्याला पण निवडून आणण्यासाठी पळापळ करावी लागणार आहे.
डिलिमिटेशनमूळ कार्यकर्त्यांचा वर्क लोड वाढणार आहे.
#डिलिमिटेशन_बिल
Ravi Parab retweeted
ईठा चित्रपट येण,तो घराघरात पोहचणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेच आहे
कारण हल्ली कलेच्या नावाखाली महाराष्ट्राचा अक्षरश बिहार करून ठेवलाय…
आज श्रद्धा सारखी टॉपची अभिनेत्री ठसठशीत नववारी परिधान करून पारंपारिक पद्धतीने सादरीकरण करून आपली खरी संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहचवतेय❤️
Ravi Parab retweeted
साक्षात दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान श्री नरेंद मोदीजी यांनी श्री शरद पवार साहेबांना " तुम्ही आता देशाची चिंता करू नका , मी आणि सुप्रिया सगळं बघून घेईल " इतकं स्पष्ट शब्दात सार्वजनिक रित्या आश्वासन दिल्यावर देखील साहेबांनी चिंता करणे चुकीचे... किमान त्यांच्या शिष्यावर तरी त्यांनी विश्वास ठेवावा....!! आणि तसेही अदानी शेठ आहेतच की ... सगळा हिशेब व्यवस्थित दर महिन्याच्या महिन्याला पोहोच होत जाईल......
सत्ता रुपी लक्ष्मी दाराशी उभी आहे.... तिचा स्वीकार करून घ्यावे, किमान राज्याच्या जनतेच्या हितार्थ सेवा करण्यातही छातीवर दगड ठेवून एकदा हो म्हणून घ्या.... मनावर असलेले प्रचंड दडपण एकदाचं मोकळे होऊन जाईल.. "हा" या "ना" मूळ सगळेच अडकून पडलेत.. मुंडावळ्या बांधून बसलेले कार्यकर्ते /नेते / आमदार /खासदार मोकळा श्वास घेतील.. आणि आम्ही सुद्धा !!
#आतुरतेने_वाट_बघतोय #Alliance
#NCP_BJP #NDA
Ravi Parab retweeted
सर्व मराठीप्रेमींना विनंती आहे की हा व्हिडिओ व्हायरल करा. हे अत्यंत लाजिरवाणे आहे.
ज्या संयुक्त महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून, जिवाचीही पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी चळवळ उभी केली, लढा दिला आणि हुतात्म्य पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची अशी दुर्दशा का?
अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत तसेच अभिनेते सुमीत राघवन यांनी २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट दिली. तेथे दालनाची झालेली दुर्दशा पाहून त्यांना धक्का बसला.
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सर्वांना विनंती आहे की घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट द्या. तेथील फोटो काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करा आणि मराठी अभ्यास केंद्र, महापालिका तसेच संबंधित नगरसेवक, आमदार व खासदार यांना टॅग करा आणि जाब विचार.
कर्मकांडाला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची डागडुजी करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत.
आपण सर्वजण संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे वारस आहोत, हे कायम लक्षात ठेवूया.
#संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #दादर #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
Ravi Parab retweeted
अंबानीशेठ बाटलीबंद पाण्याच्या धंद्यात उतरला आणि लग्गेच बिस्लेरीविरूद्ध दावा दाखल झाला.
यालाच मुक्त स्पर्धात्मक वातावरण म्हणतात.
तरी अजून अदानीशेठने मनावर घेतलं नाहीये.
उद्या तो बाटलीबंद हवा विकायला घेईल तेव्हा मजा येईल.
Ravi Parab retweeted
तीन वर्षांपेक्षा जास्त काळ आमदार किंवा खासदार पदावर राहूनही मतदारसंघासाठी ठोस काम केल नसल,तर अशा लोकप्रतिनिधींचीही आमदारकी आणि खासदारकी रद्द करून त्यांना घरी बसवा पद हे जनतेच्या सेवेसाठी आहे,मिरवण्यासाठी नाही.
@cbawankule
#लोकप्रतिनिधी #कामनाहीतरखुर्चीनाही #लोकशाही #महाराष्ट्र
Ravi Parab retweeted
मुस्लिम युवकांनी एका जोडप्याला मारहाण केली. सर्वात आधी मनसे या प्रकरणात उतरली
झोपलेली "भाजपा" हिंदू-मुस्लिम अँगल पाहून जागी झाली
पण जेव्हा परप्रांतीय लोक #मराठी माणसांच्या अंगावर येत मारहाण करतात. तेव्हा मात्र "भाजपवाले" लपून बसतात
यांना मराठी माणसांशी घेणं देणं नाही
Ravi Parab retweeted
कुर्ला घटनेवर सर्वात आधी मनसेची ऍक्शन🤜
काल सायंकाळी मराठी जोडप्याला मारहाणीची घटना समजताच मनसे शाखा अध्यक्ष नरेश तारी काल सायंकाळी गार्डन मध्ये पोहचले, पोलिसांना सांगून शोध सुरू. आज दुपारी विभागअध्यक्ष पोलिस अधिकारी ह्यांना भेटले. ६ जणांना अटक.
आणि आज संध्याकाळी सोमय्या आले!
Ravi Parab retweeted
Wow.. Clean and Clear!!
Well job done by @navalMH @PMCPune
छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परिसर बऱ्याच दिवसांनी मोकळा श्वास घेत आहे.
तमाम खासदार, आमदार, नगरसेवक (सर्व पक्षीय 😉) व कार्यकर्त्यांना विनंती आहे आता तुम्ही इथे flex लावून चौक, रस्ते रंगीबेरंगी करू नका.🙏🙏
#pune
Ravi Parab retweeted
पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज, मॉडेल कॉलनी, सिंहगड रोड. लक्ष्मी रोड कसबा मतदार संघ...
सगळ अतिक्रमण हे स्थानिक नगरसेवकाच्या जवळच्या कार्यकर्त्यांची आहे.
अख्ख्या पुण्याला माहीत आहेत इथे कोण नगरसेवक येतात निवडून ते...
पुणे प्रशासनाने दबावाला झुगारून कारवाई केली...जाहीर आभार
Ravi Parab retweeted
पाच विचारी लोक एका फ्रेममध्ये.
गुवाहाटी गटाच्या प्रवक्त्यांनी सोनिया गांधींच्या पुस्तकावर टीका करून पुस्तक फाडण्यासाठी घेतलेली पत्रकार परिषद.
काही प्रश्न.
यांनी प्रत्येकी एक पुस्तक घेऊन फाडले का पाचात एकावर भागवलं?
पत्रकारांनी बातमी करण्याआधी फाडलेल्या कागदांची खातरजमा केली का?
वाचन हा गुवाहाटी गॅंगचा प्रांत नाहीये.मग हे पुस्तक यांच्यासाठी कोणी वाचलं असेल?
असे घोस्ट वाचक केवढ्याला मिळतात?
ही पत्रकार परिषद हार्पर कॉलिन्सनेच घडवून आणली नाही ना?
आता या पुस्तकाचा खप आणखी वाढेल का?
एखाद्या समूहात संजय निरूपम सगळ्यांत शहाणा असं समजून मध्ये बसत असेल तर बाकीच्यांचा आयक्यू काय असेल?असेल का?
Ravi Parab retweeted
ज्या महाराष्ट्र पोलीस दलाचा सगळ्या देशात नावलौकिक होता..
ज्या पोलिसांचा धाक होता, त्या पोलिसांना आज तुम्ही बुकेवाले बनवलं..
मॅडम गाडीत बसून लोकशाहीवर ज्ञान देतायत, आणि पोलीस यांचे बुके घेऊन घेऊन येत आहेत..
यापेक्षा मोठी लोकशाहीची थट्टा अजून काय असणार?
Ravi Parab retweeted
40 जणांच्या उठावाने महाराष्ट्राला संस्कृतीतून उठवलं....
तुमचे उपकार पुढच्या 100 पिढ्या विसरणार नाहीत श्रीमान एकनाथ शिंदे.!
.
33 देशांनी ह्याची दखल घेतलीच असेल.
.
#eknathshinde
.






























