Rajendra Patode (@rajpatode101) header
Rajendra Patode (@rajpatode101) profile picture

Maharashtra State President, Vanchit Bahujan Aaghadi

Maharashtra, India
Joined November 2014
Photo by Rajendra Patode (@rajpatode101)Photo by Rajendra Patode (@rajpatode101)Photo by Rajendra Patode (@rajpatode101)Photo by Rajendra Patode (@rajpatode101)Photo by Rajendra Patode (@rajpatode101)Photo by Rajendra Patode (@rajpatode101)Photo by Rajendra Patode (@rajpatode101)Photo by Rajendra Patode (@rajpatode101)
काँग्रेस मध्ये भाजपाचे स्लिपर सेल म्हणून ज्यांचा उल्लेख राहुल गांधींनी केला होता त्यापैकी एक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण? मतदार संघ फेररचना राहुल गांधी अँटी नॅशनल म्हणून सांगणार आणि पृथ्वीराज चव्हाण विरोध नाही म्हणून जाहीर करणार ! @INCMaharashtra @INCIndia
2
18
3
69
4,607
हि बातमी२९ डिसेंबर २०२५ मधील आहे आद बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाकित खरं ठरले आहे. #राष्ट्रवादीपुन्हा
49
3
184
1,451
उठा उठा पहाट झाली भाजपला मतदान करण्याची वेळ झाली... #Delimitation #पुरोगामी
4
34
1
183
5,635
पवारांच्या राष्ट्रवादीचा डिलीमिटेशनला पाठिंबा : आव्हाड आता सिद्ध झाले की भाजपचे बी टीम वाले कोण आहेत? #DelimitationBill #VBAforIndia
2
18
60
603
📍पुणे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न पुण्यात काल वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.महिला मुक्ती परिषद, भीमा कोरेगाव अभिवादन रॅली आणि सभा ह्या सोबत आगामी पक्ष संघटनात्मक बांधणी, बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले दिशानिर्देश, आगामी मुद्द्यांवरील लढ्याची आखणी, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती अशा विविध विषयांवर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी महासचिव प्रा सोमनाथ साळुंके, सदस्य सर्वश्री नागोराव पांचाळ, अरुण जाधव, जितरत्न पटाईत, डॉ चित्रा कुऱ्हे, प्रशांत इंगोले, ज्ञानेश्वर कवठेकर, उत्तम वनशिव, सर्वजित बनसोडे, दिपक डोके प्रामुख्याने उपस्थित होते. #VBAforIndia
1
5
41
483
१७ जून रोजी, जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी बाजू बदलून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत या ६ खासदारांना त्वरित 'भो**चे' असे संबोधले. संजय राऊत यांनी खूप हुशारीने खेळी खेळली आणि या ६ खासदारांना 'भो**चे' म्हटले. या खासदारांना शिवीगाळ करून, संजय राऊत यांनी मतदारांकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांपासून आणि जबाबदारी निश्चित होण्यापासून स्वतःची सुटका करून घेतली! छान खेळलात संजय राऊत, पण आम्ही काही मूर्ख नाहीत! आता, आम्ही जे सांगत आहोत ते अतिशय काळजीपूर्वक वाचा. संजय राऊत हेच खरे भो**चे आहेत. महाविकास आघाडी हेच खरे भो**चे आहेत. या उमेदवारांची निवड कोणी केली? त्यांना तिकीट कोणी दिले? भाजपविरुद्ध लढणारे, तसेच लोकशाही, संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षणकर्ते म्हणून त्यांना जनतेसमोर कोणी सादर केले? याचे उत्तर खुद्द शिवसेना उबाठा नेतृत्व हेच आहे. पत्रकार परिषदेतील संजय राऊत यांचा हा स्टंट याच प्रश्नांपासून आणि मतदारांच्या उत्तरदायित्वापासून वाचण्यासाठी होता! २०२४च्या लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी मतदारांना विनंती केली होती की, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, आरक्षण, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी भाजपविरुद्ध त्यांना मतदान करावे. परंतु, जेव्हा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा वंचितच्या प्रतिनिधींनी आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून लेखी हमी मागितली होती की, निवडणुकीनंतर त्यांचा कोणताही निवडून आलेला सदस्य भाजपमध्ये जाणार नाही. संजय राऊत यांनी याला स्पष्टपणे नकार दिला होता. "आम्ही अशी हमी देऊ शकत नाही," असे त्यांचे उत्तर होते! धोक्याचे संकेत तर सुरुवातीपासूनच दिसत होते. त्यावेळी, राजकीय हमी आणि किमान समान कार्यक्रमाशिवाय युती करण्यास नकार दिल्यामुळे, पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी 'वंचित'ला आक्रमकपणे भाजपची 'बी-टीम' ठरवले होते. या पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांना एक प्रश्न विचारलाच पाहिजे. जर उबाठाचे ६ खासदार भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात सामील झाले असतील, तर प्रत्यक्षात भाजपला बळ कोणी दिले? भाजपविरोधी मतदारांची दिशाभूल कोणी केली? भाजपची खरी 'बी-टीम' कोण आहे? मविआने मतदारांना पटवून दिले होते की, हे उमेदवार भाजपशी लढतील. पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी मतदारांची खात्री पटवली होती की हे उमेदवार घटनात्मक मूल्यांचे रक्षण करतील. संजय राऊत खासदारांना हवे तसे शिव्या देऊ शकतात. पण ज्यांना स्वतः निवडले, पुढे आणले, ज्यांच्यासाठी प्रचार केला आणि ज्यांना मतदारांवर लादले, त्या लोकांवर टीका करून किंवा शिव्या देऊन संजय राऊत जबाबदारीतून सुटू शकत नाहीत. जर एखादा पूल कोसळला, तर अभियंता विटांना दोष देऊन जबाबदारीतून सुटू शकत नाही. 'वंचित'ने पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या चिंतांना कोणी फेटाळून लावले? हे ६ उमेदवार का निवडले गेले? भाजपशी लढण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तसेच आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी त्यांना मते देण्याचे आवाहन मतदारांना कोणी केले? याचे उत्तर आहे महाविकास आघाडी! मग, खरा भो**चे कोण? मतदारांनी तुमच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि महाविकास आघाडीला डोळे झाकून मते दिली. त्यांना खोटे बोलल्याबद्दल आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल खरे भो**चे कोण? उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर लाईन मारत आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या दिवशी, काँग्रेसने अशा खासदाराच्या मुलाला पाठिंबा दिला जो भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेत सामील झाला होता. भाजपला फायदा करून देण्यासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी अनेक ठिकाणी आपले विधान परिषद उमेदवार मागे घेतले. भाजपकडून १०-१५ कोटी रुपये घेतल्यावर, भाजपविरुद्धच्या प्रचारादरम्यान अमरावतीमधील काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवाराने सोयीस्करपणे स्वतःला आयसीयूमध्ये दाखल करून घेतले. भाजपची खरी 'बी-टीम' कोण आहे? ज्या पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी मतदारांना सांगितले की, 'वंचित' ही भाजपची 'बी-टीम' आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी व भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे, त्यांना काय म्हणावे? मतदारांची फसवणूक केल्याबद्दल खरे भो**चे कोण? 'वंचित'ला भाजपची 'बी-टीम' म्हणणारे महाविकास आघाडी आणि पाकीट पत्रकार व तथाकथित विचारवंत हेच खरे भो**चे आहेत. कारण, त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरवादी मतदारांची दिशाभूल केली आणि त्यांना फसवले.
6
59
5
183
9,579
Rajendra Patode retweeted
आंबेडकरी चळवळीचं डॉक्युमेंट्शन होणे ही काळाची गरज आहे - प्रा. अंजलीताई आंबेडकर
30
91
830
उद्योगपतींसाठी शेतकऱ्याच्या जमिनी लुटण्याची सरकारची कुटिल मंशा राजेंद्र पातोडे. तीन वर्षे जमीन पडीक राहिली तर सरकार ती ताब्यात घेऊ शकते, असे वक्तव्य करून बावनकुळे यांनी सरकारचा शेतकरीविरोधी चेहरा उघड केला आहे.उद्योगपतींसाठी शेतकऱ्याच्या जमिनी लुटण्याची सरकारची कुटिल मंशा आहे. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, पाण्याअभावी उजाड झालेली शेती, बेभाव विकावे लागणारे पशुधन, डोक्यावर कर्जाचा डोंगर, हाताला काम नाही आणि पिकवण्यासाठी साधनसामग्री नाही.शेतमालाला हमी भाव मिळत नाही.जगण्याचा प्रश्न राज्यातील शेतकऱ्या पुढे उभा आहे, अशा भयावह परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी त्याच्या जमिनीवरच सरकारची वक्रदृष्टी पडली आहे.बावनकुळे ह्यांचे विधान इंग्रजी राजवटीला लाजवणारे संतापजनक आहे. शेतकऱ्याची जमीन पडीक राहते ती त्याच्या इच्छेने नाही, तर सरकारच्या अपयशी धोरणांमुळे, सिंचनाच्या अभावामुळे, निसर्गाच्या संकटामुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी उद्योग धंद्यांना दिली जाते तशी सवलत शेतीला मिळत नाही.पाणी, वीज, कर्जमुक्ती आणि योग्य हमीभाव देण्यात सरकार अपयशी ठरते आणि नंतर त्याच शेतकऱ्याच्या जमिनीवर ताबा मिळवण्याची भाषा करते.शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला घालण्याची मानसिकता आणि भाषा बंद करा अन्यथा हा शेतकरी तुमची माजोर्डी सत्ता उलथवून राहिल्या शिवाय राहणार नाही.असा इशारा देखील राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. अदानी अंबानींसारख्या बड्या उद्योगपती आणि सुप्रिया सुळे यांच्या जावयाना द्यायला सरकारी जमीन कमी पडल्या की काय जे आता तीन वर्षे वहीत नसलेल्या जमिनी सरकार कडे घेण्याची भाषा केली जात आहे.सामान्य शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीवर सरकारची नजर जाते.मोठ्या भांडवलदारांसाठी जमीन आणि गरीब शेतकऱ्यासाठी जप्तीची भाषा बंद करा.शेतकऱ्याची जमीन ही त्याच्या वडिलोपार्जित संपत्ती आहे; ती सरकारच्या मर्जीनुसार हिसकावून घेण्याचा विचार सरकारने करू नये.सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेती संकटात असताना त्या संकटाची शिक्षा शेतकऱ्याला देण्याचा वक्तव्य निषेधार्ह आहे.शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी त्याच्या जमिनीवर कब्जा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पुढील काळात शेतकरी जागा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही. वंचित बहुजन आघाडी या शेतकरीविरोधी मानसिकतेचा तीव्र निषेध करते. शेतकऱ्यांच्या जमिनीचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे धोरण आणि नियम आम्ही कदापि खपवून घेणार नाही.शेतकऱ्याच्या जमीन बळकावण्याची भाषा बावनकुळे आणि भाजपने करू नये.जमिनी घ्यायच्या असतील तर ज्या उद्योगपती आणि शिक्षण सम्राट, साखर सम्राट आणि राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनी बळकावल्या आहेत त्या आधी शासन जमा करण्याची हिम्मत महसूल विभागाने दाखवली पाहिजे. राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश. #वंचितबहुजनआघाडी #शेतकरीविरोधीधोरण #शेतकरी #राजेंद्रपातोडे
14
25
414
संविधान सन्मान महासभा दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६ वेळ : संध्याकाळी ४ वाजता स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई आयोजक वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश. सन्माननीय संविधानवादी भारतीय नागरिकांनो, सप्रेम जय भिम फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय लढा सुरू आहे.हा लढा एकाच ध्येयासाठी आहे.भारतीय संविधान अबाधित राखणे. आज देशात उघडपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची विटंबना होत आहे. संविधानाने दिलेल्या स्वायत्त संस्थांवर हल्ला सुरू आहे. मताचा अधिकारही राजरोसपणे कमकुवत केला जात आहे.हे हुकूमशाहीकडे टाकलेले पाऊल आहे. हा देश मनुवादाने नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाने चालणार, हे पुन्हा एकदा ठासून सांगण्याची गरज आहे.म्हणूनच वंचित बहुजन आघाडी दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभा आयोजित करते. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे होणाऱ्या या महासभेत आपण सहभागी व्हावे, अशी आग्रहाची विनंती. आपली उपस्थितीच संविधानाच्या सन्मानाचे खरे प्रतीक ठरेल. धन्यवाद. राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश
3
19
428
बाबासाहेबांच्या स्मारक दिरंगाई प्रकरणी नोटिसा देण्याची नौटंकी बंद करून कमिशनखोरीची उच्चस्तरीय चौकशी करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. मूळ कंत्राट देताना मूळ निविदेतील वाढ सुमारे २६ टक्के इतकी होती. तरीही कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प, वारंवार मुदतवाढ, कामातील दिरंगाई आणि आता कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्याच्या नावावर कमिशन वाढीसाठी दिलेला इशारा आहे. स्मारक पूर्ण न होण्याला आणि खर्च वाढीसाठी आजवर कोण जबाबदार ? नोटिसा देण्याची नौटंकी बंद करून कमिशनखोरीची उच्चस्तरीय चौकशी करा. : राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #InduMill #Ambedkar #Mumbai @CMOMaharashtra @MSJEGOI @soacialwelfare
7
33
425
जलसंपदा विभागातील १६,४९२ पदांचे कंत्राटीकरण करून युवकांच्या नोकऱ्यांचा लिलाव! - राजेंद्र पातोडे महाराष्ट्र शासनाच्या १९ नोव्हेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागातील एकूण १६,४९२ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागासाठी ३९,७२२ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३१,५४१ पदे नियमित आहेत. तर ८,१८१ नवीन पदे आणि ८,३११ संक्रमणातील पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. या कंत्राटी पदांना आरक्षण, नियमित वेतन आणि कायमस्वरूपी रोजगाराची हमी नाही. म्हणजेच युवकांसाठी सरकारी नोकऱ्यांऐवजी ‘कामावर ठेवा आणि काढून टाका’ अशी शोषणाची व्यवस्था निर्माण केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावे की, नियमित पदे कमी का ठेवली? हजारो पदे आउटसोर्स का केली? गरीब, बहुजन, दलित आणि आदिवासी युवकांना कायमस्वरूपी नोकऱ्यांपासून वंचित का ठेवले? वंचित बहुजन आघाडी या कंत्राटीकरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करते. युवकांच्या भविष्याचा लिलाव करणारा हा निर्णय रद्द करण्यासाठी युवक-युवतींनी आंदोलनाची तयारी करावी. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील! : राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAforIndia
10
27
765
प्रति, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्व प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर, ग्रामीण व शाखास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथप्रमुख. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण SIR प्रक्रियेअंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व अपात्र मतदारांची पडताळणी तसेच मतदार यादीचे पुनरीक्षण करण्यात येत आहे. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिये बाबत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गणनेच्या अर्जाचे वाटप व संकलन १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६, दावे व हरकतींची विल्हेवाट १५ डिसेंबर २०२६ पर्यंत, मतदार यादीचे अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान वंचित, उपेक्षित, शोषित, बहुजन, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक व इतर दुर्बल घटकांतील पात्र मतदारांची नावे कोणत्याही कारणास्तव मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीने प्रत्येक पात्र नागरिकाला दिलेला मूलभूत लोकशाही अधिकार आहे. प्रशासकीय त्रुटी, माहितीचा अभाव किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे एकाही पात्र नागरिकाला मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे. आपल्या गावात, वॉर्डात, परिसरात व बुथनिहाय वंचित समूहातील मतदारांची विशेष पडताळणी करावी. प्रत्येक पात्र मतदाराला गणनेचा अर्ज प्राप्त झाला आहे की नाही, याची खात्री करावी. गणनेचा अर्ज योग्य प्रकारे भरून विहित मुदतीत जमा होईल, यासाठी मतदारांना मदत करावी. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अनुपस्थित, स्थलांतरित किंवा अन्य चुकीच्या कारणाने वगळले जाणार नाही, यावर लक्ष ठेवावे. मतदार यादीत नाव नसल्याचे आढळल्यास किंवा नाव वगळण्याची नोटीस मिळाल्यास संबंधित मतदाराला दावे व हरकती दाखल करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करावे. विशेषतः गरीब, अशिक्षित, वृद्ध, दिव्यांग, महिला, भटके विमुक्त व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना या प्रक्रियेची माहिती द्यावी. प्रत्येक बुथवरील कामाचा आढावा घेऊन पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहतील, यासाठी निवडणूक यंत्रणेकडे आवश्यक पाठपुरावा करावा. वंचित समाजाच्या लोकशाहीतील सहभागाशी आणि मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये ह्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्व प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर, ग्रामीण व शाखास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथप्रमुख यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून ही जबाबदारी प्राधान्याने पार पाडावी. मतदार यादीत नाव असेल तरच मतदानाचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार कायम राहील. त्यासाठी बीएलए १ आणि बीएलए २ आणि पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी नियोजन करावे. केलेल्या कामाचा अहवाल पक्षा कडे सादर करण्यात यावा. : राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी : सोमनाथ साळुंके महासचिव, वंचित बहुजन आघाडी #VBAforIndia
14
47
1,321
न्यायालय राज्यातील मतचोरी रोखू शकले असते, मात्र न्यायालये गंभीर नाहीत... thehindu.com/news/national/m…
1
10
1
24
425
📍 नाशिक जय भीम Gen - Z फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z चा उत्स्फूर्त प्रतिसाद!. #JaiBhimGenZ #VBAxGenZ #MH15 #VBA
7
25
766