अजितपर्व retweeted
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी आहे.
या पार्श्वभूमीवर आज बारामती तालुक्यातील बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली, शेतकरी बांधवांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा, अडचणी आणि झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
अजितपर्व retweeted
Warmly welcomed Hon’ble President of France, H.E. Emmanuel Macron and First Lady Brigitte Macron on their arrival in Mumbai last night. Along with Hon’ble Maharashtra Governor Acharya Devvrat Ji, CM Devendra Fadnavis Ji and Deputy CM Eknath Shinde Ji, it was an honour to receive them during their India visit, further strengthening the India-France partnership.
@EmmanuelMacron @maha_governor @Dev_Fadnavis @mieknathshinde
अजितपर्व retweeted
स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली, ही समाधानाची बाब आहे. मान्यता मिळालेल्या जागांमध्ये पाटोदा, केज, परळी, गेवराई, माजलगाव येथे प्रत्येकी २ (मुलांसाठी १ व मुलींसाठी १) आणि बीड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा समावेश आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींनी शिकले पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, असे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि या मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. ते पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्या होत्या. सारथी संस्थेच्या वतीने मराठा समाजातील मुलांसाठी विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचे दर्जेदार बांधकाम करावे, अशा सूचना अजितदादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना वेळोवेळी दिल्या होत्या.
अजितपर्व retweeted
मुंबई येथील कार्यालयात पालघर जिल्ह्यातील बालपंचायत सदस्यांची भेट घेतली. वयाने लहान असले तरी, आपल्या हक्कांबाबत आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांबाबत या मुलांनी व्यक्त केलेले विचार अत्यंत प्रगल्भ आहेत.
या मुलांच्या जडणघडणीत 'परिवर्तन महिला संस्था' अत्यंत मोलाचे कार्य करत आहे. सन २००० पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेने महिला सक्षमीकरणासोबतच आदिवासी बांधव, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. विशेषतः मोखाडा, शहापूर यांसारख्या दुर्गम भागात 'बालपंचायत' सारख्या उपक्रमांतून लोकशाहीची मूल्ये शालेय वयातच रुजवण्याचे आणि मुलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सक्षम करण्याचे उत्तम कार्य ही संस्था करत आहे. 'मुक्त बालिकाश्रम', 'दिलासा विरंगुळा केंद्र' आणि 'सखी निवास' यांसारख्या प्रकल्पांतून हजारो जीवनांमध्ये परिवर्तनाची पहाट आणणाऱ्या या संस्थेचा दृष्टिकोन कौतुकास्पद आहे.
पालघरच्या या मुलांशी संवाद साधताना त्यांच्यातील आत्मविश्वास प्रकर्षाने जाणवला. महिला व बालविकास विभाग या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मी त्यांना दिली. परिवर्तनासाठी काम करणाऱ्या अशा संस्थांच्या पाठीशी आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे.
अजितपर्व retweeted
दादा... हा विजय आपल्या शाबासकीशिवाय अपूर्ण आहे !
@AjitPawarSpeaks दादा 💔💔
अजितपर्व retweeted
आज जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, आमचे नेते मा.श्री. अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे.
मा. अजितदादांनी आयुष्यभर तळागाळातील माणसासाठी झटत विकासाला गती दिली. आजचा हा निकाल म्हणजे त्यांच्या विचारांवरील, त्यांच्या नेतृत्वावरील अढळ श्रद्धेची साक्ष आहे. या माध्यमातून दादांचा वारसा जपत अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
अजितपर्व retweeted
तटकरे साहेबांनी मुलाखत देऊन बऱ्याच लोकांची गोची केली आहे.
मीडिया जे प्रश्न विचारायचे विसरली त्या प्रश्नांना हात घातलाय तटकरे साहेबांनी.
@SunilTatkare
अजितपर्व retweeted
आदरणीय अजित दादांचा महाराष्ट्रातील सर्व तमाम मतदार बंधू - भगिनींना जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेवटचा संदेश...!
#AjitPawar
😢
अजितपर्व retweeted
सुनेत्रावहिनी... आपल्या या धैर्याचं शब्दांत वर्णन करणं अशक्य...
आपले सर्वांचे नेते, आपले प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार यांनी अत्यंत मायेने, आपुलकीने पुणे व बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व केले. दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली, पुणे व बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली... दादांच्या पश्चात आपण उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राला आधार दिला, त्यापुढे जात आपण आज पुणे व बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत आहात. आभाळाएवढे दुःख बाजूला सारून आपण महाराष्ट्राला सावरण्यासाठी जे धैर्य दाखवत आहात, ते शब्दांच्या पलीकडले आहे.
आपल्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक प्रवासात माझ्यासह संपूर्ण राष्ट्रवादी परिवार आपल्यासोबत ठामपणे उभा आहे. आपले नेतृत्व महाराष्ट्राला क्षणोक्षणी अजितदादांच्या नेतृत्वाची आठवण करून देणारे ठरेल हा मला विश्वास आहे. आपणांस पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
@SunetraA_Pawar
अजितपर्व retweeted
माननीय सुनेत्रावहिनींच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा निर्णय संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराच्या सहमतीने घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम सदस्यांनी आदरणीय अजितदादांनंतर सुनेत्रावहिनींचे नेतृत्व मान्य केले आहे.
आदरणीय अजितदादांनी घेतलेल्या निर्णयातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनडीएचा प्रमुख घटकपक्ष असून, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी व सर्वसमावेशक वैचारिक भूमिकेतून वाटचाल करत राहणार आहे.
अजितपर्व retweeted
आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन करण्यात आले. यावेळी दादांच्या पवित्र स्मृतींचे स्मरण करत भावपूर्ण आदरांजली वाहिली.
।।ॐ शांती।।
📍राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, मुंबई
अजितपर्व retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आतल्या फळीचे सर्व नेते विलनीकरणाच्या मुद्यावर ठामपणे विरोधात उभे झालेले आहेत.
पक्षाला विश्वासात न घेता दादांनी असा कुठला शब्द पवार साहेबांना दिला असेल असं सध्याच्या स्तिथीत वाटतं नाही.
#NCP #AjitPawar
अजितपर्व retweeted
To those writing filth about our Dada… your hate says more about you than it ever will about him. History remembers work, not noise.
#Dada 💔
अजितपर्व retweeted
जिथे आम्ही मैदानात ‘कुस्तीचा डाव’ टाकतील समजत होतो त्या ठिकाणी विरोधक ‘रडीचा डाव’ टाकत आहेत. लोकांचा कौल हा राष्ट्रवादीच्या बाजूने आहे, त्यामुळे ही भितीपोटी केलेली कृती आहे. पुणेकरांना दादांनी दिलेला शब्द पूर्ण होऊ नये म्हणून आणलेले हे विघ्न आहे. श्री दगडूशेठ गणेशाच्या कृपेने या विघ्नावर मात करून पुणेकरांना दिलेला शब्द दादांच्या हातून पूर्ण होईल हा पुणेकरांना विश्वास आहे.
राष्ट्रवादीची घोडदौड रोखू पाहणाऱ्यांना 15 जानेवारीला पुणेकर मत रुपी ऊत्तर देतील.
अजितपर्व retweeted
Maharashtra DCM Ajit Pawar conducts interviews of prospective candidates for Pune Municipal Corporation Elections.
अजितपर्व retweeted
गल्लीच्या राजकारणात पण रडीचा डाव खेळून जिंकलो जिंकलो असा माज करणाऱ्या लिंबूटिंबू 'बाळा'ने अजितदादांवर बरळणे म्हणजे 'इतभर लाकूड अन हातभर ढलपी' असा प्रकार आहे.
विजयाचा उन्माद करताना अनगरच्या “बाळानी”उड़ता तीर अंगावर घेतला आहे.
लवकरच …. झुकतील गर्विष्ठ माना!!
अजितपर्व retweeted
VIDEO | Mumbai: After India Against Corruption (IAC) activist Anjali Damania demanded the resignation of Maharashtra Deputy CM Ajit Pawar over his remark, NCP leader Suraj Chavan (@surajvchavan) said, “The Maharashtra government has constituted a high-level committee to investigate the Pune incident. An impartial probe is being conducted by this committee. However, some people do not take matters seriously when the Pawar name is involved. Our priority, however, has always been the people of Maharashtra.”
#Maharashtra
(Full video available on PTI Videos - ptivideos.com)


















