
Sr. Sub Editor and Reporter of @Lokmat Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Joined April 2011
- Tweets7K
- Following43
- Followers752
- Likes7.3K
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
दिवाळीचा प्रकाश रुग्णालयांतही उजळला! घाटी, जिल्हा रुग्णालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालयात आकाशकंदील, विद्युत माळांनी सजावट करण्यात आली. डॉक्टर, परिचारिका यांनी सणाच्या दिवशीही रुग्णसेवेचे कर्तव्य बजावले. रुग्णांना खास दिवाळी भोजनाची मेजवानी देण्यात आली.#chhatrapatisambhajinagar
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
लहान वयातच मधुमेहाचे निदान झालेल्या चिमुकल्यांना आता उपचारांसाठी धावपळ करण्याची गरज भासणार नाही. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ‘उडान’ संस्थेच्या पुढाकारातून बालमधुमेहींसाठी स्वतंत्र ‘टाइप-१ डायबिटिस स्पेशालिटी क्लिनिक’ सुरू झाले आहे. #chhatrapatisambhajinagar
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
✈️ सात हजारांचे विमान तिकीट, वर अडीच हजारांचा टॅक्सी खर्च!
नवी मुंबई विमानतळामुळे छत्रपती संभाजीनगरकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.
#छत्रपतीसंभाजीनगर #विमानसेवा #मुंबई #नवीमुंबईविमानतळ #प्रवासी #महाराष्ट्र #Lokmat
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
एप्रिल २८, १८१९…
ब्रिटिश सैन्याधिकारी जॉन स्मिथ अजंठ्याच्या दाट जंगलात वाघाच्या मागावर होते. शिकार करताना अचानक लेनापूर परिसरातील डोंगररांगांमध्ये कोरलेल्या लेण्यांचे दर्शन त्यांना झाले. झाडाझुडपे दूर करत ते जेव्हा लेण्यांपर्यंत पोहोचले, तेव्हा समोर उभे ठाकलेले अद्भुत दृश्य पाहून त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
तथागत गौतम बुध्दांच्या अप्रतिम शिल्पकृती, बौद्ध तत्त्वज्ञान प्रतिबिंबित करणारी चित्रे आणि शिल्पवैभव जगासाठी पुन्हा एकदा उजेडात आले त्या ऐतिहासिक क्षणाला आज २०७ वर्षे पूर्ण झाली. जिल्ह्याचे भूषण ठरलेल्या अजंठा लेण्या गेली दोन शतके देश-विदेशातील पुरातत्त्व तज्ज्ञ आणि पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या वारशामुळे परिसरातील व्यापार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे.
आज गरज आहे ती लेण्यांपर्यंत दर्जेदार रस्ता बांधण्याची आणि हा अमोल सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची.
विशेष म्हणजे, जॉन स्मिथ यांचे पाचवे वंशज निवृत्त कर्नल मार्टिन स्मिथ आणि त्यांच्या पत्नी मार्गरेट यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगर (तेव्हाचे औरंगाबाद) येथे येऊन अजंठा लेण्यांना भेट दिली होती. ही माहिती समजताच मी त्यांना आग्रहाने लोकमत भवनात आमंत्रित केले. मनमोकळ्या गप्पांमध्ये त्यांनी शहराच्या आदरातिथ्याचे मनापासून कौतुक केले.
“माझ्या पूर्वजांनी शोधलेल्या लेण्या आणि भारताचे एकंदर सांस्कृतिक वैभव पाहून मन भारावून गेले,” असे ते म्हणाले.
आज, या पुनर्शोधाच्या स्मृतिदिनी, त्यांच्याशी झालेल्या त्या संवादाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि मन भरून आले.
#AjantaCaves #JohnSmith
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
लोकमत छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचा वर्धापन दिन माझ्यासाठी नेहमीच विशेष असतो. हर्ष, स्वप्नपूर्ती, कृतज्ञता, आणि भविष्याबद्दल प्रचंड आशावाद अशा अनेक भावना माझ्या मनात दाटून येतात. 'लोकमत'च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त लोकमत परिवारातल्या माझ्या सर्व सदस्यांशी हितगुज साधताना आज चार दशकांहून जास्तीचा हा सर्व प्रवास माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. १९८१ साली मी जेंव्हा इथे आलो तेंव्हा पैसे, मनुष्यबळ आणि संसाधनांचा अभाव आमच्या समोर होता. माझ्याकडे शिदोरी होती ती 'लोकमत'चे संस्थापक बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन, विजयभैय्यांची खंबीर साथ आणि लोकमत परिवारातले माझे जीवाला जीव देणारे सहकारी. १९८२ ला याच दिवशी 'लोकमत'चा पहिला अंक प्रकाशित झाला तेंव्हा माझी संपूर्ण टीम होती अवघ्या ३५ लोकांची. मी त्यांना संस्थापक सदस्य म्हणेन. बऱ्याच जणांना कामाचा अनुभव नव्हता, कारकिर्दीची नुकतीच सुरवात होती पण सर्वांमध्ये एक समान धागा होता - मेहनतीची तयारी आणि काहीतरी जगावेगळे करून दाखवयाची जिद्द. 'लोकमत'ची उत्तरोत्तर प्रगती झाली यात मग आश्चर्य वाटायला नको. पुढे अनेक नवीन, समर्पित सदस्य जोडले गेले. 'लोकमत'ने नेहमीच लोकांच्या प्रश्नाला महत्व दिले, नवीन तंत्रज्ञान स्वीकारले, कालानुरूप वृत्तपत्रात बदल केले. सर्वांच्या सांघिक मेहनतीचे फळ म्हणजे आज लोकमत महाराष्ट्रातील गावागावात पोहोचलेले आघाडीचे दैनिक आहे. मला एका गोष्टीचे विशेष समाधान आहे. पुढील पिढी म्हणजे देवेंद्र, ऋषी आणि करण हे 'लोकमत'चा झेंडा डौलाने फडकवत ठेवण्यासाठी खूप परिश्रम घेत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डिजिटल पत्रकारिता हे नवे बदल स्वीकारत ते प्रिंटच्या व्यवसायालाही बळकटी देत आहेत. लोकमत परिवारातील सदस्यांना माझे फक्त एक सांगणे आहे - तेचतेच काम करण्यावर विश्वास ठेऊ नका, काहीतरी 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करा. यश निश्चितच मिळेल.
मराठवाड्यातील चोखंदळ वाचक, जाहिरातदार, आणि स्नेह्यांचे खूप खूप आभार. मी खरंच आपला ऋणी आहे. 'लोकमत'ला आपण आपला मानले, 'लोकमत'चे सर्व प्रयोग स्वीकारले, टीकाही केली, अनेक सूचना केल्या पण भल्या पहाटे लोकमत वाचल्याशिवाय आमचा दिवस सुरु होत नाही असे सांगणारे असंख्य वाचक मला नेहमी भेटतात. खूप खूप धन्यवाद..
@vijayjdarda @devendarda @rishidarda @karandarda
#Lokmat #ChhatrapatiSambhajinagar
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
Listening to Papa on the 44th anniversary of Lokmat in Chhatrapati Sambhajinagar today was a moment to cherish for a lifetime. Not just for me, but for every member of the Lokmat family gathered at Lokmat Bhavan, it was truly mesmerising to hear about the humble beginnings of Lokmat on this very day in 1982-the many challenges and crises faced, and the dedicated team that worked tirelessly to overcome them.
It was an inspiring tale of commitment, grit and hard work. For me, it felt like a masterclass in true leadership and management. Hats off to Papa-the leader who identified talent, nurtured it, and created many “Bhuvans”, much like Lagaan.
Heartiest congratulations to Team Lokmat on this anniversary. My sincere gratitude to our discerning readers, advertisers, friends and well-wishers from Marathwada for your wholehearted support. That is the energy that keeps us going.
@RajendrajDarda
#Lokmat #ChhatrapatiSambhajinagar
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
Replying to @RailMinIndia
@RailMinIndia @IR_CRB @Devendra_Office @OfficeOfNG Part 2 नागपूर ट्रेन मांग -औरंगाबाद से जालना,सेलू, परभणी अकोला मार्ग से नागपूर के लिये द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस ट्रेन उपलब्ध कराये इस ट्रेन के कारण नागपूरकी जनता अजंता,एलोरा लेणी देखणे व घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन को आ संकेंगे
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
Replying to @PMOIndia
@PMOIndia @RailMinIndia @Devendra_Office Part 2 औरंगाबाद से परभणी रेल डबल लाइन - सर यात्री यो के सुविधा के लिये सेलू स्टेशन (Nanded Div) सेलू स्टेशन के कोरोना काल मे बंद किये गये स्टोपेज को पूर्ववत शुरु करे.पूर्ववत स्टोपेज बहाल करे यह यात्री यो की और से नम्र प्रार्थना.नम्र विनंती
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
छत्रपती संभाजीनगरला राज्य कर्करोग रुग्णालयाचा ७ वर्षांनी लोकार्पण सोहळा होतोय.आनंदाची गोष्ट पण प्रोटोकॉलच्या नावाखाली पत्रकारांना पाससाठी असुविधा होते.ही खेदाची बाब आहे.
दरवेळीच्या पासच्या त्रासातून सोडवण्यासाठी उपाययोजना @MahaDGIPR @Dev_Fadnavis @CMOMaharashtra करेल अशी आशा आहे.
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
मी सरकारला घाटी रुग्णालयातील सर्व गरीब रुग्णांसाठी एमआरआय शुल्क केवळ 700 रुपये कमी करण्यास सांगितले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी मी तत्कालीन मंत्र्याशी अक्षरशः भांडलो होतो. आणि आता ते 2000 रुपये घेत आहेत!!
I had got the government to reduced the MRI charges for all poor patients in Ghati hospital to Rs 700 only when I was the MLA. I literally had fought with the then minister to get this done. And now they are charging Rs 2000 for the same!! How can a poor afford this?
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
प्रत्येकी तीन मोठ्या पक्षांच्या दोन आघाड्या, इतर छोटे मोठे पक्ष, अपक्ष, बंडखोर यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. लढती नक्कीच रंगतदार असतील. कशी असणार पक्षांची गणिते? कोण काय काय पणाला लावताय? 'लोकमत'ने घेतलेला आढावा.
#MaharashtraAssemblyElections2024
#Maharashtra #politics #Lokmat
@lokmat
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
Millions of Indians are mourning a legend today they had never met.. That's the moral power of being Ratan Tata. India has lost a charismatic business leader, great philanthropist, & role model for millions of aspiring young entrepreneurs.
A highly successful Corporate leader, under his watch, Tata Group revenues phenomenally rose to USD 100.09 billion in 2011-12 from ₹10,000 crore in 1991. His role as an angel investor, wherein he supported many StartUps, cannot be forgotten. He upheld the highest standards of morality and probity in public life.
I have fond memories of interaction with the stalwart. He personally came to Chhatrapati Sambhajinagar to bless my sons Rishi and Karan at their weddings. He was the star attraction at the launch of Lokmat’s Coffee Table book Business Icons of Aurangabad.
When I was Maharashtra industry minister, I received valuable inputs and insights from him.
Dynamic, intelligent, simple and soft-spoken, he made a lasting impact on people who came into contact with him. My heartfelt tributes to the legend.
Rest in peace Sir, we will miss you.
#RatanTata #TataGroup #TataSons #TataLegacy
@RNTata2000 @TataCompanies
@rishidarda @karandarda
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यटन म्हणजे विविध संस्कृतींचा आनंद घेणे. असंख्य स्मारके, विविध भाषा, चालीरिती यांनी समृध्द असलेला भारत खरंच अतुल्य भारत आहे. अजिंठा आणि वेरूळ ही दोन जागतिक वारसास्थळे, सुंदर स्मारके, धार्मिक श्रद्धास्थाने असलेला मराठवाडा सुद्धा पर्यटनाची खाण आहे.
पर्यटन रोजगार निर्माण करते, स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करतेच पण विविध संस्कृतींना जोडते. चला प्रवास करू या, भारताच्या आणि जगाच्या या भव्य इतिहासाची ओळख करून घेऊ या.
#WorldTourismDay2024 #IncredibleIndia
#KailashTemple #Ellora
#Ajanta
#tourism #Marathwada #Maharashtra
@IndiatourismM @HelloMTDC
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
जैन पर्युषण पर्वाच्या निमित्ताने 'लोकमत'चे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी आठ दिवसांचा उपवास फक्त मर्यादित प्रमाणात पाणी घेऊन आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर यशस्वीरित्या पूर्ण केला. आज त्याच्या उपवासाची सांगता झाली. या तपस्येदरम्यान त्याला प. पू. प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचे आशीर्वाद आणि पाठबळ लाभले. संपूर्ण परिवाराने त्याला प्रोत्साहित केले.
पर्युषण पर्वा दरम्यान शेकडो समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर तपश्चर्या आणि उपवास केले. त्या सर्वांच्या उत्तम प्रकृतीसाठी माझी प्रार्थना. अनेक समाजबांधवांनी यानिमित्त दूरध्वनीवर शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचे शतशः आभार.
@vijayjdarda @devendarda @rishidarda @karandarda @RuchiraDarda
@lokmat
#ParyushanParva #fasting #Jain
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
Came across incredible story of 84 years old Madhukar Koshti Ji from Niphad, #Nashik , who is distributing newspapers for the last 72 years. By all means, it's an arduous task, getting up early in the morning come rain or shine and making sure newspaper reaches at every home on time. Koshti Ji, who is very fit, believes comfort is sin. His dedication and fitness are a true inspiration, proving that hard work and passion know no age. Kudos to this amazing journey! #Inspiration #Dedication #Newspaper
#AgelessPassion
#CommitmentToExcellence
#LifelongDedication
#FitnessAtAnyAge
#MorningHero
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांची घरटी उध्द्वस्त करणारा मनुष्य ‘प्राणी’ एकमेव असावा! ‘बगळ्यांची माळ फुलं..’ वगरै फक्त गाण्यात. कृती मात्र गणगोत ऊसवणारी !!
#छ_संभाजीनगर
@milokmatabd @hiremath86
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
ऑगस्ट १, १९७४ ला नागपूर येथे मी लोकमत समूहात तांत्रिक संचालक आणि वृत्त संपादक म्हणून प्रवेश केला. बघता बघता आज माझ्या पत्रकारितेतील कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली. ही पाच दशके अतिशय रोमांचक, मंतरलेली, आव्हानात्मक, चढ उतार असलेली होती तसेच ती अनेक आनंददायी क्षणांनी भरलेली होती. या प्रवासात लोकमतने यशाची अनेक शिखरे गाठली.
'लोकमत'मधील माझ्या सहकाऱ्यांनी आज हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय केला. एका हृद्य समारंभात सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. संपादकीय संचालक करण दर्डा यांनी माझी घेतलेली प्रकट मुलाखत हा एक सुखद धक्का होता.
खरे सांगायचे तर स्वर्गीय बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांनी दिलेली शिकवण, माझे ज्येष्ठ बंधू विजयभैय्या यांचे मार्गदर्शन आणि लोकमत परिवारातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे अविरत परिश्रम यामुळे मी येथवर येऊ शकलो.
मी १९८१ साली या शहरात आलो तेंव्हा माझे कोणीही नातेवाईक, मित्र येथे नव्हते. मात्र येथे मी लोकमत वृत्तपत्र सुरु केले, ते रुजले आणि राज्यभर विस्तारले ते येथील वाचकांच्या आशीवार्द आणि पाठिंब्याने. येथूनच मी तीनवेळा आमदार आणि मंत्रीही झालो. जे काही मी केले ते उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांच्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे, कृतज्ञ आहे.
@vijayjdarda @devendarda @rishidarda @karandarda @lokmat
#Lokmat #GoldenJubilee #journalism
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
शेतकऱ्यांच्या वेदनेला आवाज नसतो, म्हणूनच कोणतेही कारण न देता
लाखो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे दावे फेटाळले जातात!
शेतकरी कंगाल आणि विमा कंपन्या कश्या मालामाल होत आहेत याचा लेखाजोखा…
#शेतकरी #farmers #Cropinsurance
epaper.lokmat.com/articlepag…
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी मंत्री, 'लोकमत'चे संस्थापक बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित लोकमत मागील एमजीएम ते चिश्तीया चौक मार्गाचे स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा मार्ग असे नामकरण आज एका ह्र्दय समारंभात करण्यात आले. पालकमंत्री खासदार संदीपान भुमरे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. सतीश चव्हाण, आ. प्रशांत बंब, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ज़िल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, ऋषिकेश प्रदीप जैस्वाल, लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा, लोकमत समूहातील सहकारी आदींच्या उपस्थितीत पार पडला.
बाबूजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे दोनदा पालकमंत्री होते. ते उद्योग मंत्री असताना त्यांच्याच काळात बजाज ऑटो या शहरात आले. त्यांच्या योगदानाचे स्मरण म्हणून शहरातील एका महत्त्वाच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण होता. महानगरपालिकेचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार.
@SandipanBhumare
@AbdulSattar_99
@save_atul @DrBhagwatKarad
@satishchavan55
@MLAPrashantBumb
@MGM_University
@OfficeOfKhaire
@imtiaz_jaleel
@commr_csmc
@DMAurangabadMH
@karandarda
@rishidarda



























